फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशदेशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर

देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९३५वर

Advertisements

नवी दिल्लीः देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ती आता हजाराच्या जवळपास गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे. तर २०० हून अधिक करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे करोनाच्या रुग्णांची संख्या ही ९३५ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी करोना संदर्भातील घडामोडींची आज माहिती दिली. केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने ज्या ठिकाणी करोनाचे अधिक रुग्ण आहेत त्या भागांमध्ये लक्ष केंद्रीय केलं आहे. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव समाजात होऊ याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

प्रत्येक राज्यांत करोना रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल बनवण्यात येणार आहे. १७ राज्यांनी या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यामुद्द्यावर आम्ही सतत राज्यांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे, असं अग्रवाल म्हणाले.

ज्यांना श्वसनाचे गंभीर आजार आहेत, अशा सर्व रुग्णांची करोना चाचणी करण्यात येत आहे, अशी माहिती आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी दिली. करोनाच्या ज्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरीन औषध देण्यात येत आहे, त्यांना त्याचा फायदा होतोय का? याचे निरीक्षण सध्या सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी दिली.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या