फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपोलिसांसाठी वाजवली थाळी..पोलिसांनीच पाठ सुजवली!

पोलिसांसाठी वाजवली थाळी..पोलिसांनीच पाठ सुजवली!

Advertisements

अकोले: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यु’ चे आवाहन देशातील जनतेला केले होते,सायंकाळी ५ वाजता देशातील जनतेनी उस्फुर्तपणे पोलिसांसाठी आणि डॉक्टर्ससाठी थाळ्या वाजवल्या होत्या व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती मात्र दोनच दिवसात महाराष्ट्रातील पोलिसांना याचा विसर पडला व घरात मुलांबाळांसाठी धान्य आणायला निघालेल्या नागरिकांची पोलिसांनी मिळून चांगलीच पाठ सुजवली. हे दृश्य नागपूरसह,अमरावती, अकोले इत्यादी अनेक शहरात बघायला मिळाले. पोलिसांच्या अमानुष मारहाणीचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर फिरतात आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी सौम्यपणे वागावे आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील पोलिसांना दिले आहेत. मात्र अकोले शहरात किराणामाल खरेदीसाठी दुचाकीवरून घराबाहेर पडलेल्या एका नागरिकांला विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. तसेच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नका, असे आदेश आहेत. मात्र, तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने या लोकांना दंडुका दाखवण्यास सुरुवात केली आहे. यात काही ठिकाणी नागरिकांना कोणतीही विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून चोप दिला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील पोलिसांना नव्याने निर्देश दिले आहेत. जमावबंदीत विनाकारण काही लोक घराबाहेर पडत आहे हे खरे असले तरी पोलिसांनी त्यांच्याशी सौम्यपणे वागावे आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अकोले शहरात मात्र एका व्यक्तीला पोलिसांच्या लाठीचा विनाकारण मार खावा लागला. बुधवारी दुपारी अकोले शहरात किराणामाल खरेदीसाठी दुचाकीवरून घराबाहेर पडलेल्या सुनंदन हलदरे यांना बसस्थानक परिसरात नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानी मारहाण केली. विचारपूस करण्याआधीच त्यांना लाठीने अमानुष मारहाण करण्यात आली. हलदरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला घरातील किराणामाल खरेदीसाठी पिशवी घेऊन घराबाहेर पडल्याचे सांगितले. मात्र त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचे ऐकले नाही. यावेळी दुचाकीवरील हलदरे यांना अश्रू अनावर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबत हलदरे यांनी  सांगितले की, मी किराणामाल खरेदीसाठी घराबाहेर पडलो होतो मात्र पोलिसांनी विचारपूस करण्याआधीच मला मारहाण केली. माझ्या पाठीवर अमानुषपणे लाठीमार केला. सध्या मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोधळे यांनी या कारवाईचे समर्थन केले. राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. संचारबंदी मोडल्याने आम्ही नागरिकांना फटके दिले आहेत. त्यात एवढं विशेष काय आहे, असे जोंधळे म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या