

लता मंगेशकर हॉस्पीटलच्या कर्मचा-यांचा स्तुत्य उपक्रम
नागपूर: गुरुवारी भर दूपारी नेहमीच गजबजलेल्या (आता मात्र र्निमनुष्य झालेल्या) व्हेरायटी चौकात एक वेगळेच दृष्य बघायला मिळाले. पाच ते सहा मंडळी गळ्यात आय-कार्ड घालून,हातात चहाची केन,हाता स्टर्लिनची बाटली,कागदी कप,पाण्याच्या बाटल्या घेऊन कर्तव्यावर असणा-या पोलिसांना मोफत चहा वाटत होती.
सर्वात आधी त्यांनी स्टर्लिनने हात धूवायला लावले मग पाणी दिलं यानंतर छान चूलीवरचा वाफाळलेला चहा कागदी कपात गाळून मोफत वाटला. हा उपक्रम ते गेल्या सहा दिवसांपासून करीत आहे. हे सर्व कर्मचारी व्हेरायटी चौकातील लता मंगेशकर रुग्णालयातील असून दररोज ते स्वत:च्या खिशातून या सामाजिक उपक्रमासाठी आपापसात पैसे गोळा करतात, दिवसातून तीन वेळा ते चहाची केन घेऊन संपूर्ण पसिसर पायीच फिरतात,कर्तव्यावर असणारे पोलिस,दूकान आणि मॉलसमोर ड्यूटी बजावणारे सुरक्ष्ा रक्ष् क यांना सकाळी ११ वाजता,दूपारी ३ वाजता व सायंकाळी ६ वाजता असा तीन वेळा अतिशय उत्साहाने चहा पाजतात.
रुग्णालयातील चूलीवरच ते हा चहा स्वत: तयार करतात. एकाच फेरीत ते शंभर ते दीडशे कप चहा वाटप करतात, व्हेरायटी चौक, महाराष्ट्र बँक,झाशी राणी चौकात त्यांच्या हा नित्यनेमाचा सेवाभावी उपक्रम चालतो. अाम्हाला तर रुग्णालयात चहा मिळून जातो मात्र सर्वदूर चहा टपरी बंद असल्याने दिवसभर कर्तव्यावर असणारे पोलिस बांधव,सुरक्ष्ा रक्ष् क यांना अख्खा दिवस चहा शिवाय काढावा लागत होता,असे देवाराम चव्हाण सांगतात. यामुळेच आम्ही सहा जणांनी मिळून निर्णय घेतला,आजूबाजूच्या चौकातील पोलिसांनाही चहा पाजावा.
आम्हाला या उपक्रमात अतिशय आनंद मिळतो. विशेष म्हणजे या सेवाभावी उपक्रमासाठी आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिक्ष् क डॉ. हर्ष देशमुख यांनी देखील परवानगी प्रदान केली. रुग्णालयाचे संचालक व माजी आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी देखील या उपक्रमाचे कौतूक केले व जमेल तसे स्वत:ची काळजी घेऊन निश्चित चहाचे वाटप करा,असा शब्दात पाठींबा दिला. यामुळे आमचे मनोबल बळावले. आम्ही करोनापासून बचावाचे सर्व ते उपाययोजना करुनच चहाचे वाटप करतो.दिवसभरात ६०० कप चहाचे वाटप करतो. रुग्णालयापासून जड अशी केन उचलून चौकापर्यंत येणे,यात आम्हाला मुळीच त्रास होत नाही उलट मनाला स्फूर्ती मिळते.
आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो हीच आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. फार जास्त तर काही करु शकत नाही मात्र देशातील या भीषण संकटाच्या काळात खारीचा वाटा उचलतो,याचे समाधान फार मोठे असल्याचे या उपक्रमात सहभागी विजय अखंड,मोरश्वर चौधरी,योगेश बोबडे,गणेश लक्ष् णे,पंकज मोहोड,सचिन डहाळे सांगतात.




आमचे चॅनल subscribe करा
