फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशदेशातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला, नवी नियमावली जाहीर

देशातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला, नवी नियमावली जाहीर

Advertisements

नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असेल, अशी माहिती केंद्र सरकारने दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली होती. त्यांनतर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीय.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपाचा आणि नवीन नियमावलीनुसार लागू केला जाईल. यासाठी राज्यांकडून सूचना मागवण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेट राजीव गौबा हे आज रात्री ९ वाजता राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन दिशानिर्देश किंवा नियमावली जारी करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारची नियमावली

> रेल्वे, मेट्रो, विमान सेवा, शाळा, कॉलेज, मॉल आणि चित्रपटगृह बंदच राहणार. यासोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटही बंद राहतील.

> सांस्कृतिक, कुठल्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी कायम राहणार आहे.

> कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. नागरिकांना बाहेर येण्या-जाण्याची सूट नाही.

> राज्यांना रेड, ग्रीन, ऑरेंज झोन आता ठरवता येणार. झोन ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घेता येईल.

> स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू करण्यास परवानगी. पण मैदानं आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही.

> रेड झोन, कंटेन्मेंट झोन वगळता राज्यांना एकमेकांच्या अनुमतीने आंतरराज्य सेवा सुरू करू करता येणार

> अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी ७ आणि सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार

> सरकारी कार्यालयं आणि तेथील कँन्टीनही सुरू होणार

> ई-कॉमर्स कंपन्यांना रेड झोनमध्येही जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठा करता येणार, सरकारने बंदी उठवली

> रेड झोनमध्ये सरकारने दारू दुकानं आणि पानविडीची दुकानं खुली करण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच सलूनची दुकानं आणि स्पा सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या