

आगीचे कारण अद्याप अज्ञात
नागपूर: अजनी वाहतूक झोनमध्ये सकाळी पावणे अकराच्या सुमारास अचानक जप्त करुन ठेवलेल्या दूचाकींना आग लागली व एकच हलकळ्ळोल माजला. एका नंतर एका दूचाकीने पेट घेतला. अजनी वाहतूक झोनमधील उपस्थित पोलीस कर्मचा-यांनी धाव घेतली. पाण्याचा शोध घेऊन आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला मात्र अनेक दूचाकी या तोपर्यंत आगीत भस्म झाल्या होत्या.
अजनी वाहतूक झोनचे पोलीस निरीक्ष् क मनोहर कोटनाके यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की सुमारे सकाळी पावणे अकराच्या सुमारास अचानक गाड्यांना आग लागली,आगीचे कारण मात्र अद्याप अज्ञात आहे. या गाड्या दोन ते तीन वर्षे आधी जप्त करण्यात आल्या होत्या. कदाचित नागपूरचा पारा हळूहळू तापायला लागला असल्यामुळे एखाद्या दूचाकीच्या पेट्रोल टँकमधून ठिणगी उडाली असावी व बघता बघता इतर दूचाकींन पेट घेतला.
यात एक भंगार पडलेला ऑटो हा देखील जळून खाक झाला. सुमारे ३४ ते ३५ दूचाकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. करोना आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दूचाकी मात्र सुरक्ष्ति असल्याचे त्यांनी सांगितले. आगीने पेट घेताच जवळच्या संसाधनातून जेवढे पाणी उपलब्ध होते तेवढे टाकून आग विझवण्याच्या प्रयत्न करण्यात आला.
अग्निशमनची गाडी येईपर्यंत अजनी वाहतूक शाखेने पाण्याचा टँकर बोलावला. यामुळे जवळपास १०० दूचाकी या आगीच्या भक्ष्य होण्यापासून वाचू शकल्या,अशी माहिती कोटनाके यांनी दिली.या गाड्यांचा धूर अनेक किलोमीटरच्या परिसरात पसरला होता. अजनी पूलावरुन जाणारे पांथस्त थांबून हा धूर पाहत होते.
आगीचे कारण अद्याप अज्ञात असून याचा शोध घेतला जात असल्याचे अजनीचे वाहतूक पोलीस निरीक्ष् क मनोहर कोटनाके यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
