फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनमांजरेकरांच्या निमित्ताने...

मांजरेकरांच्या निमित्ताने…

Advertisements

 शुक्रवार स्तंभ-‘कहानी पुरी फिल्मी है’

रेवती जाेशी-अंधारे

प्रभावशाली क्रिकेटविश्व, रूपेरी बॉलीवूड आणि निर्ढावलेलं अंडरवल्र्ड यांचा ‘भावबंध जुना आहे. या तिन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटी या ना त्या प्रकारे नेहमीच एकमेकांच्या संपर्कात आणि बरेचदा वादातही राहिले आहेत. प्रख्यात दिग्दर्शक – अभिनेते महेश मांजरेकर यांना अंडरवल्र्डकडून खंडणी मागणारे धमक्यांचे फोन आल्याच्या ताज्या घटनेच्या निमित्ताने, हा लेवा-देवा अजूनही सुरूच असल्याची शंका दृढ झालीय. धमक्या-खंडणी मागण्याची धमकी मिळाल्याची तक्रार याआधीही महेश भट, बोनी कपूर आणि राकेश रोशन दिग्दर्शकांसह अभिनेता शाहरुख खान यानेदेखील अशी तक्रार केली होती. पण, धमकी मिळणे आणि तक्रार करणे एवढ्यावरच न थांबता ही प्रकरणे पुढे जातात.

त्यापैकी, राकेश रोशन यांच्यावर तर २००२ मध्ये गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. ‘कहो ना प्यार है सुपरहिट झाल्यानंतर, त्यांच्याच ऑफीसच्या बाहेर झालेल्या या गोळीबारात राकेश थोडक्यात बचावले कारण गोळ्या त्यांच्या दंडाला लागल्या होत्या. मुंबईतील कुख्यात डॉन अलीबाबा बुदेश याने हा हल्ला करवला होता. या घटनेच्या तीन वर्षे आधीच म्हणजे १९९७ मध्ये टिसिरीजचे मालक गुलशन कुमार यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात दाऊद इब्राहीम आणि अबु सालेम यांचा सहभाग होता. अभिनेता शाहरुख खानला डॉन छोटा शकीलने बळजबरीने एका चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यावर चित्रपट तयार करण्यास सांगितले होते. तर ‘हॅपी न्यू ईयर ‘या चित्रपटानंतर अबु सालेमकडूनही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने त्याने सार्वजनिक मंचांवर सांगितले होते.

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेम-लग्नाच्या कहाण्या तर चालतच आल्या आहेत. पण, अंडरवल्र्ड आणि बॉलीवूडमध्येही अशी भावनिक गुंतागुंत आहेच. डिट्टो मधुबालासारखी दिसणारी अभिनेत्री सोना आणि एके काळी मुंबईचा ‘मालकङ्क म्हणून ख्यातीप्राप्त हाजी मस्तान यांचा विवाह खूप गाजला होता. दाऊद इब्राहिम आणि मंदाकीनी यांचे संबंधही जगापासून लपले नाहीत. बèयाच मोठ्या कंपन्यांना फायनान्स करणाèया डी कंपनीने, मंदाकीनीलाच चित्रपटात घेतले जाण्यासाठी आपली ‘ पावर ङ्क वापरल्याचं खुलेपणाने बोललं जात होतं. याच दाऊदने चित्रपट निर्माता जावेद सिद्दीकीला केवळ एवढ्याचसाठी जीवे मारलं कारण त्याने अनिता अयुब या दाऊदच्या आणखी एका जवळच्या मैत्रिणीला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. १९९५ मध्ये दाऊदच्या लोकांनी सिद्दीकीला थंड डोक्याने गोळ्या घातल्या होत्या. तेवढ्यापुरती चर्चा झाली आणि नंतर मात्र सारंच आलबेल झालं. ममता कुळकर्णी आणि विक्रम गोस्वामी यांना नुकतीच केनियामधून अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली असली तरी एका दशकापेक्षा जास्त काळ ती दुबईत त्याच्यासोबत सुखाचा संसार करीत होती. अबु सालेमनेच मोनिका बेदीला बॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्यात मदत केली आणि त्यासाठी ब-याच मोठमोठ्या दिग्दर्शकांना त्याने कसं धमकावलं ? हे जगजाहीर आहे. सध्या सालेम तुरुंगात आहे, हे विशेष !

फक्त प्रेम आणि भावनिक गुंतागुंत एवढ्यापुरतीच ही प्रकरणे मर्यादीत नाहीत. ग्लॅमरस बॉलीवूडमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. या आकर्षक दुनियेची दुसरी बाजू तितकीच घाणेरडी आहे. ९० च्या दशकात चित्रपटांतून मिळणा-या करोडो रुपयांच्या उत्पन्नात माफियांनी त्यांचा वाटा मागणं, हा गुन्हा न राहता एक शिरस्ता झाला. गँगस्टर लोकांनी चित्रपटांच्या निर्मितीत पैसा लावायचा, दिग्दर्शकाने त्याला ‘हप्ताङ्क द्यायचा या आर्थिक व्यवहाराचा पुढचा टप्पा गाठत, अंडरवल्र्डने क्रिकेटप्रमाणेच बॉलीवूडमध्येही ढवळाढवळ सुरू केली आणि परिस्थिती चिघळत गेली.

१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांनंतर, अभिनेता संजय दत्तला दाऊद आणि अबु सालेमसोबतचे संबंध, त्यांना मदत या आणि इतर गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली. संजय दत्तच्या एकूण प्रकरणानंतर, हा विषय चव्हाट्यावर आला. त्याचे वडील आणि तत्कालीन खासदार संजय दत्त यांचेही हाजी मस्तान सोबत चांगले संबंध होते. तर, सलमान खान आणि अनिल कपूर यांच्यासह आणखीही बड्या कलाकारांची दाऊद इब्राहीमकडे ऊठबस होती.

दादर पोलिस स्थानकात महेश मांजरेकर यांनी बुधवारी जीवे मारण्याच्या धमक्या तक्रार दाखल केली. ३४ कोटी रुपये खंडणीसाठी धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज करणा-याने आपण अबु सालेम टोळीचे असल्याचं सांगितलं म्हणे ! पूर्वेतिहास लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल केली आणि या माणसाला ताब्यात घेतलं. मिलद तुसणकर या ३४ वर्षीय युवकाची धारावीमध्ये चहाची टपरी आहे. कोरोनामुळे त्याने दुकान बंद करून गावी म्हणजेच खेड इथे जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून हे धमकीचे कॉल-मेसेज तो करीत होता. तो खरोखरच अबु सालेमचा माणूस आहे का? हे तर पोलिसांच्या तपासात स्पष्ट होईलच. पण, त्याने मांजरेकरांना दिलेल्या धमक्यांच्या निमित्ताने इतिहासाला वाचा फुटली, हे मात्र खरं !
.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या