

अमेरिकेच्या निवडणूकीत पडणार प्रभाव!
डॉ.ममता खांडेकर
(रविवार विशेष)
(Senior Journalist)
नागपूर,ता.४ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना आणि अमेरिकेची अध्यक्ष्ीय निवडणूक यांचे एकच टायमिंग कसे जुळून आले?यावर बरेच चर्वितचवर्ण साेशल मिडीयावर सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे, हाथरसची तथाकथित ‘प्रायोजित’घटना आणि अमेरिकेचे अध्यक्ष्ीय उमेदरवार ‘ज्यो बिडेन’यांचे भारताविषयीचे ‘एंटी भारत’धोरण यातील परस्पर संबंध यावरही चांगलाच खल सोशल मिडीयावर सुरु असून हाथरसच्या त्या तरुणीसोबत मारहाणीची घटना १४ सप्टेंबर रोजी झाली मात्र २७ सप्टेंबरपर्यंत तिचा सफदरजंग रुग्णालयात मृत्यू होईपर्यंत देशाला एवढ्या क्रूर घटनेची माहितीच नाही,देशातील मिडीया देखील एवढ्या मोठ्या घटनेपासून अनभिज्ञ राहीला यामागे ही घटना नेरेटीव्ह सेट करुन प्रायोजित करण्यात आली असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली आहे,सर्वात महत्वाची बाब म्हणजे सत्ताधारी भाजपच्या आयटीसेलचे हे फार मोठे फेलयर असल्याचे बोलले जात आहे.
तरुणीचा जीव तर गेला आहे, तिला मारहाणही झाली आहे,मात्र बलात्कार झाला नाही अश्या आपल्या पहील्याच बयाणीत तिने नाेंदवले होते. कौटूंबिक कलहातून झालेल्या वादाला पुढे जातीयतेमध्ये रुपांतरित करण्यात आले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे कारण या तरुणीचे पहीलेच बयाण जेव्हा ती तिच्या आईच्या पायाजवळ पडली होती तेव्हा तिच्या आईनेही हेच सांगितले होते ’तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली,तिचा गळा दाबण्यात आला,तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला’.मात्र तिचा हा पहीलाच व्हिडीयो माध्यमांमध्ये कुठे प्रसिद्ध झालाच नाही….!
देशामध्ये राजकारणाची संपूर्ण समीकरणे बदलण्याची ताकद फक्त दोनच राज्याज आहेत ती म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार.बिहारमध्ये सध्या निवडणूकीचा काळ आहे,तिथे अशी घटना नॅरेटीव्ह सेट करणा-याला मिळाली नहाी,१४ सप्टेंरब रोजी तरुणीसोबत मारहाणीची घटना हाथरसमध्ये घडली आणि येथूनच संपूर्ण स्क्रीप्ट रचण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.स्क्रीप्टमध्ये दोन बाबी महत्वाच्या होत्या,अशी घटना दलित तरुणीसोबतच घडायला हवी, घटना सवर्ण समाजातील लोकांकडून घडायला हवी आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे ते राज्य भाजपची सत्ता असणारे असावे.
या तिन्ही गोष्टी हाथरसमध्ये जुळुन आल्या व या घटनेनंतर अवघा देशच कसा पेटला,हे सर्वविदीत आहे.अशी घटना उत्तरप्रदेशमध्ये घडू शकते याचे इन्पूट्स तेथील मिडीया सेलला आधीच मिळाले होते मात्र देशातील एका राष्ट्रीय पक्ष्ाची एक्टीव्हिटी ट्रेस करण्यात ते अपयशी ठरले,असा दावा केला जात आहे.वारंवार या पक्ष्ातील शीर्षथ नेते देशाबाहेर का जातात?हाथरसच्या घटनेत अलीगढ मेडीकल रुग्णालयातही या तरुणीचे बयाणात कुठेही बलात्काराचा उल्लेखच नाही. सफदरजंगमध्ये शेवटच्या बयाणावर संपूर्ण स्क्रीप्टची भिस्त ठेवण्यात आली,असे म्हटले जात आहे.
तरी देखील त्या तरुणीला एम्सला न नेता सफदरजंगमध्ये का हलविण्यात आले?तिच्या मृत्यू संदिग्ध आहे का?तिची मेडीकल रिपोर्ट,फॉरेंसिक रिपोर्ट का स्वीकारली जात नाही?यावर देखील प्रश्ने उपस्थित करण्यात आले.
आरोपी म्हणतात आमची नार्को टेस्ट करा पिडीतांचा नार्को टेस्टला विरोध!
या घटनेत आणखी एक संदिग्ध बाब म्हणजे या घटनेतील चारही ठाकूर समाजाचे आरोपी हे सीबीआय चौकशी व नार्को टेस्टची मागणी करीत आहे तर पिडीताचे कुटुंब मात्र सीबिआय चौकशी व नार्को टेस्टला विरोध करीत आहेत!मिडीया ट्रायलमध्ये कुठेही या बाबीचा उल्लेख आढळत नाही.या घटनेमध्ये अनेक साक्ष्ीदार पुढे आले, घटनेच्या वेळी ज्या आरोपींचे नाव घेतले जात आहे त्या वेळी ते त्यांच्यासोबत होते.परिणामी हाथरसच्या घटनेवरुन संपूर्ण देशात दोन मतप्रवाह निर्माण झालेले आढळतात,सवर्ण समाजाने ठाम भूमिका घेऊन ‘दोषी कोई बचे नही,निर्दोष कोई फंसे नही’असे आंदोलन तिथे चालवले आहे. ‘बेटी बहाना है,मकसद जातिभेद भडकाना है’या आंदोलनेही तिथे जोर पकडला आहे.
हाथरसचे पोलीस अधिक्ष् क विक्रांत वीर यांनी पहील्या पासून हेच विधान केले आहे ’तरुणीवर बलात्कार झालाच नाही…!’नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही माध्यमांवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे, उत्तर प्रदेशचा विकास ज्यांना खूपताेय तेच राज्याचे वातावरण बिघडवण्याचा घाट घालत आहे,दोषींना दंड नक्कीच मिळेल,शेवटी योगी आदित्यनाथ यांनी जनरेट्यापुढे या घटनेची सीबीआय चौकशीला देखील मान्यता दिली आहे,यापूर्वी एसआयटी चौकशी देखील करण्यात आली अाहे,विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या एसआयटी चौकशीवर सरळ देखरेख ठेवली आहे,तरी देखील माध्यमात या घटनेवर आगडोंब उसळवल्या जात असल्याचे चित्र उमटले आहे.
मध्यरात्री अंत्यसंस्कार का?
उत्तर प्रदेशच्या गुप्तहेर विभागाला तरुणीच्या अंत्यसंस्कारच्या वेळी संपूर्ण उत्तर प्रदेश हा आगीच्या भक्ष्यस्थानी जाणार असल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे त्या तरुणीचा मृत्यू हा सकाळी झाला असताना रात्रीच्या दहापर्यंत तिचा मृतदेह हा सफदरजंग रुग्णालयातच ठेवण्यात आला होता,दिवसभरात तिचा मृतदेह गावी पोहोचवण्यासाठी कोणतीच हालचाल का करण्यात आली नाही?असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
ही माहिती मिळताच मध्यरात्री जबरीने पोलीस प्रशासनाने अंत्यसंस्कार केले,अन्यथा दुस-या दिवशी केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर देश हा आगीच्या भक्ष्यस्थानी भस्म झाला असता,या घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहूल गांधी व प्रियंका गांधी यांनी जी धाव हाथरसकडे घेतली आहे,ते ही पाच हजारांचा मोआब सोबत घेऊन यावर देखील बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
इंग्रजाच्या काळातही देशातील जमिनदार वर्ग हा इंग्रज राजवटीत खूशच होता,देश उद्या पेटला काय किवा भ्रष्टाचारामुळे विकल्या गेला काय?काही राजकीय नेत्यांना काहीच फरक पडत नाही कारण या देशातील जनता तेव्हा ही गुलाम होती,पुढे ही गुलाम झाले तरी त्यांना फरक पडणार नाही,एवढी गडगंज माया देशातील काह नेत्यांनी जमवून ठेवली असल्याचे म्हटले जात आहे.
दूसरीकडे अनेक बुद्धिजीवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची या घटनेबाबत नेमकी पॉलिसी काय?यावर माथाफोडी करीत आहेत.मोदी असो किवा अमेरिकेतील डोनाल्ड ट्रंप हे दोन नेते असे आहेत ज्यांच्यासाठी ’देश’हा सर्वतोपरी आहे.त्यांचे कोणतेही निर्णय हे देशाला समाेर ठेऊनच घेतल्या गेल्याचा दावा केला जात आहे. हाथरसच्या घटनेवर मोदी यांनी योगी आदित्यानाथ यांच्याशी चर्चा केली आणि आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश ही दिलेत.या पलीकडे ते शांत बसले.बुद्धिजीवी आता त्यांच्या या शांत क्रियेमागील मतितार्थ शोधण्यात व्यस्त आहेत…..!
‘दलित लिव्ह्स मॅटर’मागील गौडबंगाल-
हाथरसमधील घटनेविरोधात ट्वीटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ‘हॅश टॅग दलित लिव्हस मॅटर’ही मोहीम चालवली जात आहे.यात देशातील हिंदूझम व ब्राम्हण समाजावर अतिशय अशलाघ्य शब्दात टिका करण्यात आली आहे. हाथरसमधील सवर्ण समाजाकडून आरोपींच्या बाजूने जी आंदोलने सुरु आहे त्यावरही खालच्या पातळीवर टिका वाचायला मिळते.विशेष म्हणजे बरखा दत्त व स्वरा भास्कर या देशातील बुद्धिजीवींनी तर ’फ्रि इंडिया फ्रॉम हिंदूनिझम’ही मोहीमच चालवली असून याला ७० टक्के हो तर ११ टक्के नाही असे गुणांकन मिळाले आहे.
याचा संबध देशातील काही इतर बुद्धिजीवी हे अमेरिकेच्या निवडणूकीशी विशेषत: ज्यो बिडेन यांच्याशी जोडून बघतात आहेत.अमेरिकेचा सर्वात प्रसिद्ध दानशूर जाॅर्ज सुरस याच्याद्वारे भारतात ही लॉबी चालविली जात असल्याची तसेच फंडिंगची चर्चा आहे.अमेरिकेतील हिंदू मते ही या निवडणूकीत प्रभावी ठरणार असल्याने हा अजेंडा सेट करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे….!एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची दुहाई द्यायची दुसरीकडे त्याच संविधानाने देशात समान नागरिकत्वाचा हक्क दिलेल्या हिंदू धर्मिंयाना किवा ब्राम्हणांना देशाबाहेर काढून ‘फ्रि इंडिया फ्रॉम हिंदूइझम’अशी मोहिम चालविणा-यांचा दुटप्पीपणा व प्रोप्रोगंडा यावर देखील बराच वितंडवाद ट्वीटर हँडलवर वाचायला मिळतो…!




आमचे चॅनल subscribe करा
