फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधक्कादायक! नागपूरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह!

धक्कादायक! नागपूरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह!

Advertisements

नागपूर: सतरंजीपुऱ्यतील करोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला.या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. याच दिवशी त्याच्या कुटुंबातील ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी,३५ वर्षीय जावई, त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ वर्षाची दोन मुले असे एकूण ६ संशयितांना मेडिकल मधील ‘ कोव्हिडं-१९’ वॉर्डात दाखल केले होते,त्यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले.परिणामी गुरुवारी नागपूरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही २५ झाली आहे!

या सर्वांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. एकाच दिवशी करोनाचे ६ नमुने पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी मेयो व मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नागपुरातील ५९ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

मेडीकलमध्ये ४४ करोना संशयित रुग्ण भर्ती आहेत.वॉर्ड क्र.२५ मध्ये २१ संशयित रुग्ण असून यात ३ नवे तर १८ जुने आहेत.यात १५ पुरुष व ६ महिला आहेत.

वॉर्ड क्र ४९ मध्ये एकूण २३ संशयित रुग्ण असून यात ११ पुरुष १० महिला व २ लहान मुले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ रुग्णांचाही यात समावेश आहे.

या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मृतकाची चाचणी पॉझिटिव्ह येताच त्याच दिवशी त्यांच्या घरातील त्यांच्या संपर्कात आलेल्या ६ कुटुंबियांची चाचणी घेण्यात आली व तातडीने त्यांना मेडिकल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या नमुन्याचा अहवाल यायला ४ दिवसाचा कालावधी लागला.

पॉझीटीव्ह आलेल्या या रुग्णांचे नमुने आधीच तपासले गेले असते तर आतापर्यंत त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासून यांचीही साखळी खंडित करता आली असती,असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मेडिकलमध्ये झालेल्या त्या दोघांचा मृत्यू निमोनियामूळे झाला असून करोना संशयित म्हणून मेडिकल मध्ये करण्यात आलेल्या त्यांच्या तपासणीचा अहवाल निगेटीव्ह आला. यात एक पारशिवणी येथील १२ वर्षांचा मुलगा तर नागपुरातील ५८ वर्षीय पुरुष होता.दोघांनाही विविध आजारांसोबत निमोनिया झाल्याचे निदान झाले. याच आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या