
आम आदमी पार्टीची पोलीस तक्रार: ५ दिवसांपासून सभा सुरू
नागपूर,ता.२५ जून: कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आम आदमी पार्टीने महापौर संदीप जोशींच्या विरोधात पोलीस तक्रार केली.
आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत राज्य सरकारनी काढलेल्या आदेशानुसार ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमण्यास मनाई आहे. नागपुत महानगर पालिकेची सभा राज्य सरकारच्या विशेष परवानगी घेण्यात येत आहे.
मनपाची सभा गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. मात्र राज्य सरकारची परवानगी ही, महामारी काळात महत्वाचे निर्णय व मुद्दे घेण्यासाठी दिली गेलेली आहे. किरकोळ बाबींवर चर्चा करून रोज सभा दुसऱ्या दिवशी ढकलण्यात येत आहे. रोज १५० पदाधिकारी, ५० मनपा कर्मचारी, पोलीस ताफा व अन्य लोक मिळून जवळपास ३०० ते ४०० लोक कोविड काळात एका ठिकाणी जमा होत आहेत. सगळे मनपा पदाधिकारी त्यांच्या प्रभागात जाऊन लोकांना भेटतात. या सभेमुळे पूर्ण नागपूर शहरात कोरोना विषाणू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
ही सभा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी बोलावली असून नागपूरचे कार्यक्षम मनपा आयुक्त विरोधात अहंकार पोटी ही सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा लोकांसाठी धोकादायक आहे म्हणून आम आदमी पार्टी या सभेचा निषेध करते,असे पत्रकाद्वारे कळवले आहे.
ही तक्रार देतांना आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, नागपूर संयोजक कविता सिंघल, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, महाराष्ट्र युवा कमिटी सदस्य कृतल वेलेकर, विदर्भ युवा संयोजक पियुष आकरे, नागपूर युवा संयोजक गिरीश तितरमरे, सचिव भूषण ढाकुलकर, नागपुत संगठन मंत्री शशंकर इंगोले, प्रभात अग्रवाल, ओम आरेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा