Homeनागपूर न्यूजगंटावार,हिवसे प्रकरणी महापौरांचे आदेश धाब्यावर बसणार का?

गंटावार,हिवसे प्रकरणी महापौरांचे आदेश धाब्यावर बसणार का?

मनपात मुंढेंच्या ‘प्रिय’व्यक्तिंची उपस्थिती आजही जैसे थे!‘तात्काळ प्रभावाने’ची अंमलबजावणी होणार कशी?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २७ जून: पाच दिवस चालणा-या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या स्थगितीपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी काल शुक्रवार दि. २६ जून रोजी सायंकाळी प्रशासनाला आदेश देत मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, वाहन चालक प्रमोद हिवसे यांचे निंलबन,तसेच यांच्यासह जेवढ्या पण नियुक्त्या आयुक्त तुकराम मुंढे यांनी महानगरपालिकेत,स्थायी समिच्या अध्यक्ष्ांची पूर्व परवानगी न घेता केल्या, त्या सर्व नियुकत्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश निर्गमित केले होते.मात्र आयुक्तांचे अतिशय प्रिय असणारे डॉ. गंटावार यांची सरकारी गाडी आज ही शनिवार दि. २७ जून रोजी साकळी ८.३० वा.च्या ठोक्यावर मनपा मुख्यालयाच्या पोर्चमध्ये पोहोचली,एवढेच नव्हे तर प्रमोद हिवसे याने देखील नेहमीप्रमाणेच दैनदिन कामकाज केल्याने,महापौरांचे आदेश हे धाब्यावर बसणार कि पुन्हा आयुक्तांना आवडणारी ‘पत्रबाजी’होणार,यावर चांगलीच चर्चा आज मनपात रंगली होती.

शनिवार,रविवार हे शासकीय सुटीचे दिवस असले तरी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मनपात प्रशासकीय कार्य सुरु आहे. आजही महापौरांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केलेले आयुक्तांचे हे ‘खंदे सिपाही’ मनपात कोणताच ताण-तनाव न घेता उपस्थित झाले.एवढेच नव्हे तर त्यांनी आपले दैनदिन कामे देखील पार पाडली.सोमवारी निगम सचिव यांच्याकडून, महापौरांनी सभागृहात दिलेले आदेशांचे पत्र हे आयुक्तांच्या कार्यालयात पाहोचवले जाईल.मात्र आयुक्त हे प्रशासनाचे प्रमुख असल्यामुळे आपल्या अधिनस्थ कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा त्यांना सर्वाधिकार असल्यामुळे,महापौरांचे ‘आदेश’ते मानतीलच,अशी कोणतीही चिन्हे दिसत नसल्याची चर्चा मनपात रंगली होती.

हिवसे याने महापालिकेत शासकीय नियमाप्रमाणे ज्यांना ‘सचिव पद’ प्राप्त झाले होते,अश्‍या अनेक सचिवांच्या बदल्या इतर विभागात केल्या आहेत,एवढेच नव्हे तर त्याच्या अतिशय जवळचेच असणारे अनेक कर्मचारी यांनाही त्रास दिला असल्याने हिवसे याच्या विरोधात महापौरांनी दिलेल्या आदेशाने अनेक कर्मचारी सुखावले होते. सभागृहात ’छोटे मुंढे’जर कोणाला म्हणायचे असेल तर ते गंटावार नसून ‘हिवसे’असल्याची चर्चा केली जाते.डॉ.गंटावार निलंबित झाले तरी त्यांना स्वत:ची प्रतिष्ठा आहे,स्वत:चे रुग्णालय आहे.मात्र हिवसे याच्याकडे वाहन चालक पद असताना,मुंढे यांच्या आंधळ्या विश्‍वासाने व धृतराष्ट्र प्रेमाने, मनपाचा कारभार हा हिवसे याच्यामुळे ‘नियमबार्ह्य’ पद्धतीने गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असल्याची कुजबुज कर्मचा-यांमध्ये ऐकू येत आहे.
असे असले तरी कर्तव्यदक्ष्,प्रामाणिक,नियमांप्रमाणे कारभार करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार व हिवसे प्रेम तसूभर ही कमी झाले नसून हिवसे,गंटावार यांना सपोर्ट मुंढेंचा आणि मुंढेंना सपोर्ट मंुबईचा…असे हास्य आज मनपात फूलले होते.डॉ.गंटावार,हिवसे यांना मुंढे यांचा ‘दृश्‍य’सपोर्ट असला तरी मुंढेचा सपोर्ट ‘अदृश्‍य’असल्याने हाच सपोर्ट मुंढे यांच्या मगरुर वागणूकीचे कारण असल्याचेही,मनपाची सभा पार पडल्यानंतर बोलले जात आहे.

चार दिवस मुंढे यांनी सर्व नगरसेवकांचे शाब्दिक वार संयमाने झेललेत याविषयी त्यांच्या प्रति सहानुभूती निर्माण होत असतानाच,आज मनपा मुख्यालयाचे दृष्य मात्र वेगळेच होते. महापौरांच्या आदेशानंतरही मनपाने दिलेल्या गाडीने डॉ.गंटावार मुख्यालयात आले व मनपाच्याच फोनवर डॉ.गंटावार बेदिक्कतपणे कार्यभार करीत राहीले.‘एवढा मोठा सपोर्ट’असताना त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही.असे हिरमुसून मनपाचे काही कर्मचारी सांगत होते.गंटावार,हिवसे,चोरपगार आदी यांच्या चेह-यावर चिंतेची एकही ‘रेष’नव्हती.आम्ही असतो तर कोलमडून पडलो असतो,असेही काही कर्मचारी सांगतात.आयुक्त जसे निगरगट्ट आहेत तसेच त्यांचे ‘प्रिय’देखील निगरगट्ट असल्याचा संतापही व्यक्त करण्यात आला.

मनपा चालवण्याची जवाबदारी ज्या महापौरांची आहे त्यांनी मला ,मी सभेतून निघून आल्यानंतरही विनंती केली,ते नमले,यामुळे आयुक्तांच्या वागणूकीत मोठा बदल झाल्याची दबकी चर्चाही ऐकू आली.पूर्वी तरी प्रशासनाची जवाबदारी म्हणून ते महापौरांना थोडे तरी बांधिल राहत होते.महापौरांचं पद हे लहान पद नाही,प्रतिष्ठेचं पद अाहे, तरी देखील आयुक्तांच्या लेखी गेल्या सहा महिन्यात त्यांना किती महत्व देण्यात आले,हे सभागृहात गेल्या चार दिवसांपासून चाललेल्या चर्चेत नागपूरकर जनतेनी ऐकले आहे. ज्यांच्या अादेशावर एवढी मोठी सभा भरते, त्या महापौरांचे फोन जे उचलत नाही ते आयुक्त, महापौरांचे निर्देश, आपल्या कामाशी प्रामाणिक असल्याचा दावा करणारे मुंढे ,एवढ्या सहजतेने स्वीकारतील,याचा विश्‍वास मनपाच्या कर्मचा-यांनाही नाही. कोविड-१९ काळात आठ ऐवजी बारा-बारा तास आम्ही काम करीत असून देखील कामाचा योग्य पगार मिळाला नाही,उलट नुकतेच २१ जून रोजी कर्मचा-यांना पगार देण्यात आला,ते ही सभागृह सुरु नसते तर, कोणी विचारणारे नव्हते. सभागृहात कर्मचा-यांच्या पगारावरुनही आयुक्तांना धारेवर धरल्या जाईल,या भीतीतून पगार तरी झाला असल्याची व्यथा एका कर्मचा-याने व्यक्त केली.

मनपात इलू..इलू!

शिस्तबद्ध,प्रामाणिक,कर्तव्यकठोर,नियमांवर नितांत श्रद्धा असणा-या व चारित्र्यवान आयुक्तांच्या कानावर त्यांच्या मर्जीतील एका ‘खास’ अधिका-याचे ‘इलू इलू’प्रकरण पडले.मात्र त्यांनी फक्त त्या तरुण महिला ऑपरेटरची बदली इतर विभागात केली असल्याची चर्चा देखील चांगलीच रंगली होती. एकेकाळी उद्यान अधिक्ष् क पदावर असणारा एक अधिकारी मुंढे यांच्या ’गूडबूक’मध्ये येताच त्यांना कोविड-१९ च्या प्रमुख पदावर बसवण्यात आले. त्यांच्या केबिनमध्ये दिमतीला काही संगणक ऑपरेटर देखील कार्यरत होते. मात्र हळूहळू इतर ऑपरेर्ट्स यांची ‘गच्छंती’ केबिनमधून झाली व एकमेव तरुणी तिथेच कार्यरत राहीली.शेवटी याची नको तेवढी चर्चा कर्मचा-यांमध्ये रंगली आणि आयुक्तांच्या कानापर्यंत पोहोचली. आयुक्तांनी प्रमुखाला फैलावर घेण्याऐवजी त्या तरुणीला इतरत्र ‘शिफ्ट’ केले.त्या तरुण महिला ऑपरेटरला कोविड-१९ची कामे सोडून त्या अधिका-याने कसे डोक््यावर बसवले!याच्याच सुरस कथा आताही रंगविल्या जात आहेत. कोविड राहीलं बाजूला..याचंच ‘इलू इलू’कसं जमलं म्हणून कर्मचारी खासगीत चर्चा करतात.

पदाधिका-यांना न जुमानता,आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत कारभार केला,असा आरोप त्यांच्यावर केला जातो. मात्र सभागृहातील महापौरांचे आदेशही जर का ते पाळणार नसतील व अश्‍या भ्रष्ट,व चारित्र्य नसलेल्या अधिका-यांना,कर्मचा-यांना ते पाठीशी घालत असतील तर,याचेही उत्तर त्यांना नागपूरकर जनतेला द्यावे लागेल, त्यांच्या अश्‍या मगरुर कारभारामुळे ते कितीही प्रामाणिक असले तरी संशयाची सुई शेवटी त्यांच्याकडेही वळेल,असेही खासगीत बोलले जात आहे.

Latest बातम्या