फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमभाजप नगरसेवकाला जुगार खेळताना अटक!

भाजप नगरसेवकाला जुगार खेळताना अटक!

Advertisements

अत्रे ले-आऊटमध्ये पोलीसांचा छापा: प्रवीण भिसीकरसहीत ८ आरोपींना अटक

नागपूर,ता. १७ जून: बजाज नगर ठाण्याअंतर्गत अत्रे ले-आऊट येथील एका जुगार अड्डयावर पोलीसांनी छापा टाकल्यावर त्यात भारतीय जनता पक्ष्ाचे नगरसेवक प्रवणी भिसीकर हे देखील जुगार खेळताना आढळून आले.या अड्डयावर भिसीकर यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली.

’पार्टी विथ डिफरेन्स’चे बिरुद मिरवणा-या भारतीय जनता पक्ष्ाच्याच एका नगरसेवकाला जुगार खेळताना अटक झाल्यावर पक्ष्ात चांगलीच खळबळ माजली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री बजाज नगर पोलीस ठाण्यात या जुगार अड्डयाविषयी टिप मिळाली की अत्रे ले-आऊट येथील आनंद नगरमधील एका घरात, गेल्या काही दिवसांपासून चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे.

पोलीसांनी या विषयी तपास केला असता त्यांना संजय लाटकर यांच्या घरासमोर काही चारचाकी व दुचाकी उभ्या असलेल्या आढळल्या.पोलीसांनी लाटकर यांच्या घरावर छापा मारताच तेथे जुगार खेळताना आरोपी नगरसेवक प्रवीण भिसीकर,प्रवीण पराते, नरेंद्र मेश्राम,सुरेश भोयर, निलेश मोहाडीकर, संजय उराडे, रमेश जाधव,ज्ञानराव धार्मिक हे जुगार खेळताना आढले. या सर्वांना अटक करण्यात आली.

पोलीसांनी या अड्डयावरुन १० हजार रोख रकमेसहित १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींमध्ये डागा रुग्णालयातील एक अधिकारी देखील सहभागी असल्याची माहिती सांगितली जात आहे. पोलीसांनी सर्व आरोपींच्या विरोधात मामला दायर केला.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हजारांचा टप्पा ओलांडून ११०० च्या पार पोहोचला असताना आणि रात्रीची संचारबंदी कायम असताना भाजपचा एक नगरसेवकच जुगार खेळताना आढळल्यामुळे,या पक्ष्ाची चांगलीच किरकरी झाली असून जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवकच जर कोरोनासारख्या अति गंभीर महामारीच्या काळात असे नियम मोडत असतील तर सामान्य जनतेने तरी कोणाचा आदर्श ठेवावा?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या