फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनाट्यकर्मीचे नाटक!‘मानधनाला’ दिले ‘कोरोना’ मदतीचे नाव

नाट्यकर्मीचे नाटक!‘मानधनाला’ दिले ‘कोरोना’ मदतीचे नाव

Advertisements

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ८ जून:काेरोना‘या विषाणूने माणसाच्या विचित्र स्वभावातील ‘विषाणूने‘चे देखील चांगलेच दर्शन मानवाला घडवले असल्याचा बातम्या दररोज प्रसार-प्रचार माध्यमात वाचायला व बघायला मिळत आहेत. ‘काेरोना’मदतीच्या नावाखाली नागपूरातील अश्‍याच एका ज्येष्ठ व नामवंत नाट्यकर्मीने आपल्याच मेकअप आर्टिस्टचे उरलेले मानधन देऊन त्यालाच ‘ काेरोना’ची मदत जाहीर करुन चांगलीच प्रसिद्धी लाटल्याने त्या नाट्यकर्मीविरोधात कलाकार जगात चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे.

नकूल श्रीवास हा नागपूर शहरातील सळसळत्या रक्ताचा तरुण मेकअप आर्टिस्ट. उत्तराखंडमध्ये एका तमिळ चित्रपटाच्या चित्रिकरणदरम्यान ७ मार्च ते १७ मे दरम्यान लॉक डाऊनमुळे तिथेच अडकला. यानंतर सुरु झाला त्याचा संघर्षाचा प्रवास. तमिळ निर्मात्याने त्याचे कोणतेही मानधन न देता तेथून पलायन केले.सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची अत्यंत महागडी मेकअप किटही तो सोबत घेऊन गेला.

दूसरीकडे मुंबईतील एका निर्माता हे देखील मुंबईतील आपल्या कलावंतांना घेऊन निघून गेले.अश्‍यावेळी जयपूरचे एकमेव दिग्दर्शक हे नकूलच्या सोबतीला होते. ते सोबत नसते तर….!नकूलने ही आपली व्यथा नागपूरातील सर्व नाट्यकलावंत मंडळींना कळवली.अनेक वृत्तपत्रांनी नकूलच्या या संकटाची,संघर्षाची बातमी देखील प्रसिद्ध केली.

ही बातमी वाचून शहरातील त्या जेष्ठ नाट््यकर्मी व नागपूरातील नाट्य चळवळीचे स्वयंघाेषित प्रेणेते यांनी देखील नकूल यांना फोन केला. नकूल यांनी सर्वांनाच त्यावेळी मदत मागितली होती,याशिवाय ज्यांच्याकडे त्याचे मानधन अडकले होते,ते पाठविण्याची विनंती केली. या नाट्यकर्मीकडे ही नकूल यांचे ‘दोन हजार रुपये’घेणे बाकी होते. मूळात रक्तातच ‘नाटक’भिनलं असल्यामुळे त्या नाट्यकर्मीने नकूलच्या दोन हजारात आणखी तीन हजारांची मदत घातली व त्याला पाठविले.

मात्र दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात,उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मेकअप आर्टिस्टला त्यांचा ’फाऊंडेशनतर्फे’ पाच हजारांची मदत केली असल्याचा दावा करण्यात आला.या बातमीची दखल शहरातील एका’प्रतिष्ठित’वृत्तपत्रानी घेतली. ज्यांनी ही बातमी छापली ते या नाट्यकर्मीचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. मात्र नकूल यांना जेव्हा हे वास्तव कळले तेव्हा त्यांना याचे आश्‍चर्य वाटले. ‘मला या फाऊंडेशनकडून फक्त तीन हजारांची मदत प्राप्त झाली असून,दोन हजार रुपये हे माझेच उरलेले मानधन होते’असा खुलासा त्यांनी केला.

त्या नाटयकर्मींनी वेळेवर नकूल यांची मदत केली यात दुमत नाही मात्र प्रसिद्धीचा‘ हव्यास’ माणसाला ‘मूल्यांच्या’ किती अधोगतीला नेऊन पोहोचवतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. नकूलची मदत करण्यामागे केवळ ‘प्रसिद्धीचा’हव्यास,हेच एकमेव कारण कारणीभूत होते, हे त्या बातमीमुळे सिद्ध झाले.

विशेष असे की या बातमीत शेवटची एक ओळ होती,नागपूर शहरातील कोणत्याही कलावंतांला अशी मदत लागल्यास त्यांनी अमूक ‘फाऊंडेशनची’मदत घ्यावी….!बातमी प्रसिद्ध होऊन तीन महिन्यांचा काळ लोटत अाला,मात्र पुन्हा अशी ‘भरीव’मदत नागपूर शहरातील कोण्या बॅक स्टेज आर्टिस्ट, नेपथ्यकार,ध्वनि व्यवस्थापक, प्रकाश योजनाकार, सामान उचलणारे हेल्पर,यांना मिळाली असल्याचे अद्याप कळाले नाही!

चित्रपट महामंडळाचा कोडगेपणा….

तो काळ नकूल यांच्यासाठी खूप भयंकर संकटाचा होता.अनोळखी राज्यात,निर्माता पळून गेला असताना,आपल्या शहरापासून,आपल्या कुटुंबापासून इतक्या लांब असणा-या नकूलला त्यावेळी मदतीची खूप जास्त गरज होती. त्यांनी चित्रपट महामंडळाच्या नागपूर शाखेतील पदाधिकारी यांना देखील कॉल केले, मात्र तुम्ही तुमचे सदस्यत्वाची पुन्हा नोंद केली नसल्या,ने तुमची कोणतीही मदत मंडळ करु शकणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले! आपल्या शहरातील एक कलावंत अनोळख्या शहरात विना पैशे-पाण्याचा अडकला आहे,अश्‍यावेळी ‘माणूसकी’च्या नात्यातून त्याच्या मदतीसाठी धाव घेण्याचे सोडून तकलादू नियमांवर बोट ठेवण्यात आले!

नकूल यांनी चित्रपट महामंडळाच्या या व्यवहराविषयी बाहेर वाचत्या करताच, या मंडळातील दोन्ही पदाधिकारी यांना ‘थोडी‘उपरती झाली आणि त्यांनी नकूल यांना फोन करुन कळवले, लक्ष्मीनगर भागात चित्रपट महामंडळातर्फे धान्याच्या किटचे वाटप होत आहे,तू येऊन एक किट घेऊन जा!

आमदार मते यांच्यामुळे मिळाले मेकअप किट परत-

नकूल यांचे संकट प्रणय भांडारकर यांना कळताच त्याने ते आपल्याला वडीलांना सांगितले. प्रणय यांचे वडील हे दक्ष्णि नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मते यांचे चांगले मित्र असल्याने त्यांनी नकूल यांची समस्या मते यांच्या कानावर टाकली. आ. मते यांनी लगेच नकूल यांच्याशी संपर्क साधला व नकूल यांना सर्वतोपरी सहायता करण्याचे आश्‍वासन दिले. आ.मते यांच्या प्रयत्नांनी तमिल निर्मात्याने नकूल यांचे मानधन तसेच महागडे मेकअप-किट परत केले. पैश्‍यांपेक्ष्ा ही नकूल यांना आपले ‘रोजी-रोटीचे’साधन असणारे मेकअप किट मिळाल्याने खूप समाधान लाभले.

नकूल याला पैश्‍याची मदत मिळताच त्यांनी उत्तराखंड ते दिल्ली अशी २२ हजार रु खर्चून खाजगी टॅक्सी केली व तिथून श्रमिक रेल्वेने तीन हजार रु.भाडे भरुन १७ मे रोजी आपले शहर गाठले. नकूलला बघून त्याच्या आईला जणू नकूल यांचा पुर्नजन्म झाल्याचा आनंद झाला. नकूल यांच्या काळजीने त्या जन्मदात्रीचे काळीज दररोज पोखरत होते.

नकूल यांनी खास ‘सत्ताधीश’कडे ज्यांनी ज्यांनी त्या संकटाच्या काळात त्याला आर्थिक व भावनिक मदत केली त्यांचे अनंत उपकार मानले आहेत. नकूल हा व्हीएमवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मेकअपचे प्रशिक्ष् ण देतो. ‘कोरोनाने’शहरातील कलावंत जगतातील अापले-परके यांची चांगलीच ओळख करुन दिली असून या पुढे व्यवसाय सांभाळताना त्यांच्याशी व्यवहारिक नातंच जोपासणार,असे तो सांगतो.अडीच महिने एका परक्या राज्यात पै-पै ला तरसलो आहे. तो दिग्दर्शक सोबत नसता तर कदाचित जिवंत ही राहीलो नसतो,असे भावाेद् गार तो काढतो.

नकूलला त्याच्या संकटकाळी मदत करण्यासाठी सर्वात आधी धाव घेतली ती नाट्यकर्मी कूणाल गडेकरप्रणय भांडारकर यांनी.आ.मोहन मते यांनी अगदी दररोज नकूलला फोन करुन त्याची हिंमत बांधली. याशिवाय नाट्य क्ष्ेत्रातील दिपाली घोंगे,साेमेश्‍वर बालपांडे,अविनाश घांगघेरकर,आसिफ बक्क्ष्ी,संजय भाकरे, अनिल पालकर,अभय अजीनकर,देवेंद्र बेलेणकर,संजय सातफळे,अनिल जोशी,संजय कूमार,आसावरी रामेकर यांनी देखील नकूल यांच्या त्या अत्यंतिक संकटाचा काळात त्याला आर्थिक मदत केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या