Homeनागपूर न्यूजमद्यविक्री:नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना केली ‘ही’सूचना

मद्यविक्री:नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना केली ‘ही’सूचना

नागपूर,ता.८ मे: लॉक डाऊनमुळे नागपूरात २४ मार्चपासून मद्यविक्रिीही बंद आहे. मात्र ३ मे रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २.० लॉक डाऊनची मुदत संपल्यानंतर नागपूरातील मद्य विक्रेते यांना शहरात इतर उद्योग,व्यवसायसोबतच मद्य विक्रीलाही परवानगी मिळेल अशी आशा होती मात्र महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवा आदेश जारी करुन शहरात मद्य विक्रीची दूकाने ही बंद राहतील असा नवा आदेश काढला.या विरोधात महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.शुक्रवार,दि.८ मे रोजी यावर सुनावणी करताना असोसिएशनने या संदर्भात येत्या २४ तासात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे नव्याने निवेदन सादर करावे,असे आदेश न्यायालयाने दिले.

या निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी १२ मे पर्यंत निर्णय घ्यावा,अशी कालमर्यादाही न्यायालयाने आखून दिली.या याचिकेत असोसिएशनतर्फे ग्राहकांना विविध नियम व अटींच्या अधीन राहून घरपोच मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात यावी,अशी विनंती करण्यात आली होती.

केंद्र व राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीच्या रोगाच्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत काढण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रेडझोनमध्येही मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली होती.
परंतु, नागपूर शहर व ग्रामीण भागात मद्य विक्री बंद करण्यात आली. नागपूर शहर हे रेड झोनमध्ये असल्या कारणाने शहरात व ग्रामीण भागात मद्य विक्री करता येणार नसल्याचे आदेश मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीयस्तरावर काढले होते.

या निर्णयाला अनेकस्तरावर ग्राहकांनी विरोध दर्शवला होता.शहरातील हॉट स्पॉट सोडून इतर भागात मद्याची दूकाने सुरु करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांनी केली होती.

Latest बातम्या