

४१ लाखांची रक्कम हडपली:नागपूर गुन्हे शाखेने आवळल्या पाच गुन्हेगारांच्या मुसक्या
नागपूर,ता. १३ ऑक्टोबर: गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या अधिका-यांनी तांत्रिक दृष्टया अतिशय क्लिष्ट असलेला गुन्हा उघडकीस आणण्यास यश मिळवले व ४१ लाख ७० हजारांची रक्कम हडपणा-या चार नायजेरियन व एक भारतीय अश्या पाच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.या सर्व आरोपींना दिल्ली येथून अटक करुन नागपूरला आणण्यात आले. आज सिव्हिल लाईन्य येथील जिमखाना येथे आयोजित पत्र-परिषदेत गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी या गुन्ह्याची माहिती दिली.
फिर्यादी यांची पत्नी रीना न्यूटन यांची फेसबूकद्वारे डॉन मोरे या वैद्यकीय अधिका-याशी ओळख झाली. रीना न्यूटन या स्वत: सैनिक दलातून सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या आहेत.त्यामुळे डॉन न्यूटन याने त्यांना कॅनडा येथे नोकरी लावून देतो अशी फसवणूक केली व विविध प्रकारे भेटवस्तूंचे आमिष दाखवून ४१ लाख ७० हजार रुपये लुबाडले.ही सर्व रक्कम वेगवेगळ्या बैंंकेच्या आठ खात्यात जमा करण्यात आली होती.
१० जून दरम्यान ही घटना घडली व २० सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस आयुक्तांनी हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग करण्याची सूचना केली. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील बँक खात्याची माहिती घेण्यात आली. ज्या विविध बँकेमध्ये तक्रारकर्त्या महिलेनी रक्कम जमा केली ती कोणकोणत्या ठिकाणी वितरीत झाली याची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच बँकेचे एटीएमचे सीसीटीव्ही फूटेजसुद्धा प्राप्त करण्यात आले. या सर्व घडोमाडीतून गुन्हेगार हे दिल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्यातील अधिका-यांनी दिल्ली येथून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी हे परकीय देशाचे असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण दिशानिर्देशाचे पालन करण्यात आले.या गुन्ह्यात १८ लाख रुपये गोठवण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले असून आरोपींची १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.या दरम्यान आणखी सखोल तपास करण्यात येईल.
अनेकांची फसवणूक-
या गुन्हेगारांनी ज्या पद्धतीने महिलेची रक्कम लंपास केली ती कार्यपद्धती बघता अनेकांची फसवणूक झालेली असल्याची शंका याप्रसंगी आयुक्त सुनील फुलारी यांनी व्यक्त केली.तक्रारकर्त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.सायबेरीयन नागरिकांची मोठी वसाहत दिल्ली येथील मोहन गार्डन,तंदूर विहार,उत्तम नगर या ठिाकणी आहे.
बहूतांश नागरिक हे खोटे बँक खाती,खोटे सीमकार्ड्स वापरत असून अनेकांकडे मुंबई येथील सीमाकार्ड्स आढळले. गुन्हेगार वायफाय इंटरनेट,लॅपटॉप तसेच आुधनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे आढळून आले.विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपींनी ही संपूर्ण फसवणूक करण्यासाठी एका भारतीय आरोपीची मदत घेतली व त्याच्या मदतीने खोटे सीम कार्ड्स,बँक खात्यांचा वापर केला.अश्या अनेक भारतीय नागरिकांची मदत घेऊन त्यांना ५ ते १० टक्के कमिशन दिल्याची माहिती आयुक्त सुनील फुलारी यांनी दिली.हा भारतीय आरोपी मोबाईल विक्रीच्या व्यवसायाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उलाढाल इतर चार नायजेरियन आरोपींच्या मदतीने करीत होता.
यातील आरोपीची पत्नी किवा मैत्रीण या पश्चिम बंगाल किवा इतर भागातील असून गुन्ह्यामध्ये त्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. गुन्ह्यातील चार आरोपी हे कपडे विक्रीच्या व्यवसायाच्या नावाखाली रॅकेट चालवित होते. सर्वच आरोपी हे १० वी १२ वी शिक्ष् ण घेणारे आहेत,हे विशेष!हे सर्व नायजेरियन आरोपी दिसण्यास एकसारखे असल्यामुळे त्यांची ओळख पटवून त्यांना दिल्ली ते नागपूर अटक करुन आणने,पोलीसांसाठी आव्हानात्मक होते.याशिवाय ताब्यातून पळून जाण्यात ही हे गुन्हेगार तरबेज होते.महत्वाचे म्हणजे,भोळ्या भाबड्या नागरिकांना फसविण्यासाठी हे सर्व आरोपी अगदी साधे फोन वापरायचे,ही त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’होती.
या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी व त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त,पोलीस उप आयुक्त(आर्थिक) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्ष् क डॉ.अशोक बागुल,तपास अधिकारी व पोलीस निरीक्ष् क राघवेंद्र सिंह क्ष्ीरसागर व सहायक पोलीस निरीक्ष् क विशाल माने,पोलीस हवालदार संजय तिवारी, पोलिस शिपाई अजय पवार,दिपक चौहान,बबलू ठाकूर यांचे सहकार्य लाभले.




आमचे चॅनल subscribe करा
