फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमगुंड,भू-माफियांच्या विरोधात तक्रारींच्या सुनावणीचा पहिला टप्पा सोमवारी

गुंड,भू-माफियांच्या विरोधात तक्रारींच्या सुनावणीचा पहिला टप्पा सोमवारी

Advertisements

 

३०० पैकी पहील्या ५० तक्रारींवर सुनावणी: गृहमंत्री व पोलीस आयुक्त,अधिकारी राहणार उपस्थित

नागपूर,ता.१७ ऑक्टोबर: शहरातील गुंड व भूमाफियांच्या विरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या सुनावणीचा पहिला टप्पा सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.३० वा. सिव्हिल लाईन्स परिसरातील पोलीस जिमखाना परिसरात होणार आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार असून या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित राहतील.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या २० आॅगस्ट ते २५ ऑगस्त दरम्यान रवि भवनातील शिबिर कार्यालयात गुंड व भू-माफिया यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी विशेष ‘तत्काळ निवारण कक्ष्’ स्थापन करण्यात आला होता.यात नागरिकांनी तक्रारी कराव्या असे आव्हान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते.

या आवाहनाल नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या काळात ३०० पेक्ष्ा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी पहील्या ५० तक्रारींवर सुनावणी येत्या १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तक्रारींकर्त्यांची नावे यावे या संदर्भात गृहविभागातर्फे सूचित करण्यात येणार आहे.गृहविभागाकडून सूचना मिळालेल्या तक्रारकर्त्यांनी सोमवारी सकाळी १०.३० वा.हजर राहावे.

उर्वरित तक्रारकर्त्यांची सुनावणी पुढील टप्प्यात होणार आहे. तक्रारकर्त्यांना बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या तक्रारींवर संबंधित अधिका-यांकडून कारवाई व्हावी यासाठी पहील्या ५० तक्रारकर्त्यांना पाचारण केले आहे. तक्रार निवारण कक्ष्ाला मिळालेल्या सर्व तक्रारकर्त्यांची सुनावणी टप्प्या टप्प्याने होणार आहे,यावेळी पाेलीस आयुक्त यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त संबंधित परिमंडळाचे पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहे.

या सुनावणीसाठी संबंधित निबंधक रजिस्ट्रार यांनाही हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. गुंड व भू-माफियांच्या दहशतींमुळे शहरातील सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, यावर आळा घालण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा पुढाकार घेतला आहे. या तक्रारी निनावी करण्याची मुभा तक्रारकर्त्यांना दिली होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या