

बिनतारखेचे दस्त दिले: मानसिक फसवणूकीचा केला आरोप
नागपूर,ता. १० ऑगस्ट: ॲड.सतीश उके यांनी सदर पोलीस ठाण्यात माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बनावट दस्तावेज देऊन मानसिक फसवणूची तक्रार दाखल केली आहे.हे दस्तावेज त्यानी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिले,या विरोधात भा.द.वि.चे कलम ४१७,४६८ प्रमाणे उके यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी ही तक्रार सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष् क यांना सादर केली.
तक्रारीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सच्चिदानंद सिंग व एअनआर विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणातील न्यायनिवाड्याचे ३ फेब्रुवारी १९९८ सालचे उदाहरण दिले आहे. यात सीआर पीसीचे कलम १९५(१(ब)प्रमाणे न्यायालयाच्या बाहेर घडलेल्या अपराधिक कृत्याच्या विराेधात फौजदारी कारवाई करण्यास बाधा येत नाही,ही माहिती सादर करण्यात आली.
तक्रारीत ॲड. उके यांनी त्यांना मूर्ख बनविणे आणि कायदा काही बिघडवू शकत नाही हे त्यांना अरेरावीने दाखविण्याकरिता फडणवीस यांनी दोन बनावट दस्त(नोटरी)तयार करुन दि. ८ जून २०१५ रोजी त्यांच्या प्रति वकिलामार्फत त्यांना देण्यात आल्या व त्यावर फडणवीस यांचे वकील ॲड.डी.वी.चव्हाण यांचे नाव लिहलेले असून त्यांची सही देखील आहे. या दोन्ही दस्तांच्या शेवटी SOLEMN AFFIRMATION यात नमूद प्रमाणे हे दोन्ही दस्त दि. ८ जून २०१५ रोजी नोटरी श्री. नंदेश.एस.देशपांडे यांचे समक्ष् दि.३१ मे २०१५ रोजी शपथ घेऊन नोटरी करण्यात आले आहेत असे दि. ८ जून २०१५ रोजी तयार केलेले हे दस्त,ते तयार होण्यापूर्वीच दि.३१ मे २०१५ रोजी त्यावर शपथ घेऊन त्यावर नोटरी करता येणे निसर्ग वेळक्रमाने शक्य नाही, यावरुन हे दस्त बनावट तयार करण्यात आले आहेत आणि मला मूर्ख बनविण्यात आले असल्याचे ॲड.उके यांनी तक्रारीत नमूद केले.
देवेद्र फडणवीस हे त्यावेळी मुख्यमंत्री असल्याने कायदा त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही हे अरेरावीने दाखविण्याचे कृत्य करुन माझी मानसिक फसवणूक केल्याने फडणवीस यांनी भा.द.वी.चे कलम ४१७,४६८ प्रमाणे गुन्हा करावा अशी मागणी ॲड.उके यांनी तक्रारीत नमूद केली.
यानंतर दि. ६ जुलै २०१८ रोजी फडणवीस यांनी त्यांचे वकील यांच्यामार्फत मला मूर्ख बनविणे आणि कायदा त्यांचे काही बिघडवू शकत नाही हे मला अरेरावीने दाखविण्याकरिता फडणवीस यांनी बनावट दस्त तयार करुन त्यांच्या वकीलामार्फत मला दिला आणि त्याआधारे माझी मानसिक फसवणूक केली आहे.हा दस्त मला उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या परिसरात देण्यात आला. हा दस्त त्यावर नमूदप्रमाणे दि.२ जुलै २०१८ रोजीच तयार करण्यात आले.त्यासमाेर फडणवीस यांचे वकील ॲड.यू.पी.डबले यांचे नाव नमूद असून त्यावर त्यांची सही देखील आहे.
SOLEMN AFFIRMATION यात हा दस्त ३ जुलै २०१८ रोजी नाेटरी श्री.नंदेश एस.देशपांडे यांचे समक्ष् ….जुलै २०१५ रोजी शपथ घेऊन नोटरी करण्यात आले आहे.या दस्ताच्या पहील्या पानावर सुद्धा दि….जुलै २०१५ असाच ‘बिनतारखेचा’लिहलेला आहे!
असा‘ बिनदिवस,बिनतारखेचा’ तयार केलेला दस्त बनावट तयार करण्यात आलेला असून मला मूर्ख बनविणे व फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याकारणाने कायदा त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही हे मला सिद्ध करण्यासाठी केलेले बेकायदेशीर कृत्य आहे. यामुळे माझी मानसिक फसवणूक झाली असून फडणवीस यांनी पदाचा गैरफायदा घेऊन भा.द.वी.चे कलम ४१७ व ४६८ प्रमाणे गुन्हा केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार करीत असल्याचे ॲड.उके यांनी नमूद केले.




आमचे चॅनल subscribe करा
