फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशदेशातील करोना रुग्णसंख्या ५० हजारांवर, तीन दिवसांत १० हजारांवर नवीन रुग्ण

देशातील करोना रुग्णसंख्या ५० हजारांवर, तीन दिवसांत १० हजारांवर नवीन रुग्ण

Advertisements

नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. लॉकडाऊन करूनही करोना रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ५०५४५ इतकी झाली आहे. तर गेल्या तीन दिवसांत करोनाचे १० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३९०० नवीन रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. तरीही करोनाच्या रुग्णांची संख्या ही थांबताना दिसत नाहीए. देशात करोनाने आतापर्यंत एकूण १६५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजारांहून अधिक जण बरे झालेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता १६ हजार ७५८ इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले आलेत. आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण हे गुजरातमध्ये आहेत. गुजरातमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही ६२०० इतकी झाली आहे. यानंतर दिल्लीचा क्रमांक येतो. दिल्लीत ५ हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण आहेत. यानंतर तामिळनाडूत ४ हजारांहून अधिक करोना रुग्ण आहेत.

आता विदेशातून मायदेशात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे, असा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे. नागरिकांसाठी पेड क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजे क्वारंटाइन कालावधीसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. नवी दिल्लीत विमानतळाजवळील जिल्हा मॅजिस्ट्रेटलाही पेड क्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच दक्षिण पूर्व आणि दक्षिण जिल्ह्याच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटनाही पेड क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले गेलेत. यासाठी २० आरोग्य पथकं नेमण्यात आली आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या