फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमजरिपटका गँगरेप प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या पोलीस ठाण्याला कठोर कारवाईचे निर्देश

जरिपटका गँगरेप प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या पोलीस ठाण्याला कठोर कारवाईचे निर्देश

Advertisements

नागपूर,ता. १२ ऑक्टोबर: उपराजधानी नागपूरात जरिपटका भागात माणूसकीला काळीमा फासणारी गँगरेपची घटना २५ ऑगस्ट २०२० रोजी  घडली,या घटनेत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पीडीतेच्या घराजवळील चार नराधमांनी गँगरेप केला. या घटनेची माहिती होताच याची तक्रार पीडीतेच्या आईने २८ सप्टेंबर २०२० रोजी जरिपटका पोलीस ठाण्यात केली,तक्रारीच्या आधारावर चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र आरोपींच्या कुटुंबियांकडून पीडीतेच्या भावांना मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार आज पीडीतेच्या आईने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावर आयुक्तांनी स्वत: घटनेचे गांर्भीय लक्ष्ात घेऊन जरिपटका पोलीस ठाण्यात फोन करुन विशेष सूचना केल्या.

याप्रसंगी पीडीता,पीडतेची आई, ॲड. शिल्पा गिरडकर, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड.नितीन देशमुख उपस्थित होते.याप्रसंगी पीडीतेच्या आईने आयुक्तांना सांगितले की त्यांना दोन मुले असून त्यांच्या मुलांना आरोपींच्या कुटुंबियांकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे,आयुक्तांनी जरीपटका पोलीस ठाण्यात फोन करुन आरोपींच्या कुटुंबियांची भेट घेऊन समज देण्याची सूचना केली तसेच आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात केस दाखल होताना स्वत: पोलीस निरीक्ष् क यांनी जातीने हजर राहण्याची सूचना केली.
याशिवाय पीडीतेला समुपदेशन करण्यासाठी भरोसा सेलच्या सदस्यांना पीडीतेच्या घरी जाण्याचे निर्देश दिले.यावेळी पीडीतेच्या बाजूने ॲड.शिल्पा गिरडकर या हजर राहतील, अश्‍या लिखित सूचना दिल्या.या घटनेत पोस्को एक्ट लागला असल्याने घटनेचे गांर्भीय लक्ष्ात घेऊन सक्तीची कारवाई करावी,असे दिशानिर्देश त्यांनी दिले.

पीडीतेच्या आईने जरीपटका पोलिस ठाण्यात त्यांना दूपारपासून तर रात्री ११.३० पर्यंत फिर्याद नोंदवण्यासाठी बसून ठेवल्याची ही तक्रार आयुक्तांकडे केली.याशिवाय पीडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना दोनशे रुपये खर्च करुन मेडीकल पर्यंत जाण्याचा व तपासणीसाठी योग्य सामग्री घेण्याचा खर्च करावा लागला असल्याचे सांगितले.

आयुक्तांनी या बाबीची देखील दखल घेतली. पीडीतेचे कुटुंब हे अत्यंत गरीब घरातील असून हातावर पोट असल्याचे पीडीतेच्या आईने आयुक्तांना सांगितले. लॉक डाऊनमुळे आणखीनच हलाकीच्या स्थितीला सामोरे जावे लागले असल्याची वेदना त्यांनी मांडली. पीडीतेला मनोधैर्य किवा निर्भया योजनेतून आर्थिक मदत मिळावी,यासाठी संपूर्ण मदत करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी याप्रसंगी शिष्टमंडळाला दिले तसेच तश्‍या सूचना फोनवर जरीपटका पोलीस ठाण्यातील निरीक्ष् काला दिल्या.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या