फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममहाराष्ट्राचा बिहार झाला आहे का?

महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का?

Advertisements

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे तार ठाकरे परिवारापर्यंत पोहोचल्याची माध्यमांमध्ये चर्चा!

नागपूर,ता. ४ ऑगस्ट: सुप्रसिद्ध अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांनी १४ जून रोजी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची नोंद मुंबई पोलिसांच्या पोलीस डायरीत जरी झाली असली तरी सुशांतसिंह यांच्या वडीलांनी बिहारच्या पोलीस ठाण्यात सुशांतसिंह यांची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात एफअायआर दाखल करताच,महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत.बघता-बघता सोशल मिडीयामध्ये हे तार चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना संशयाच्या भोव-यात घेण्यापर्यंत पोहोचले व या प्रकरणाला राजकीय वळण लागले.

पुढे बिहार पोलीसांचे चौकशीसाठी मुंबईत आगमन,त्यांना चौकशीत कोणतीही मदत न करण्याचे मुंबई पोलीसांवर होणारा आरोप, नुकतेच पाटण्याचे पोलीस अधीक्ष् क विनय तिवारी यांना विमानतळावरच बृहन्नमुंबई मनपाच्या चमूद्वारे कोरोन्टाईनचा शिक्का हातावर मारुन १४ दिवस विलगीकरणात राहण्यास बाध्य करणे,सीबीआय चौकशीची मागणी धुडकावणे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीसाठी केलेली मागणी,काँग्रेस पक्ष् महाराष्ट्रात महाविकासआघाडीत शिवसेनेसोबत असल्याने काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पत्र-परिषदेत नितीश कुमार यांच्या मागणीचा केलेला विरोध या सर्व ‘हाय प्रोफाईल’घडामोडींमुळे ’महाराष्ट्राचा बिहार तर नाही झाला ना?’अशी शंका येण्यास वाव मिळतोय.

एका तरुण,उम्दा,देखणा,प्रतिभावंत,लोकप्रिय कलावंत सुशांतसिंह राजपूतचे असे अचानक जग सोडून जाणे हेच मूळात अनेकांच्या गळी उतरत नव्हते.इतरांना जगण्याची उर्मी देणारा सुशांत हा स्वत:गर्भगळीत होऊन आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय पत्करेल,यावर कोणाचाच विश्‍वास बसला नाही. त्याच्या कोरियोग्राफरने देखील हेच सांगितले ’तुम्ही दहा वर्षांनंतर जरी मला विचारले की सुशांतसिंहने नैराश्‍यात आत्महत्या केली का?तर माझे उत्तर तेव्हाही नाही असेच असेल,ज्याने मला २००७ मध्ये आत्महत्येपासून परावृत्त केले तो तर २०२० मध्ये कुठल्या कुठे पोहोचला होता,अश्‍या मुकामवर पोहोचलेला एक लोकप्रिय अभिनेता आत्महत्या करुच शकत नाही’. सुशांतच्या बहीणी व वडील यांना देखील सुशांतच्या आत्महत्येविषयी शंका असल्याने त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चाैकशीची मागणी केली.
सुशांत याने आत्महत्या नंतर त्याच्या कुटुंबियांचा जवाब नोंदवला गेला तेव्हा त्यांनी कोणतीही शंका उपस्थित केल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कालच्या पत्रकार परिषदेत म्हटले मात्र एक तर त्यावेळी त्याचे कुटुंबिय हेच जबर मानसिक धक्क्यात होते,दूसरे सोशल मिडीयामुळे अनेक ’तथाकथित तथ्य’हे त्यांच्या समोर आल्याने त्यांना आता त्यांच्या लाडक्या भावाच्या ’आत्महत्या कि हत्या’याचे सत्य उत्तर हवे आहे,म्हणून त्यांनी अशी मागणी केली.

सध्या यू-ट्यूबर सुशांतच्या आत्महत्येची रचलेली कथा ही भंकस असून त्याची त्या रात्री सुनियोजितपणे हत्या करण्यात आल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीयो व्हायरल झाले असून यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार घेण्यात आले आहे.सिमी शर्मा यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली असून याच संबंधीची एक पोस्ट इंस्टाग्रामवर देखील व्हायरल झाली.

असे जोडले घटनेचे धक्कादायक तार-
९ जून रोजी सुरज पांचोली याने दिशा सालयान हिला आपल्या पेंटहाऊसमध्ये पार्टी असल्याचे सांगून निमंत्रण दिले.दिशा त्या दिवशी पार्टीमध्ये जाण्यास अजिबात इच्छूक नव्हती कारण गेल्या अनेक दिवसांपासून तिचे आणि सूजच पांचोलीचे मतभेद सुरु होते.ही गोष्ट दिशाचा मित्र पुनीत वशिष्ठने सांगितली.दिशा एकटी त्या दिवशी पेंटहाऊसमध्ये रात्री ८ वाजता पोहोचली. या पार्टीत अादित्य ठाकरे,सिेद्धार्थ पिठानी,संदीप सिंह,रिया चक्रवर्तीचा भाऊ शौमिक चक्रवर्ती,अरबाज खान व इतर काही बॉलिवूड तारे होते.

त्या रात्री दिशावर या लोकांनी बलात्कार केला!यानंतर तिला १४ व्या मजल्यावरुन खाली फेकून देण्यात आले!मात्र या दरम्यान तिने सुशांतला फोन करुन तिच्यावर गुदरलेली घटना सांगितली होती. सूरज पांचोली,आदित्य ठाकरे यांना दिशाने ही गोष्ट सुशांतला सांगितली असल्याचे कळाले,त्यात सुशांतने ही बाब रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ संदीप सिंह यांना देखील सांगितली. रियाने तिच्या भावाचे नाव मध्ये आल्याने त्यालाच धमकी देण्यास सुरवात केली.यामुळेच सुशांतने ९ जून ते १३ जून दरम्यान १४ सिम बदललेत.
रियाने ही गोष्ट दिग्दर्शक महेश भट यांना सांगितली.भट यांनी रियाला सुशांतचे घर सोडण्यास सांगितले.रियाने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला.सुशांत आणि रियाचे भांडण दिशाला घेऊनच झाले कारण सुशांत ला दिशाला न्याय मिळवून द्यायचा होता.मात्र रियाचा भाऊ स्वत: या बलात्कार कांडात सहभागी होता त्यामुळे रिया सुशांतला चूप राहण्यास सांगत होती. तो वेडा आहे हे जगाला सांगेल म्हणून धमकी देत होती.

याचवेळी संदीप सिंहने आदित्य ठाकरे व अरबाज खानला सांगितले की सुशांत हा गप्प बसणार नाही. तो कधीपण माध्यमांसमोर सत्य उजागर करेल. त्याच वेळी या सर्वांनी आदित्य ठाकरे यांच्या घरी सुशांतचा गेम करण्याची योजना आखली.सुशांतच्या हत्येचा कट आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच रचण्यात आला. १३ जून रोजी सुशांत या जगात नव्हता! १२ जून रोजी सुशांत हा खूप खूश होता कारण या दिवशी त्याने रुमी जाफरीसोबत एक नवा प्रोजेक्ट साईन केला होता.

रुमी जाफरी यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की जूनच्या पहील्या आठवड्यात सुशांतसोबत ही डील झाली होती. मात्र सुशांतला जेव्हाही कॉल केले तेव्हा त्याचा फोन रिया उचलत होती. सुशांतने या प्रोजेक्टच्या आनंदात १३ जून रोजी एक पार्टी दिली. रात्री १०.२० मिनटाच्या जवळपास आदित्य ठाकरे हे देखील सुशंातच्या पार्टीत पोहोचले,ज्याची सीसीटीव्ही फूटेज सुशांत यांच्या समोरच्या बिल्डींगच्या कॅम-यात कैद झाली. पार्टीनंतर सुशांतचा गळा हा त्याच्या कुत्र्याच्या पट्टयानेच आवळण्यात आला,आता ज्या मर्डर केसमध्ये स्वत: मुख्यमंत्र्यांचाच मुलगा हा सहभागी असेल ,सलमान,अरबाज खानसारखे स्टार सहभागी असतील त्याची चौकशी सीबीआयकडे महाराष्ट्राची सरकार कशी काय देईल?

असा सवाल मिरा सिंग यांनी आपल्या वॉल वर केला आहे जी पोस्ट सिमी शर्मा यांनी व्हायरल केली.
दूसरीकडे सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या होणा-या पतीच्या घरी ८ जून रोजी पार्टी होती,पार्टीत तिच्या भावी पतीसह आणखी चौघे होते.त्यांचे जवाब नोंदविण्यात आले असून सीसीटीव्ही तपासण्यात आले आहे,पार्टीत कोणतेही राजकीय नेते नव्हते,असे मुंबई पोलीसांचे म्हणने आहे.

आजवर बिहार राज्याची एकूणच कायदा व सुव्यवस्था यावर महाराष्ट्राच्या मिडीयाने,राजकारणींनी भरपूर तोंडसुख घेतले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या ’अात्महत्या कि हत्या’या संशायाचे लोण आता मात्र ज्या दिशेने जात आहे,त्यावरुन महाराष्ट्राचाही बिहार झाला का?असा प्रश्‍न एका नेटीझननेच सोशल मिडीयावर विचारला आहे.दिशा सालियान व सुशांतसिंह राजपूत या तारुण्यातच गेलेल्या या दोन्ही जिवांच्या ’आत्महत्या कि हत्या’याचे रहस्य मुंबई पोलीस सत्यतेने उलगडेल का?हा प्रश्‍न उरतोच. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीसांची एकंदरित कार्यशैलीच आता संशयाच्या भोव-यात आली आहे.

एकीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्याची मागणी करतात तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे रोहीत पवार यांनी मात्र ही मागणी धुडकावून लावली.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या प्रकरणाचा बिहारमध्ये लवकरच होऊ घातलेल्या निवडणूकीत फायदा करुन घ्यायचा असल्याचे देखील बोलले जात आहे.

एकंदरित राजकारणाचा ’डर्टी गेम’तूर्तास जरी बाजूला सारला तरी एक उम्दा,तरुण कलावंत ऐन उमेदीच्या वयात या जगातून कायमचा निघून गेला आहे,हे त्याचे फॅन्स कधीही विसरु शकणार नाही. त्याचे वृद्ध वडील,चार बहीणींचे दू:ख हे सुशांतला आता न्याय मिळाल्यावरच दूर होऊ शकेल,यासाठीच त्यांची लढाई सुरु झाली आहे,असेच आता म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या