

शहरातील ज्येष्ठ कलावंत..काेरोना आणि सहावा सांस्कृतिक लॉकडाऊन!
डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.३० जून: पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशाच्या नावे संबोधनात आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी नागरिकांनाच जवाबदार धरीत ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत पहील्या लॉक डाऊनमध्ये दिलेली काही अंशी शिथिलता यात कोणताही बदल केला नाही. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील ६ वा. लॉक डाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. परिणामी इतर अनेक निर्बंधांसोबतच सांस्कृतिक निर्बंधही अद्याप कायमच असणार आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सांस्कृतिक कार्यक्रम हे पूर्णपणे बंद आहेत. कलावंतांचं सुरमयी विश्व हे पूर्णत: मूक आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नागपूरचे कलाविश्व अतिशय शांत आणि नि:शब्द आहे.
कोरोना विरोधात लढाईत प्रत्येकजण आपापल्या परीने लढत आहे.ताळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बंंद आहेत.महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत नाट्यक्ष्ेत्र, चित्रपटांचे,मालिकांचे चित्रिकरण याला जसा फटका बसला तसाच राज्याच्या उपराजधानीत नागपूरात देखील मनोरंजन क्ष्ेत्रातील कलावंतांना बसला आहे..
२१ मार्चच्या जनता कफ्यूनंतर देशात २३ मार्चच्या रात्री ८ वा.पासून संपूर्ण देशात ‘अनिश्चितकाळाचा’ असा लॉक डाऊन लागणार आहे,याची कल्पनाही नागरिकांनी केली नव्हती मात्र लॉक डाऊन सुरु झाला आणि….तो आतापर्यंत माणसाच्या जगण्या-मरणाच्या सोबतच सुरु आहे. नागपूर शहरातही यापेक्ष्ा वेगळी परिस्थिती नाही. एकेकाळी संगीताच्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती की श्रोते मिळत नव्हते,आता श्रोते त्या हरवलेल्या,…..सरकारी आदेशात बंदिस्त झालेल्या सुरांची वाट बघत आहेत.
१९७० पासूनचाऑकेस्ट्रा जगतातील सुवर्ण,लखलखता काळ ज्या कलाकारांनी अनुभवला,ते काय विचार करतात यासांस्कृतिक ‘लॉक डाऊन’ विषयी याबाबत खास ‘सत्ताधीश’ने मागोवा घेत काही ज्येष्ठ व सुप्रसिद्ध कलाकारांचे अंर्तमन जाणून घेतले.

कमी गर्दी ठेऊन शो करणे स्पॉनसररलाच परवडणार नाही- पवन मानवटकर(ज्येष्ठ की-बोर्ड वादक)
कार्यक्रम म्हटले तर गर्दी तर होणारच.आणि जिथे गर्दी तिथे कोराना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता ही सर्वाधिक असणार.हॉल समजा उघडले तरी कमी गर्दी ठेऊन किवा हॉलमध्ये लांब अंतरावर श्रोत्यांना बसवून कार्यक्रम करायचे झाल्यास ते शो स्पॉसररला तरी परवडणार आहे का?सर्वात महत्वाचे म्हणजे पब्लिक जवळ पैसा नाही.विक्री नाही,व्यवसाय ठप्प आहेत.विक्रेते हे नुसते दूकाने उघडून ग्राहकांची वाट बघत आहेत.
चार लाेकं एकत्र मिळून शो टाकतो म्हणावं तर श्रोत्यांना दूर-दूर बसवावे लागेल. ४०० च्या ऐवजी १५० श्रोतेच शो चा आंनद घेऊ शकतील. वादक,गायक कलावंतांची मेहनत तर तितकीच राहणार मात्र शो चा आनंद मिळेल का? गाण्यांची रिहर्सल असते,त्यावर मेहनत असते. गर्दीशिवाय शो ची कल्पना नाहीच करता येत त्यामुळे जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. नुसता शो टाकला म्हणजे त्याचा प्रभावच राहत नाही. याशिवाय लोकांच्या मनातली भिती…ती कशी दूर करणार?अद्याप जिथे भितीमुळे शाळाच सुरु झाल्या नाहीत तिथे कार्यक्रमांना तरी श्रोते येतील का? सरकारकडे सध्या तरी लॉक डाऊन शिवाय दूसरा मार्गच नाही.पर्याय ही नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑन लाईन कार्यक्रम करण्याची धडपड काही कलावंतांची सुरु आहे. जोपर्यंत ‘कोरोनाचा काळ’संपत नाही तोपर्यंत नागपूरात कार्यक्रम ही होऊ शकणार नाहीत.

माझासारखा स्पष्टवादी कलाकार आधीपासून ‘कोरोना’सारखा प्रभाव भोगतोय!रघूनंदन परसतवार(ज्येष्ठ ताल-वादक)
कोराना तर आता आला. माझ्यासारखा स्पष्टवादी आणि परखर,खरे बोलणारा,ऐकवणारा कलाकार तर नागपूर शहराच्या कलांवतांच्या कंपूगिरीत कोरानासारखा प्रभाव हा तर गेल्या अनेक वर्षांपासून भोगतोय. अनेक संगीत संचांच्या संचालकांनी मला ‘बॅन’करुन ठेवले आहे.मी तसा ही वर्षातून तीन-चार महिने हा रिकामाच राहीलो आहे.कोरोनाची मार ही तर देवाने ‘त्या’कलाकारांवर आता आणली आहे.कोराेनाच्या या काळात तरी स्वत:ला कलाकार म्हणवणा-यांनी आपली मने ज्येष्ठ कलावंतांसाठी स्वच्छ आणि निर्मळ करावी.आपल्या वर्तवणूकीसाठी मागी मागवी देवाकडे.माझी कर्मे चांगली आहेत त्यामुळे एवढी वर्षे न्यायालयाीन लढाई लढल्यानंतर माझी बँकेची पेंशन आताच सुरु झाली आहे.माझे मुंबईचे कार्यक्रम ही रद्द झालेत.तरीही मी जे ‘खरे’कलावंत आहेत मी त्यांची लॉक डाऊनच्या काळात आर्थिक मदत केली.कोणीतरी कोणासाठी तरी धावून येतंच असतो. मात्र काही कलावंतांना लवकर गर्व चढतो. एका दिवसात ते तीन-तीन कार्यक्रम करीत होते,विशेष म्हणजे या कार्यक्रमांची रिहर्सल करण्याचाही वेळ त्यांच्याकडे नसायचा.कलेच्या नावावर फक्त पैसे छापण्याचा ‘कार्यक्रम’सुरु होता. म्हणून आता कोराेना अखरत आहे. संगीताचं दुसरं नावच ‘शिस्त’आहे. रिहर्सलमध्ये मी नव्या पिढीच्या कलावंतांना शिस्त लावायला जायचो तर हा त्यांना त्यांचा ‘अपमान’वाटायचा. मुंबईत मी इतके शो करतो,तिथे फक्त आणि फक्त ‘शिस्तच‘चालते. अनेक मोठ मोठे गायक,वादक संगीतकारांनी फक्त शिस्तीच्या नावाखाली घरी बसवली.
आधीच्या गाण्यांनाही एकप्रकारची शिस्त होती.आजही आपल्या महाराष्ट्रात असे अनेक संगीतप्रेमी आहेत जे १९८५ नंतरच्या काळातील संगीताला संगीत मानत नाही! याशिवाय मुंबई-पुणे आणि नागपूरच्या श्रोतृवर्गामध्ये खूप फरक आहे.पश्चिम महाराष्ट्राचे दर्शक किवा श्रोते हे नागपूरच्या श्रोत्यांसारखे संगीताच्या नावाखाली काहीही ऐकून घेत नाहीत.येथील काही कलावंतांनीही संगीत क्ष्ेत्राला अतिशय घाणेरडं क्ष्ेत्र करुन ठेवलं आहे. माझे विचार परखड आहेत आणि ते ‘जसेच्या तसेच उमटले पाहिजे’
ज्या कलावंतांचे पोट संगीत क्ष्ेत्रावर निर्भर आहे त्यांनी देखील आता इतर काम करावे. संगीत हे निखळ आनंद देणारे क्ष्ेत्र असून पोट भरण्यासाठी मात्र यावर अवलंबून राहता येत नाही,हे कोरोनाने सिद्ध केले. लॉक डाऊन पाळणे हे गरजेचे मी मानतो. हॉल शो सध्यातरी सुरु करणे शक्य नाही आणि पावसाळ्यामुळे बाहेर लॉन्समध्ये शो होऊ शकत नाही.तसेही नागपूरचे लाेकं हे अतिशय बेजवाबदारीने वागत असून दररोज बाधितांची संख्या वाढवितच आहे. ‘जान है तो जहान है’ बरेच नियम शिथिल झाले,कधी ना कधी आपले संगीत हे देखील नक्कीच ‘कोराेनामुक्त’होईलच.

संगीत के मंदिर मस्जिदही बंद हो गये-एम.ए.कादर(संचालक,कादर ऑकेस्ट्रा)
शहरात लॉक डाऊनसारखं काही वाटतच नाही. लोकं बिनधास्तपणे कोणतीही काळजी न घेता,कारणाशिवायही घराबाहेर पडत आहेत.यामुळे कारोनाचा संसर्ग हा आटोक्यात येत नाही.यामुळे सरकार देखील लॉक डाऊन पूर्णपणे उठवित नाही.सरकारचे नियोजन चुकले कि जनता चुकत आहे,नाही सांगता येणार मात्र निश्चितच कलाकारांचे जगणे हे कठीण झाले आहे. सरकारचा आदेश आहे तर पालन तर करावेच लागेल. कोराेनामुळे सगळीकडे मला फक्त ‘विरोधाभास’दिसत आहे.मधला रस्ता ही सापडत नाही.ना सरकारला ना जनतेला. मात्र लवकरात लवकर सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत माय-बाप सरकारने काहीतरी ठोस मार्ग शोधायला हवा,काढायला हवा.
सरकार सर्वांची मदत करतेय,सर्वांसाठी योजना जाहीर करतेय,खूप चांगलं काम करीत आहे. मजूरांसाठी सरकार धावून आली मात्र कलाकार हे देखील अगदी मजूरांसारखेच आणि तेवढ्यात अडचणीत आहेत. कलाकारांसाठीही सरकारने काही तरी नाही मदत तरी किमान ‘सवलत’जारी करावी. लांब अंतर ठेऊन कार्यक्रम करु देण्याची परवानगी द्यावी. आमच्यासाठी तर कला हीच आमची मंदिर-मस्जिद आहे.सुरांशिवाय,गाण्यांशिवाय,संगीतशिवास जगणे हे खूप निरस वाटत आहे. सरकारने परवानगी दिली तर लवकरच संगीत वर्ग नियमांचे पालन करुन सुरु करण्याचा विचार आहे. कलाकारांच्या परिस्थितीवर मी तर राज्य शासनालाही पत्र पाठवले आहे.
आम्हाला आता सुरेश भट, देशपांडे सभागृह इ.मोठ्या सभागृहात सुरक्ष्ति अंतर राखून कार्यक्रमास परवानगी देण्यात यावी.गेल्या तीन महिन्यांपासून अनेक कार्यक्रम रद्द झालेत मात्र पुढील काळ आणखी कठीण होणार आहे,याची तसदी सरकारने घ्यावी.

सरकारने मार्ग शोधायलाच हवा-अशोक ठवरे(ज्येष्ठ ड्रम प्लेअर)
कलाकारांची आर्थिक आणि म्हणाल तर मानसिक परिस्थिती ही गंभीरच आहे.सरकारनेच आता यातून मार्ग शोधायला हवे. कसे जगतो?घरी कोणते तान-तनाव सहर करतोय?याची वाच्यता कोणताही स्वाभिमानी कलाकार हा बाहेर करणार नाही मात्र परिस्थती गंभीर आहे हे सत्य आहे. एखाद्या महिन्याची अडचण सामान्य माणूस सांभाळून घेतो मात्र गेल्या तीन महिन्यांपासून एक ही कार्यक्रम नाही,आवक नाही,शिवाय पैश्यांच्या नुकसानीचं काहीच नाही. गुढीपाडवा गेला,रामनवमी,हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचेही शो रद्द झाले.आता पुढे याच महिन्यात ३१ जुलैचा मोहम्मद रफी पुण्यतिथीचेही शो रद्द होणार.पुढे गणपती-दूर्गोत्सवचेही कार्यक्रम होणारच नाही.लॉक डाऊन एवढ्या प्रदीर्घ काळासाठी असतो का?गरजेचा असला तरी मग कलाकारांसाठी काही तर करा!
कार्यक्रम म्हटले तर गर्दी ही असणारच.सरकारला गर्दी नको आहे म्हणून आतापर्यंत घरीच बसलो,पुढे ही घरीच बसावे लागणार आहे. संघटना नसल्यामुळे कलाकारांचे कोणी ऐकत ही नाही.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे,पालकमंत्री नितीन राऊत नागपूरचे,अनेक आमदार,नगरसेवक यांनी सर्वांनी मिळून आता काही तर ठोस उपाय करायला हवा?लोककलावंतांना सरकारी मदत मिळाली कारण त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत,नोंदणी आहे.आमच्या बोटात फक्त कला आहे!आम्ही या नेत्यांच्या मदतीतील कोणत्याही ‘कॅटेगिरीमध्ये बसत नाही’.लोककलावंत कमी कार्यक्रम करतात तरी देखील सरकारी मदत,पेंशन,मानधन त्यांना सरकार देते.आम्ही तर वर्षभर संगीताची आराधना करतो.पण‘ धन’ तर सोडा साधा ‘मान’ही सरकार देत नाही.श्रोत्यांच्या टाळ्या हीच आमची जगण्याची उर्जा.
अनेक राजकीय नेत्यांच्या पाटर्यांमध्ये आम्ही कलावंतांनीच त्यांच्या पार्टीची रौनक वाढवली,त्यांनी काय वाढवले?तर कोरानाच्या काळतही पेट्रोलचे दर,टमाटरचे दर आणि वीजेचे दर!आधीच लॉक डाऊनमुळे घरात बसलेल्या सामान्य माणसाचे सरकारने कंबरडे मोडले. कलाकारांचा कोणीही वाली नसतो,शेवटी हेच खरे.आणखी ३१ दिवसांचा लॉक डाऊन म्हणजे,सरकारला एक दिवसाचा लॉक डाऊन वाटत असावा,कारण त्यांचे पोट भरलेले असते,आमच्यासमोर पुन्हा आणखी एक महिना….कसा प्रपंच चालवायचा…हा प्रश्न अनुत्तरीत आहे….!

अपने पास भी मार्ग नाही-योगेश ठक्कर(संचालक,योगेश ठक्कर ऑकेस्ट्रा)
सरकार जे म्हणते आहे,सांगते आहे ते गपगुमान ऐका. सरकारजवळ लॉक डाऊनशिवाय दुसरा मार्ग नाही तसाच तो आपल्या सारख्या कलाकारांकडे देखील मार्ग नाही.३१ जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवला,तसाच तो आणखी ही पुढे वाढत राहू शकतो. आता पर्यंत पाच लॉक डाऊनमध्ये आपण जगलोच ना?पुढे ही हिंमत कशाला हरायची?पैसे नही है ठिक है मगर जिंदगी बेशकिमती है!आणि फक्त कलाकारांवरच आभाळ कोसळले आहे का?चहा टपरीवाले,सलूनवाले,हॉटेलवाले सगळेच भयंकर अडचणीत आले आहेत.ज्या दिवशी कोरोनावरची लस मिळेल त्याच वेळी या भयंकर समस्येवरचे समाधान मिळेल,एवढेच मी सांगू शकतो.

‘कलाकार भूक से मर रहे’हा शब्दच अपमानजनक वाटतो-रमेश खांडेकर(संचालक,खांडेकर ऑकेस्ट्रा)
गेल्या तीन महिन्यांपासून सोशल मिडीयावरील अनेक व्हॉटस ॲप ग्रूप्सवर अनेक व्हिडीयो हे नागपूरातील कलावंतांच्या आर्थिक स्थितीवर येत आहेत.एका लोकल वाहीनीवर तर काही कलाकारांच्या मुलाखती ऐकल्या. लॉक डाऊनच्या काळात ‘कलाकार भूक से मर रहे है’अश्या शब्दात दु:खं व्यक्त केले जात आहे मात्र कलाकारांसाठी असे शब्दच खूप अपमानजनक वाटतात!‘कला’ही तर अभिमानाची गोष्ट आहे.अनेक असे कलाकार आहेत त्यांना कोणताही शौक नाही.त्यांच्यासाठी मात्र सरकारनेच काहीतरी मदत करणे गरजेचे आहे. जे कलाकार जेवणासाठी पैसे नसल्याची तक्रार करतात त्यांच्याकडे ‘शौक’साठी मात्र बरोबर पैशांची तजवीज असते.अश्यांना मदतीची गरजच नाही,माझे हे स्पष्ट म्हणने आहे.कोरोनाचा सध्या तरी कोणताही ‘अंत’ दिसत नाही.मात्र मार्ग काढता आला पाहिजे..
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून गिटार क्लासेस ही बंद आहे.ईश्वराची ही निश्चितच कृपा आहे की कलेमुळेच आतापर्यंत खूप नाही पण ‘दो जून की रोटी ही ’गिटारनेच दिली. कला बोटात आहे,काळजात आहे,सर्वदूर माध्यमांमध्ये आज कोरोनामुळे फक्त आणि फक्त ’भीती’चे वातावरण आहे मात्र,गिटारवर एखादी धून छेडताच,दोन चार गाणी वाजवताच, माणूस कोरोनाला पार विसरुन जातो.कोरोनाची आठवण ही येत नाही. संगीतमध्ये एवढी जादू आहे. हा ही काळ निघूनच जाईल. कोरोना हा काही कायमचा मुक्कामाला आपल्यासोबत नाही.फक्त काळजी घेणे गरजेचे आहे.
माझ्या मते योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रमांनाही परवानगी आता सरकारने द्यावी.आजकाल संगीत संचातील विद्यार्थी हे कार्यक्रमांसाठी कॉन्ट्रीब्यूशन करतात, शो टाकतात.त्यामुळे लिमिटेड लोकांमध्ये शो होऊ शकतो. यामुळे हॉलवाले यांची ही उपजिविका सुरु होईल. सरकारने सलूनवाल्यांबाबत जो निर्णय घेतला तो लॉक डाऊनच्या पहील्याच पर्वात घेतला असता तर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे एवढे भयंकर संकट उद् भवलेच नसते.लॉक डाऊनच्या पहील्या ऐवजी पाचव्या पर्वावर सरकारने सलूनवाल्यांना काही अटींसह आता कुठे व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे.हाच उपाय सरकार पहील्या लॉक डाऊननंतर देखील योजू शकली असती.मात्र असा दूरदर्शीपणा माय-बाप सरकारने दाखवलाच नाही. ना केंद्र सरकारने ना राज्य सरकारने.केंद्राने तर परवानगी दिल्यानंतरही राज्यात सलूनवाल्यांवर बंदीच होती. अशीच वेळ कलाकारांवर येऊ नये.जिथे संकट आहे तिथे उपाय देखील आहेत.कार्यक्रमांवर सरसकट बंदी हा प्रभावी उपाय होऊ शकत नाही. कारोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे,हे मान्य करुनही सरकारने कार्यक्रमांना वाढल्या ’अनेक अटींसह’परवानगी प्रदान करावी.

मी तर कलावंतांच्या परिस्थितीवर कविताच लिहली-महेश तिवारी(ज्येष्ठ निवेदनकार)
शहरात सर्वात मोठा त्रास हा कलावंतांसमोरच आहे. कारण ते कोणासमोरही हात पसरत नाहीत.नागपूर आर्टिस्ट वेलफेअरतर्फे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने २६० धान्याचे किट वाटले. लॉयन क्लबच्या सहकार्याने थोड्या आर्थिक मदतीही करण्यात आल्या मात्र या धान्याच्या किट किती दिवस पुरतात?४-५ महिन्याच्या लॉक डाऊनपर्यंत?त्यामुळेच सरकारने गणपती व दूर्गोत्सवाच्या कार्यक्रमांना वाटल्यास काही अटींसह परवानगी द्यायला हवी. कलाकारांवर आज फेसबूकवर लाईव्ह शो करण्याची वेळ आली आहे मात्र संगीताचा आनंद हा हॉलमध्ये बसून श्रोते,गायक-वादक,ध्वनि व प्रकाश योजनेद्वारेच घेता येऊ शकतो आणि हीच अस्सल भारतीय संस्कृती आहे.मी तर म्हणले गणपती-दूर्गोत्सवमध्ये कोरोनावर लस सापडली तर मां दूर्गाची ही मानव जातीव खूप मोठी कृपा असेल.
काही कलावंत हे सरकारी नोकरीवर आहेत काही खासगी नोकरी करतात,मात्र ज्यांचे पोटच या कलेवर पोसले जात होते त्यांनी आतातरी वेगळा विचार करण्याची गरज आहे. कला आहे,ठिक आहे पण नुसत्या कलेनी गेल्या चार महिन्यांपासून पोट भरले का?काही कलाकार तर पात्रता असूनही नोकरीच करु इच्छित नाही.कोणताही नेता,सामाजिक संस्था ही किती मदत देणार आहे?आणि किती लोकांना?ती मदत तरी किती दिवस पुरणार आहे? पाच विद्यार्थ्यांना घेऊन संगीत वर्ग सुरु करता येईल. आज देशात महाराष्ट्र हा बाधितांच्या आकड्यांमध्ये टॉपवर आहे.यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो.का लागतो?नुकतेच मी गाडीत पेट्रोल भरले तर पेट्रोल पंपाच्या कर्मचा-याने मास्कच लावला नव्हता.शिवाय पंपावर तौबा गर्दी. एका जडीबुटीच्या दूकानात बघितले तर गर्दीच गर्दी,कोणतेही सुरक्ष्ति अंतर राखले नव्हते. याविषयी बोलायला गेलो तर मलाच दूकान मालकाने आणि गर्दीने ‘प्रश्नार्थक नजरेने बघितले!
एवढंच सांगेल पुणे मुंबईमध्ये कार्यक्रमाचा दर्जा आणि श्रोतृवर्ग फार वेगळे आहेत मात्र नागपूरात असे नाही त्यामुळे ‘कलेसोबतच जोड धंदा करा’एवढेच सांगेल. कलाकारांची स्थिती मी याच शब्दात मांडू शकतो…
मै कलाकार हूं…मै कलाकार हूं..हा मै कलाकार हूं
मनोरंजन है जिम्मेदारी,कलाभवन का मैं दरबारी,अब चिंतित लाचार हूं..मैं कलाकार हूं..
मै विशेष हूं मै वरदानी..कला की महिमा ना जाये बखानी
कला भाव का एक उपासक..मेरे काम है जनकल्याणी
कला जगत का राजा हूं मैं..पर भविष्य से परेशान हूं
जिंदा हूं मनमौजी बनकर..उलझा भटका वर्तमान हूं
धन के पीछे ना भागा मै..इसीलिये मझधार हूं.. मै कलाकार हूं…
रंगमंच से मेरा नाता..नही कोई है भाग्य विधाता
अपने कला के दमखम पर मै..मनोरंजन महफिल को सजाता
मेरा दर्द किसे बतलाऊ…किस दर पर आवाज लगाऊ
नजर ना आता सुननेवाला..कितनी जोर से मैं चिल्लाऊ
आज व्यथित मुझको लगता हूं मैं..उजडा हूआ बाजार हूं…मैं कलाकार हूं..
मेरी पूंजी रही तालियाँ…इसमें ही अपनत्वं पा लिया
लालच लोभ की छोड लालसा…मन को संतोषी बना लिया
पछतावा हो रहा आज है..पक्ष् पात से भरा राज है
औरो की चिंता सब करते..अछूता क्यो मेरा समाज है
वक्त की गहरी मार है हमपर..भूक से मैं बेजार हूं..मैं कलाकार हूं..
अति गरीब की चिंता सबको..व्यापारी का भी चिंतन है
मालिक और कामगारो संग..सभी को शासन का वंदन है
किंतू कला जगत के हम सब..किससे अब फर्याद लगाये
सबको दान-अनुदान मिल रहे..हम कैसे चुल्हा सुलगाये
कलाकारी पर गर्व था कल तक…आज टूटा फनकार हूं…मैं कलाकार हूं..
एक दो महिने मे व्यवसाय की..सारी व्यवस्था खूल जायेगी
कारोबार सब चल निकलेंगे..सबके घर बरकत आयेगी
कला क्ष्ेत्र के आयोजन का..पर आरंभ ना हो पायेगा
भीडभाड ना हो इस खातिर..शासन आदेश भी आयेगा
कोरोना व्हायरस की लंबी मार से मै बिमार हूं…मै कलाकर हंू…
कलाकर जिन्हे रोजगार है..उनकी चिंता नही मुझे
जो रोजी-रोटी से जुडे है..उनकी पिडा नही मुझे
उनका जिवन चल निकलेगा पर ‘महेश’उनका क्या हो
रोज कमाई करके खाते…घर बैठे अब रोते जो
ऐसे पिडीत फनकारो की मी आहत चित्कार हूं..मै कलाकार हूं..
हमे मांगते लज्जा आती..हम तो भूके मर जायेंगे
पर जो है परिजन और बच्चे..वे बोलो क्या खायेंगे
‘महेश तिवारी’का है निवेदन..कूछ सरकार हमारी सोचे
कूछ अनुदान कलाकारो को..कूछ को रोजगार की सोचे
कार्यक्रमो से आय थी कल तक..आज तो मै बेकार हूं..मै कलाकर हूं…..




आमचे चॅनल subscribe करा
