Advertisements

बरेली, उत्तर प्रदेशः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांना केमिकलची आंघोळ घालणाऱ्यां आता कारवाई होणार आहे. या प्रकरणी बरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
केमिकलने कामगारांची आंघोळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली. याची गंभीर दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली. यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून बरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. यानंतर बरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या व्हिडिओची सत्यता तपासली. हा व्हिडिओ खरा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
‘सीएमओच्या आदेशानंतर संबंधित कामगारांवर उपचार करण्यात येत आहेत. बरेली पालिका आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून बसेस आणि सार्वजनिक ठिकाणं सॅनिटाइज करण्यात येत आहेत. पण अतिसतर्कतेमुळे यात कामगारांनाच केमिकलची आंघोळ घातली गेलीय. हे तपासणीतून उघड झालं आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधितांवर कारवाई केली जाईल’, असं आश्वासन बरेलीचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी दिलेत.
नागरिकांच्या सामूहिक सॅनिटायजेशनचा असा प्रयत्न इतर देशांमध्येही केला जातोय. पण त्यासाठी पूर्ण काळजी घेतली जाते. तशी काळजी घेण्यात आली नाही, असं जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी सांगितलं.
बरेली जिल्ह्यातील प्रशासनिक अधिकाऱ्यांचा अमानवीय आणि धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानं उत्तर प्रदेशात आणि बिहारमधील शेकडो मजुरांनी मोठ्या शहरांतून पायीच चालत आपल्या घरचा रस्ता धरलाय. अशातच बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या मजुरांना बरेलीमध्ये ‘एन्टी लार्वा केमिकल’नं सामूहिक आंघोळ घातल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला.
Advertisements

Advertisements

Advertisements
