

नागपूर,ता. १२ ऑक्टोबर: उपराजधानीतील युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक वर्ष तिच्यासोबत प्रेमसंबधात कायम राहून नंतर पलायन केलेल्या,आंतरराज्य गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती व ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले.
आरोपी शहजाद रमजान वाणी (३०), याने २४ वर्षाच्या नागपूर येथील युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले तसेच दि.११ डिसेंबर २०१७ ते दि. ३१ ऑक्टोबर २०१९ या काळात तिला ब्लँकमेलींग करत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना एस.जी.एस मॉल पुणे येथे दि. १२ डिसेंम्बर २०१७ रोजी घडली असून सदरील गुन्ह्याची नोंद ‘सहकारनगर,पोलीस स्टेशन, पुणे मध्ये दि ०२ जुलै २०२० रोजी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आरोपीचा भाऊ शेषबाझ वाणी व त्यांचे कुटुंबीय यांनी ही दि ०८ फेब्रुवारी २०२० रोजी युवतीस मारहाण ही केली असल्याची तक्रारीत नोंद आहे.
सदरील आरोपीस ९० दिवस होऊनही अद्यापही अटक झालेली नाही. ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी घटनेविषयी आवश्यक कार्यवाही करण्यास, संबंधित तपास अधिकारी यांना सूचना द्याव्यात तसेच आरोपीस तात्काळ अटक करावी व आरोपीला जामीन मिळणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेणेस सूचना द्यावी, या घटनेचा तपास कमीत कमी वेळेत पूर्ण करून याबाबतची चार्जशीट न्यायालयात दाखल करावी, यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख तसेच पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांना पत्र देऊन गुन्ह्यातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात केलेली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
