फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनवविवाहित मुलीच्या हत्येबाबतचा अँड.उज्ज्वल निकम तपास घेण्यास तयार

नवविवाहित मुलीच्या हत्येबाबतचा अँड.उज्ज्वल निकम तपास घेण्यास तयार

Advertisements


आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश: .मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुखांकडे करणार पाठपुरावा

नागपूर,ता. ४ जुलै: मंठा,जिल्हा जालना येथील एका नवविवाहित १९ वर्षाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून गावातीलच मुलाने दि ३० जून २०२० रोजी भरदिवसा गळा चिरून हत्या केली. या मधील आरोपीवर मंठा पोलीस स्टेशन, जिल्हा जालनामध्ये  गुन्हा नोंद झाला आहे व आरोपीला तात्काळ अटक झाली आहे. याघटनेत वरिष्ठ वकील नेमण्याची मागणी केली होती. याबाबत आ.डॉ.गोऱ्हे यांनी जेष्ठ विधी तज्ञ अँड.उज्ज्वल निकम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांना सदरील केस घेण्याची विनंती केली. तातडीने आ.डॉ.गोऱ्हे यांनी केलेली विनंती मान्य करून ही केस स्वतः लढविण्यास तयार असल्याचे अँड.उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अँड.उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्तरावरील पाठपुरावा आ.डॉ.गोऱ्हे ह्या करत आहेत.

तपास पारदर्शक होत नसल्याची तक्रार करीत सामाजिक कार्यकर्ते तसेच खा.संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे यांनी शिवसेना प्रवक्त्या तथा विधानपरिषद माजी उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे मागणी केली होती. या घटनेचे गांभीर्य व क्रूरता पाहता मंठा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास निकम यांच्याकडून यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून वरिष्ठ स्तरावरून ह्या केसचा तपास होणे आवश्यक आहे. त्यासाठी परतूर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे हा तपास देऊन जालना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक  राजेंद्रसिंह गौर यांना या तपासात समाविष्ट करून घेण्यात यावे अशी सुचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या आहेत.

तसेच ह्या तपासाचे नियंत्रण थेट आपल्याकडे राहणे आवश्यक आहे याबाबत पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी तात्काळ दखल घेऊन लवकरच परिपत्रक काढतो असे आ.डॉ.गोऱ्हे यांना सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या