


मुंबई पोलिस आयुक्तांची किरकिरी:एफआयआरची कॉपी वाचलीच नाही!
इंडिया टूडे ऐवजी घेतले रिपब्लीकन भारत वाहीनीचे नाव!
नागपूर,ता. ८ ऑक्टोबर: अवघ्या सोळा तासात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंगने घूमजाव केला. टीआरपी वाढवण्यासाठी केलेल्या अफरतफरमध्ये चक्क ‘रिपब्लीकन भारत’ या वृत्त वाहीनीवर त्यांनी पत्र परिषदेत आरोप ठेवला होता,या वाहीनीच्या व्यवस्थापकीय संचालक अर्णव गोस्वामी यांना समन्स पाठवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले मात्र सोळा तासात त्यांना घूमजाव करावा लागला व हा आरोप रिपब्लीकन भारत या वाहीनीवर नसून ’इंडिया टूडेवर असल्याचे वक्तव्य करावे लागले.
या धक्कादयक घडामोडीनंतर वृत्तवाहीनी माध्यमांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. उशिरा रात्री प्रसिद्ध झालेल्या एफआयआरमध्ये पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांना रिपब्लीकन भारतचे नाव नसून इंडिया टूडेचे नाव असल्याचे जाहीरपणे सांगावे लागले.यामुळे एकंदरित महाराष्ट्र व पोलिस विभागाची किरकिरी झाली.
या खुलाश्यानंतर रिपब्लीकन भारतने अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारुन परमबिर सिंग व महाराष्ट्र सरकारवर पराकोटीचे ताशेरे अोढले. आता परमबिर सिंग हे उद्या सकाळी ९ वा.इंडिया टूडे विरोधात पत्र परिषद घेतील का?आज दिवसभर रिपब्लीकन भारत वाहीनी विरोधात त्यांनी जो तमाशा उभा केला त्यासाठी माफी मागतिल का?भारताची ही वृत्त वाहीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शरद पवार किवा संजय राऊत यांच्या मालकीची नसून देशातील जनतेची असल्याचे अर्णव गोस्वामीने ठणकावून सांगितले.
उघडपणे आव्हान देत अर्णव गोस्वामी यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रकरणात ज्याप्रकारे परमबिर सिंग यांनी चित्रपटसृष्टिला क्लीन चिट दिली,पालघर प्रकरणात भूमिका घेतली,रिया चक्रवर्ती प्रकरणात नाक घूपसले ते बघता त्यांना आता या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे टिका केली.
ज्या पोलीस आयुक्तांना एफआयआरच्या कॉपीमध्ये कोणत्या चॅनेलचे नाव आहे,हे वाचता येत नसेल तर महाराष्ट्राच्या मुंबई पोलीसांवर सुशांतसिंग प्रकरणात झालेली टिका ते मान्य करतील का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रात्री उशिरा टीआरपी संबंधातील एफआयआर ची कॉपी व्हायरल झाली व त्यात प्रमुख गवाह तेजल साेलंकी यांनी त्यांच्या मुलांना इंडिया टूडे ही इंग्रजी वाहीनी बघण्यास विशाल नावाच्या केबलवाल्याने सांगितले असल्याचे नमूद आहे.यासाठी त्यांना पैश्यांचे आमिष दाखवण्यात आले मात्र मुलांना इंग्रजी वाहीनी आवडत नसल्याचे देखील त्या म्हणाल्या.
त्यांचा हा कॉल रेकॉर्ड रिपब्लीकन भारतने रात्री उशिरा व्हायरल केला.आता परमबिर सिंग यांची बोलती बंद झाली आहे का?त्यांना एफआयआरमध्ये एक नव्हे तर तीन वेळा इंडिया टूडेचे नाव आल्याचे दिसले नाही का?इंडिया टूडेला वाचवण्यासाठीच हे कट कारस्थान रिपब्लीकन भारत विरोधात रचण्यात आल्याचा आरोप अर्णव गोस्वामी यांनी केला.
इतर माध्यमांची बोलती बंद!
आज दिवसभर झी सहीत इतर अनेक वाहीन्यांनी रिपब्लीकन भारतला साथ देण्याऐवजी रिपब्लीकन भारत वाहीनीच्या विरोधात वृत्त प्रसारण चालवले,त्यांना देखील अर्णव गोस्वामी यांनी टोला हाणला व आता त्यांच्या बोलती बंद झाली आहे का?असा सवाल केला.आता या वृत्त वाहिन्या रिपब्लीकन भारतची माफी मागतील का?असे अर्णव गोस्वामी यांनी विचारले.आता मी या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असा देखील इशारा अर्णव गोस्वामी यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष्!
या सर्व गोंधळात आता राज्यातील जनतेचे लक्ष् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लागले असून,मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आततायीपणाच केल्याचा सूर उमटला आहे. मात्र या प्रकरणामुळे राज्याची व पोलीस विभागाची चांगलीच बदनामी देशभरात झाली आहे.आता यावर राज्याचे सत्ताधारी काय भूमिका घेतात?परमबिर सिंग यांचे पद जाणार की राहणार?या प्रश्नांची उकल उद्या पत्र परिषदेनंतरच होऊ शकेल.




आमचे चॅनल subscribe करा
