फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमन्यायासाठी बलात्कार पिडीतेचा लढा पोहोचला नागपूरपर्यंत:बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार

न्यायासाठी बलात्कार पिडीतेचा लढा पोहोचला नागपूरपर्यंत:बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार

Advertisements


नागपूरच्या दोन डॉक्टर्सवर आरोप

नागपूर,ता.१७ ऑक्टोबर: मूळ अकोला येथील २९ वर्षीय तरुणी,दिसायला अतिशय देखणी असल्याने तिने मुंबईत चित्रपटसृष्टित काम मिळवण्यासाठी मुंबई गाठली,मात्र छाया नावाच्या एका महिलेने तिला पुण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची मालिका ‘मी पुन्हा येईन’यात काम मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून स्क्रीन टेस्टच्या नावाने पुण्यातील एका पंचतांरांकित ‘द हि’हॉटेलमध्ये नेले,त्या ठिकाणी नागपूरातील दोन डॉक्टर्सने तिच्यावर जबरीने बलात्कार केल्याची तक्रार पुण्याच्या विमाननगर पोलीस ठाण्यात या तरुणीने नोंदवली.मात्र तक्रारीत प्रतिष्ठित लोकांची नावे आल्यामुळे तिच्याच विरोधात नागपूरातील बजाज नगर ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला,यासाठी तिला अकोला येथून नागपूर पोलीसांनी अटक देखील केली,कारागृहात डांबले,तिच्या १२ वर्षीय मुलाला,बहीणीच्या मुलाला अंगपाय सूजेपर्यंत मारहाण केली,एवढेच नव्हे तर तिच्या ७० वर्षीय आईला अंगवस्त्रात मूत्रविसर्जन करेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची तक्रार या तरुणीने काल शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता बजाज नगर पोलीस ठाण्यात नोंदवली,आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळावा,यासाठी अनुसूचित जातीची असणा-या या तरुणीने धाडस करुन समाजातील प्रस्थापितांच्या विरोधात कायदेशीर ‘एल्गार’पुकारला.

तक्रारित या तरुणीने गृहमंत्री अनिल देशमुख,पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्ष् क यांच्याकडे दाद मागितली आहे.

या तरुणीने दिलेलेया तक्रारीत बजाज नगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्ष् क क्ष्ीरसागर,सहाय्यक पोलीस निरिक्ष् क नरेंद्र तायडे,त्यांचे सहकारी जाधव तसेच अकोल्याचे पोलीस यांच्यावर माणूसकीला काळीमा फासणारे गंभीर आरोप केले आहेत.स्वतंत्र भारतातील लोकशाही देशात संवैधानिक व्यवस्थेतील कोणत्याही कायद्यात सुर्यास्तानंतर महिलांना कोणत्याही कारणावरुन पोलीस ठाण्यात आणता येऊ शकत नाही मात्र बजाज नगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्ष् क नरेंद्र तायडे व सहकारी जाधव यांनी एका महिला कान्सटेबलसोबत ऐन लॉक डाऊनच्या काळात २९ जून २०२० रोजी खासगी गाडीने अकोला गाठले व तरुणीला मध्यरात्री नागपूरात आणण्यात आले.या तरुणीने पुण्याच्या विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवल्याने व त्यात नागपूरच्या दोन प्रस्थापितांचे तसेच अमृता फडणवीस यांची मालिका असल्याने तरुणी विरोधातच बजाजनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला,या गुन्ह्यामध्ये अटकेसाठी पोलीसांनी मध्यरात्री सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी जसा सापळा रचतात त्याप्रमाणे ‘कायद्याच्या रक्ष् णार्थ’….. तरुणीला गाठले!

खाकी वर्दीवर हे केलेत आरोप-
अकोलाच्या पोलीसांसोबत नागपूरच्या बजाज नगर पोलीसांनी आंबेडकर नगर येथील तरुणीचे घर गाठले,तेव्हा ती माेठ्या बहीणीच्या घरी होती.अकोला येथील स्थानिक पोलीस शक्ती कांबळे याच्या सहाय्याने अकोला येथील सिव्हील लाईन्स येथील ठाण्यात तरुणीच्या अज्ञान मुलाला,बहीणीच्या अज्ञान मुलाला तसेच ७० वर्षीय आईला आणण्यात आले. त्यांना जबर मारहाण करण्यात आल्याची तक्रार तरुणीने दिलेल्या तक्रारीत केली.तरुणीच्या आईने नेसलेल्या कपड्यातच मूत्रविर्सजन केले.तरुणीच्या मुलाला धमकावत,याच्या…डंडा टाक….बहीणीच्या मुलाला ‘तुझा एनकॉन्टर करतो’‘गच्ची दाबून मारुन टाकीन’अश्‍या भाषेत त्या अल्पवयीन मूलांना धमकावण्यात आले.तरुणी बहीणीच्या घरी असल्याचे कळताच,रात्री १२ वा. नरेंद्र तायडे व सर्व चमू बहीणीच्या घरी पोहोचले. शक्ती कांबळे याने दार तोडले व घरात घूसले.माझा मोबाईल शोधण्यासाठी बहीणीच्या घरातील गाद्या देखील फाडण्यात आल्या!

हिने तीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे,असा अरोप करुन तरुणीला खासगी गाडीत बसवले व नागपूरला आणले. संपूर्ण प्रवासादरम्यान सुरवातीला तरुणी ही महिला कॉन्सटेबलसोबत मधल्या सीटवर बसली होती.मात्र महिला कॉन्सटेबलला ड्रायव्हरजवळ बसवण्यात आले.नरेंद्र तायडे हा तरुणीला खेटून मधल्या सीटवर बसला,घृणा येईल अश्‍या पद्धतीने नको तिथे स्पर्श करीत राहीला,याची तक्रार महिला कॉन्सटेबलकडे तरुणीने करताच ‘आरोपीच जर एवढी सुुंदर असेल तर अधिकारी तरी काय करतील?’असे चमत्कारिक उत्तर या महिला कॉन्सेटेबलने दिले!

यानंतर जाधव हा शेजारी येऊन बसला व त्याने देखील अनेकदा तरुणीचा हात धरला,तिची नखे किती सुंदर आहेत,त्वचा किती सॉफ्ट आहे इ.प्रकारची लाज येईल असे प्रकारचे वर्तन केल्याचे गंभीर आरोप तरुणीने तक्रारित नोंदवले!जास्त बोलली तर तुझ्या मुलाला व बहीणीच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात फसवू,अकोल्याला आमचे नागपूरचेच एस.पी.बदलून गेले आहेत,असा दम दिला.
बजाज नगर पोलीस ठाण्यात तरुणीला अटक दाखवून लॉकअपमध्ये ठेवले. न्यायालयातून पोलीस कोठडी मागितली.तायडे याने आरोपी डॉ. भालचंद्र कोलवाडकर व त्याचा एक मित्र पोलीस ठाण्यात येणार आहे तेव्हा तू त्यांचा समाेर सांग पुण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात इतर अनेक डॉक्टरांना अारोपी बनवते तरच तुझी बेल होईल!हे सर्व ठोणदार क्ष्ीरसागर यांच्या कक्ष्ात घडले.मी तडजोड करण्यास नकार दिल्याने त्यांनी महिला कर्मचा-यास ‘हिला आत टाका,हिचे पूर्ण बँक स्टेटमेंट काढा,हिच्या अकान्टमध्ये काही पैस आले का बघा’असा अादेश दिला.या दरम्यान पंजू तोतवाणी नामक व्यक्ती आली व तरुणीला पोलीसांच्या समक्ष् च अर्वाच्य शिवीगाळ केली व अंगावर मारण्यास धावून आला तेव्हा तायडे हा मधात आल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले.

बजाज नगर पोलीसांनी तरुणीसाठी न्यायालयाला पुन्हा पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने जामीन मंजूर केला,मात्र जामीन अर्जावर उत्तर न देता तायडे निघून गेल्याने तरुणीला पुन्हा कारागृहात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी तिच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली,महिला कर्मचा-याने ती अंगठी तायडे यांच्याकडे जमा करेल असे सांगितले!कारागृहातून बाहेर पडताच तरुणीला मनपा प्रशासनाने १५ दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात डांबले!

काय आहे घटना?
७ फेब्रुवारी २०२० रोजी तरुणी छाया नामक महिलेसोबत पुण्याला ऑडीशनसाठी आली. ‘द ही’हॉटेलमध्ये खोली क्र. ४०२ मध्ये चार लोकांशी छायाने ते निर्माता,निर्देशक असल्याचे सांगून भेट घालून दिली. त्यांनी अमृता फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन‘मालिकेसाठी लीड रोड किवा सेकेंड लीड रोल देतो म्हणून आश्‍वासन दिले.तरुणीने त्यांना वारंवार स्क्रीप्ट मागितली असता त्यांनी टाळले. रात्री सर्वांची दारु पार्टी सुरु झाली,त्या चार पैकी एकाने वारंवार तरुणीला दारु पिण्याची ऑफर दिली.मात्र तरुणीने नकार दिला. ८ तसेच ९ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० दरम्यान त्या चार पैकी दोन लोकांनी जबरीने तरुणीवर बलात्कार केला,प्रतिकार केला असता बिअरची बाटली फोडून काचेने जखमी केल्याची तक्रार तरुणीने केली.तरुणी खूप घाबरलेली असल्याने व तिची प्रकृती ढासळल्याने तिने त्यावेळी संपूर्ण अत्याचार सहन केला,मुंबईला परतल्यानंतर मात्र तरुणीने दोन्ही आरोपींच्या विरोधात अकोला येथील मानव अधिकार कार्यकर्ते कैलाश शिरसाट यांच्या मदतीने पुणे येथील विमान नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.मात्र तक्रारीत मोठमोठी प्रतिष्ठित नावे येताच तेथील पोलीसांनी ‘आपल्या औकातीत राहून तक्रार द्यायची’असा समज तरुणीला दिला!

तरुणीसोबत पोलीसांनी ’द हि’हॉटेल गाठले, ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान कोण कोण त्या फ्लोरवर थांबले होते याची चौकशी केली,ओळखपत्रांवरुन तरुणीने दोन्ही आरोपींना आेळखले,ते नागपूरचे डॉ. भालचंद्र प्रमोद काेलवाडकर तसेच डॉ.समिर विजय चौधरी असल्याचे कळले,असे तरुणीने तक्रारीत नमूद केले.त्यापूर्वी तरुणीला हे नागपूरचे डॉक्टर्स आहेत हे माहिती नसल्याचा दावा तरुणीने तक्रारीत केला.

मात्र त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचे कळताच तरुणीवर एफआयआर मागे घेण्यास दवाब आणण्यात आला.यासाठी कैलास शिरसाट यांच्याशीच संगनमत करुन तरुणीविरोधात नागपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
माझ्या मुलांना तसेच आईला जबर मारहाण करणा-या पोलीसांविरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी,माझ्यावर दाखल करण्यात आलेला खोट्या खंडणीचा गुन्हा मागे घेण्यात यावा,अशी मागणी तरुणीने तक्रारीत नमूद केली.

नरेंद्र तायडे यांनी तक्रार दाखल करण्यात आणले अडथळे!
पीडीता ही काल रात्री तक्रार दाखल करण्यास बजाज नगर पोलीस ठाण्यात पोहोचली असता नरेंद्र तायडे यांनी पीडीताला बघताच गुर्मीने ’तू इथे कशाला आली’म्हणून दटावले,मात्र पीडीतेने कर्तव्यावर असणारे हेड कॉन्सेटेबल यांना तक्रारीची प्रत देताच तायडे यांनी पीडीतेची तक्रार घ्यायची नाही,यांना हाकलून लाव‘असा दम हेड कॉन्सटेबला दिल्याची माहीती पीडीतेने सांगितली.परिणामी तरुणीने कंट्रोल रुमला फोन लावला,कंट्रोल रुमने बजाज नगर पोलिसांशी ऑन एअर बोलणे केल्यानंतर पीडीतेला तक्रार नोंदवण्यासाठी सांगितले.परिणामी तेथील पीएसआयने तक्रारीची दखल घेत ॲक्नॉलेजमेंट प्रत पीडीतेला आणून दिली.पीडीतेची तक्रार घेतली जात नसल्याची तक्रार पोलीस आयुक्त व उपायुक्तपर्यंतही पोहोचली असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या