फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमहल्ल्यातील पिडीतेचा खर्च शासनाच्या वतीने करण्याचा प्रयत्न:आ.डॉ.नीलम गोऱ्हे

हल्ल्यातील पिडीतेचा खर्च शासनाच्या वतीने करण्याचा प्रयत्न:आ.डॉ.नीलम गोऱ्हे

Advertisements

नगर जिल्ह्यातील सुपा येथील फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर जीवघेणा हल्ला दि.१४ ऑगस्ट रोजी करण्यात आला होता. याबाबत शिवसेना प्रवक्त्या तथा स्त्री आधार केंद्रच्या अध्यक्षा आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून या घटनेचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आ.डॉ.गोऱ्हे यांनी पीडित मुलीवर उपचार करणारे डॉ. विजय जगताप यांना दूरध्वनी वरून संपर्क करून मुलींच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल विचारपुस केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे व नगरचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे निवेदन देऊन मुलीच्या ऊपचाराची व्यवस्था शासनाच्या योजनेतून करण्याची विनंती केली.

याशिवाय सुपा पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना संपर्क करून मुलीच्या संरक्षणासाठी महिला पोलीस कर्मचारी नेमण्याची सूचना केली. याचबरोबर सुपा,नगर शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबाना औषधासाठी आर्थिक मदत देण्याची सूचना तालुकाप्रमुख विकास रोहोकाळे यांना केली आहे. पीडित कुटुंबाशी आ.डॉ.गोऱ्हे यांनी संपर्क करून त्यांना ‘घाबरू नका शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, काहीही आवश्यकता वाटली तर मला संपर्क करा’ असा धीर पीडीत कुटुंबाला दिला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या