
नागपूर: रविवार हा नागपूरकरांसाठी जणू ‘घात’वारच ठरला. शनिवार दि. ११ एप्रिल रोजी शहरातील करोना बाधितांची संख्या ही २७ होती मात्र रविवार दि. १२ एप्रिल रोजी एकाच दिवशी यात १४ करोना बाधितांची वाढ झाली. नागपूरात आता करोना बाधितांची संख्या ही आता ४१ एवढी झाली आहे.
या १४ करोना बाधितांमध्ये ६ मेयो तर ८ मेडिकलमध्ये संशयित म्हणून विलगीकरणात होते. त्यांच्या घश्यातील द्रव्याचा अहवाल आज रविवारी पॉझिटिव्ह आला आणि नागपूरकरांच्या काळजाचे ठोके चूकले.
यातील १० बाधितांची पार्श्वभूमि ही ‘मरकज’ मधून आल्याची सांगितले जाते तर चार बाधित हे जबलपूरवरुन दिल्लीला गेले होते. यातील २ व्यक्ति ही माजी मंत्री अनिस अहमद यांच्या लोणारमधील विलगीकरण कक्ष्ात वास्तव्यास होती. अर्थात आज करोना पॉझिटिव्ह म्हणून ज्यांचे अहवाल प्राप्त झाले त्या सर्वांना ‘दिल्ली’ची पार्श्वभूमी आहे. सुरवातीला यांचे विलगीकरण हे आमदार निवास व वनामतीमध्ये करण्यात आले होते.
यातील ८ पैकी ६ संशयित हे मेडिकलमध्ये करोनाची लक्ष् णे दिसत असल्यामुळे उपचार घेत होते. सध्या शहरात एकूण संशयित ११७६ असून भरती असलेले संशयित हे १०८ आहेत. यात मेडीलमध्ये ६२ तर मेयोमध्ये ४६ आहेत.यात एकूण भरती केलेले करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४१ झाली आहे. अलगीकरण कक्ष्ात भरती असणारे संशयितांची संख्या ही ५९३ हे. पाठपुरावा सुरु असणारे संशयितांची संख्या ही ११८४ असल्याचे पत्रक जिल्हाधिकारी जनसंपर्क विभागातर्फे १० एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.
आमदार निवास व वनामतीमध्ये ५९३ संशयित रुग्ण असून यांचे सर्वांचे अहवाल चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. नागपूरकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे प्रशासनाने दिल्ली तसेच इतर ठिकाहूण नागपूरात आलेल्या करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना हे आधीच विलगीकरण कक्ष्ात ठेवले असून त्या सर्वांचे अहवाल चाचणीसाठी पाठवले आहेत.मात्र यातील करोना पॉझिटिव्ह यांच्या संपर्कात आणखी कोण-कोण आलेत याचाही तपास घेण्याची प्रक्रिया ही प्रशासनाकडून अद्याप सुरु आहे.




आमचे चॅनल subscribe करा
