फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशवाहीन्यांमध्येच रंगली ‘नॅशनल टीआरपी लीग!’

वाहीन्यांमध्येच रंगली ‘नॅशनल टीआरपी लीग!’

Advertisements

अर्णव गोस्वामीच्या ‘रिपब्लीकन भारत’विरोधात इतर वाहीन्यांचे ‘ऑन एअर’ युद्ध

नागपूर,ता. ८ ऑक्टोबर: दुपारी मुंबईचे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांनी पत्र-परिषद घेऊन अर्णव गोस्वामीच्या ‘रिपब्लीकन भारत’या वृत्त वाहीनीने सुशांतसिंग प्रकरणात कश्‍याप्रकारे टीआरपी मॅन्यूप्यूलेट केला,चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला इ.ची माहिती देताच जणू वहिनी जगतावर एखाद्या स्कायलॅब’‘कोसळला,अश्‍या प्रमाणे ‘रिपब्लीकन भारत ’ वृत्त वाहीनीविरोधात या चॅनलची विश्‍वासहर्ता संपविण्यासाठी इतर वाहीन्या ज्याप्रमाणे एकजूट आणि आक्रमक झाल्या ते बघून २१ व्या शतकातल्या तिस-या दशकात लवकरच पदार्पण करणारी पत्रकारिता कोणत्या दिशेने चालली आहे हे बघून प्रेक्ष् क वर्ग थक्क झाला!

सोशल मिडीयावर तर या सर्व वाहिन्यांच्या एकाच विषयाला घेऊन टेलिकास्ट होणारा आक्रस्ताळेपणा बघून प्रेक्ष् कांनी पराकोटीची चीड व्यक्त केली.एकाची विश्‍वासहर्ता संपविण्याच्या नादात आपलीही विश्‍वासहर्ता लयाला जात आहे,याचे भान देखील या वृत्त वाहीन्यांना राहीले नाही.

रिपब्लीकन भारत’वृत्त वाहिनीने सुशांतसिंग प्रकरणात ५०० रुपये देऊन आपला चॅनल सतत सुरु ठेवल्याचा आरोप मुंबई पोलिस आयुक्तांनी केला. साधारणत: देशामध्ये BRRC नावाची संस्थेद्वारे २०१० पासून टीआरपी मोजण्याचे तंत्र विकसित झाले.बार्कचे देशभरात ४४ हजार पॅरामीटर लागले आहेत. विशेष म्हणजे देशातील १३३ कोटी लोकसंख्येच्या पाठीमागे फक्त १ लाख ८० लोकांनाच नमुना म्हणून निवडल्या गेले आहे. याचा अर्थ १३३ कोटींपैकी ४० हजार घरे निवडण्यात आली.म्हणजे ७ हजार ५०० लोकसंख्येमागे फक्त १ घर,०.०१ टक्का लोकं टीआरपी तपासण्यासाठी निवडण्यात आले,असा याचा अर्थ होतो.सध्या देशात ४०० वाहीन्या आहेत तर ३६०० कोटींच्या जाहीराती दिल्या जात आहेत. .कोणता चॅनल सर्वाधिक बघितला गेला याचे आकडे टीआरपी बॉक्समुळे कळतात जो घरातील सॅट टॉप बॉक्ससोबच जोडल्या जातो. टीआरपी अधिक तर जाहीराती देखील अधिक…माध्यम जगतात असं सरळ-सरळ गणित आहे.टीआरपीवरुनच जाहीरातीचे दर ही ठरतात.ओपन मार्केटमधून जो रेवेन्यू मिळतो त्यातून त्या वाहीनीचं स्टेट्स ठरतं.मात्र ‘रिपब्लीकन भारत’ने खोटेपणाकरुन टीआरपी वाढवला,असो आरोप या वाहिनीवर करण्यात आला.

हा संपूर्ण प्रकार प्रेक्ष् कांसाठी अतिशय त्रासदायक आणि तापदायक ठरला.कोविडच्या काळात ही या वृत्त वाहीन्यांनी इश्‍यू सोडेन नॉन इश्‍यू घटनांना अवास्तव महत्व देऊन प्रेक्ष् कांना चांगलेच निराश केले होते.करोना संबंधीच्या अतिरेकी बातम्यांना लवकरच प्रेक्ष् क कंटाळले,यानंतर सुशांतसिंग प्रकरण नको तेवढा ताण्यात आला.रिया चक्रवर्ती,ड्रग्स गँग इत्यादीच्या बातम्यांचा अतिरेकी मारा करीत असताना या बातम्यांची विश्‍वासहर्ता काय? हे मात्र कोणतीही वाहिनी सांगत नव्हती. हा सर्व खटाटोप फक्त ‘टीआरपी’वाढवण्यासाठी करण्यात आला मात्र दुसरीकडे आपण काय गमावतोय?याचा विचार कोणीही केला नाही.

महत्वाचे म्हणजे माध्यमांना रेवेन्यू मिळतो कूठून?तर फक्त मेट्रो सिटीतून. परिणामी टीआरपी मीटर हे देखील ग्रामीण भागात लावल्या जात नाही तर ते फक्त शहरात ते ही मेट्रो शहरात बसवल्या जातात.नागपूरच्या तुलनेत अमरावती,बुलढाणा,वाशिम इ.अश्‍या शहरांची खरेदी किवा विक्रीची क्ष् मता ही निश्‍चितच कमी असणार आहे. त्यामुळे ‘रिपब्लीकन भारत’ने जणू टीआरपी कॅप्चर केला असा ओरडा याचा अर्थ पूर्ण देशच कॅप्चर केला,असा होत नाही,मात्र या वाहीनीच्या विरोधात एकवटलेल्या इतर वाहीनींचा होरा मात्र अश्‍याच पद्धतीचा आहे.याचाही प्रेक्ष् कांना चांगलाच उबग आला.

ज्या शहराची लोकसंख्या १० लाखांपेक्ष्ा जास्त आहे अश्‍याच शहरात टीआरपीला महत्व आहे.त्यात ही अश्‍या शहरात टीन एजर्स व महिला वर्ग यांनाच लक्ष्ात ठेऊन कार्यक्रम आखली जातात.याच जीवघेण्या स्पर्धेत आज ‘सॅटेलाईट न्यूज चॅनल्स’नी मात्र सगळी विश्‍वासहर्ताच पणाला लावली असल्याचे चित्र आज उमटले .

जे वृत्तपत्र जगताचे झाले त्याच दिशेने वाहिन्यांचे जग जग चालत राहीले.वृत्तपत्र जग हे देखील विश्‍वासहर्तावर चालत असतात मात्र गेल्या काही दशकात जेव्हापासून या क्ष्ेत्रात ‘व्यवसायिकता’घूसली,मूल्यांना मूठमाती मिळत गेली..बातम्या मॅनेज होऊ लागल्या,वाचकांना ५ रुपयांचा पेपर विकत घेतल्यावरही खरे वृत्त वाचायला मिळेलच याची शाश्‍वती उरली नाही.चूक वृत्तपत्रांची देखील नाही,वाचकांच्या ५ रु.च्या भरवश्‍यावर वृत्तपत्रे छापली जाऊ शकत नाही,त्यासाठी जाहीरातदार लागतात,मात्र आपल्या जाहीरातदारांना दुखवायचे नाही या तत्वाने चालणा-या वृत्तापंत्रांनी जेव्हापासून जाहीरातदारांच्या विरोधातल्या बातम्या लावणे बंद करण्याचे सूत्र स्वीकारले,त्याच क्ष् णी वृत्तपत्रांची विश्‍वासहर्ता, ही लयाला जाऊ लागली.मग ते जाहीरातदार मोठमोठे राजकारणी असोत,कंत्राटदार असो,शाळा संचालक असोत,बिल्डर असाेत किवा इतर कोणीही असोत.

परिणामी खरे आणि निर्भिड बातम्यांच्या वाचक वर्ग हा वृत्तपत्रापासून हळूहळू दूर होत गेला,हे वास्तव आहे. हेच आज वाहीन्यांबाबत ही घडताना दिसतंय. म्हणूनच आज अनेक वृत्तपत्रांचेच नव्हे तर वाहीन्यांचे देखील ‘न्यूज पोर्टल’ सुरु झालेत. लोकांना मोबाईलवर फक्त ’अपडेट्स’ वाचायची सवय झाली आहे,कारण आजचा वाचक हा २१ साव्या शतकातल्या तिस-या दशकात पदार्पण करणारा वाचक वर्ग आहे,याचे भानच ठेवण्यात आले नाही,जुनी ३० वर्षांपूर्वीची मुल्याधिष्ठीत पत्रकारिता पार रसातळाला गेली असल्याचा निष्कर्ष नुकतेच एक मराठी वाहीनी सुरु करताना केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले…!

विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण बघता पुढील २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत या माध्यमांचे आता कोणते स्थान राहणार आहे?याबाबत चर्चा सुरु झाली आहे,मिडीया इंडस्ट्रीशिवाय ॲपच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.प्रिंट मिडीयाप्रमाणेच वृत्त वाहीन्यांना देखील आपला अजेंडा घेऊन चालणे नुकसानकारक ठरल्याचे बोलले जात आहे.

या घटनेने मात्र सोशल मिडीयावर आणखी एका अजेंडावर बरीच चर्चा उमटली ती म्हणजे यूपीएच्या काळात ‘एनडीटीव्ही’ ही ज्याप्रमाणे अजेंडा चालवत होती,तेच एनडीएसाठी अर्णव गाेस्वामीने केले,असे समर्थन केले जात आहे.जर हे चुकीचे आहे तर ते ही चुकीचेच मानावे लागेल.एवढेच की अर्णव गोस्वामी याच्या वृत्तवाहीनीवरील पराकोटीचा आक्रस्ताळेपणा हा सुजाण प्रेक्ष् कांना कधीही आवडला नाही.केवळ अर्णव गोस्वामी नव्हेच तर त्या वाहीनीवरील त्यांचे वार्ताहर हे देखील ‘पंचम स्वरातच’ वार्तांकन करताना बघून प्रेक्ष् कांना हसावे की रडावे.की कानात बोटे टाकावे,सूचत नाही.या घटनेने मात्र एक नक्की झाले ज्यांना अर्णव गोस्वामी आवडत नाही त्यांनी देखील आज त्यांचा चॅनल सर्च केला,व त्यांची टीआरपी वाढवली!

दुसरीकडे’ रिपब्लीकन भारत’ चॅनलवर भारतातील जनता ही कश्‍याप्रमाणे ‘रिपब्लीकन भारत’सोबत आहे हे दाखवताना लाेकं हे हार, फूले,पुष्पगुच्छ घेऊन येत असल्याचे दाखवण्यात आले तेव्हा प्रेक्षकांना पुन्हा हसावे की रडावे,सूचलेच नाही.

मूळात ज्या झी टीव्हीने,रिपब्लीकन भारतविरोधात दुपारपासून रिपब्लीकन भारतने कश्‍याप्रकारे आपली विश्‍वासहर्ता गमावली आहे हे दाखवण्याचा खटाटोप चालवला आहे,त्याच झी टीव्हीने दिल्लीतील निर्भयाच्या प्रकरणात संपूर्ण नेरेटीव्हच बदलून दिला होता,प्रेक्ष् क हे अद्याप ही विसरले नाहीत….!निर्भया कांडातील अल्पवयीन गुन्हेगाराविषयीचे वार्तांकन असो,अश्‍या घटना का घडतात?रात्रीचा चित्रपट बघणे तरुणीला किती महागात पडले?या घटनेत शिक्ष्ा होणार का?शिक्ष्ेसाठी लागणारी कलमे,न्यायालयीन प्रक्रिया इ.चा कीस झी टीव्हीने काढला होता.यामुळे या वाहीनीला अत्याधिक टीआरपी देखील मिळाला होता. तेव्हा निर्भयाच्या न्यायापेक्ष्ा या वाहीनीला देखील टीआरपीचीच गरज जास्त वाटली होती…!

नुकतेच ‘आज तक’वाहीनीच्या वार्ताहर चित्रा त्रिपाठी यांचा हाथरसच्या एसडीएमवर जाेरजोरात ओरडण्याचे दृष्य सुजाण प्रेक्ष् कांना अजिबात आवडले नाही.एवढ्ा मोठा पोलीस अधिकारी हा शेवटपर्यंत खाली मान घालून उभा राहीला व चित्रा त्रिपाठी या राणा भीमदेवी थाटात त्यांचा सतत पाणउतारा करीत असल्याचे दृष्य हे अतिशय संतापजनक होते.शेवटी ते सरकारी पदावर असले तरी त्यांना देखील स्वाभिमान होताच मात्र वरुन आदेश असल्याने त्यांनी त्या संपूर्ण ड्रामेबाजीत मूक राहणेच पसंद केले. कायद्याच्या रक्ष् णकर्त्यालाच या महामहिम महिला वार्ताहर मोठमोठ्याने शिव्या घालत कायदा शिकवित होत्या….!या एसडीएम ची फक्त हीच चूक होती त्यांनी या महिला वार्ताहराला’आप गलत न्यूज चला रही है’ असा दम दिला होता..!!!त्यांचा हा मुद्दा तमाशा न करता देखील या महिला वार्ताहरला खोडून काढता आला असता, मात्र मग टीआरपी कशी वाढली असती????

त्यांना वाटलं,अश्‍याप्रकारचे वार्तांकन केल्याने त्यांच्याप्रति प्रेक्ष् कांना सहानूभूती वाटेल मात्र घडले उलटेच.हाथरसच्या एसडीएमप्रति लोकांना सहानूभूती वाटली आणि ‘आज तक’चॅनल प्रेक्ष् कांनी रिमोट कंट्रोलने बदलला…!नुकतेच ’आज तक’ वाहीनीवर एक लाख रुपयांचा दंड बसवण्यात आला कारण सुशांत सिंह याचा मृत्यूनंतरचा अहवाल डॉ.सुधीर गुप्ता यांनी लिक केला मात्र या वाहीनीने तो अहवाल ‘एम्स’चा अधिकृत अहवाल असल्याचा वारंवार वाहीनीवर दाखवले….!

हमाम मे सभी नंगे’ या म्हणीप्रमाणे टीआरपी दौड मे सभी बराबर असेच आता म्हणायची प्रेक्ष् कांवर वेळ आली आहे…ः

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या