

त्यांना फक्त मादी उचलायची होती…निर्भयाची कहानी झाली खतम
कहानी खत्म हूई और कूछ ऐसी खत्म हूई
कि लोग रोने लगे तालियाँ बजाते हूये
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
वरील शायरी ही मशहूर शायर रहमान फातिम यांची आहे. त्यांनाही कल्पना नसेल त्यांनी जेव्हा हे शब्द लिहले असतील तेव्हा ते भारताच्या राजधानीत विकृत वासनेला हकनाक बळी पडलेल्या एका तरुणीच्या मृत्यूवर हे शब्द इतके सटीक बसतील! आज निर्भयाच्या चारही मारेक-यांना पहाटे फाशी देण्यात आली आणि कारागृहाबाहेर रात्रभर जागणारे लोक यांनी ठिक सव्वा पाच वाजता टाळ्या वाजवल्या,तिरंगा लेहरवला,करोनाच्या विषाणूची भीती बाजूला सारुन या चारही नराधमांच्या मृत्यूचा जल्लोष साजरा केला.
दिवंगत विदेश मंत्री सुषमा स्वराज या निर्भयाला भेटायला रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी निर्भयाच्या स्त्री भागाची कशी त्या नराधमांनी चाळण केली याचे वर्णन तेथील डॉक्टर्स यांनी सुषमा स्वराज यांच्याजवळ केले आणि त्यांचे मन सुन्न झाले. यानंतर निर्भयाला परदेशात खास विमानाने उपचारांसाठी पाठवण्यात आले मात्र..! तिच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात सुषमा स्वराज यांना आपले अश्रू आवरता आले नाही आणि त्या म्हणाल्या….त्या रात्री त्या नराधमांना फक्त मादी उचलायची होती..दूर्देवाने निर्भया त्यांच्या तावडीत सापडली…निर्भया नसती तर दूसरी कोणी तरी ते शोधली असती…फक्त मादीच्या शोधात दिल्लीभर बस फिरवत होते…! इतर कोणाचं तरी लेकरु वाचलं..निर्भया मात्र गेली…अश्या नराधमांना फक्त फाशीच मिळाली पाहिजे…आणि त्या माईकवरच ढसाढसा रडल्या..आज निर्भयासोबतच सुषमा स्वराज यांच्याही आत्म्याला जणू शांती मिळाली असेल.
मात्र तरीही प्रश्न उरतो खरंच निर्भयाला ‘न्याय’मिळाला का? सोशल मिडीयावर शेकडो लोकांचे मत आहे ‘नाही’! कारण १६ डिसेंबर १९१२ च्या त्या रात्री जे काही घडले त्या घटनेेत विकृतीचा सर्वाधिक कळस गाठणारा तोच होता….बाल गुन्हेगार! असहाय निर्भया प्रतिकार करीत होती,एक बस चालवत होता,पाच नरभक्ष् क तिच्या शरीराचे लचके तोडत होते, तिच्या प्रतिकारावर चिडून या बाल गुन्हेगाराने तिच्या योनीत धारधार शस्त्र खूपसले अाणि कोथळाच बाहेर काढला…!तरीही तो सूटला कारण कायद्याच्या लेखी तो बाल गुन्हेगार होता..त्याचं वय १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी फक्त काही महिने बाकी होते..याचा त्याला फायदा झाला आणि तीन वर्ष बाल सुधारगृहात राहल्यानंतर आता तो…स्वस्थ समाजात वावरतोय…जिवंत! हा तोच गुन्हेगार होता ज्याच्या बाेलावण्याने निर्भया निर्भय होऊन त्याच्या बसमध्ये मित्रासह चढली. मादीच्या शोधात फिरत असणा-या या माणूस नावाच्या रानटी पशूंना अचानक निर्भया दिसली आणि याच बाल गुन्हेगाराने तिला आवाज दिला..‘दिदी कहां जा रहे हो..चलो छोड देते है आपको’ त्या मुलाच्या दिदी शब्दावर त्या भाबडी मादीने विश्वास ठेवला आणि बसमध्ये चढली. काही क्ष् णातच या पाच पशूंमधल्या रानटीपणाला त्या अभागी जिवाला सामोरे जावे लागले.विवस्त्र अवस्थेत,अंगावर एक चिंधी ही न ठेवता,तिचा रक्तबंबाळ देह डिसेंबरच्या जीवघेण्या ठंडीत सडकेवर फेकून देण्यात आला आणि तिच्या मित्राला देखील बसमधून फेकून देण्यात आले. चित्रपट सुटल्यानंतर साधारणत: साढे नऊच्या सुमारास संपूर्ण सभ्य जगाला दूखी करणारी ती घटना घडली होती. फक्त रात्रीचे साढे नऊच वाजले होते..!ज्या राजधानीच्या अनोळख्या सडकेवर ती विवस्त्र विव्हळत होती त्याच राजधानीत अनेक ठिकाणी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे मोठमोठे होर्डिंग्सही झळकत होते. म्हणूनच सोशल मिडीयावर लोकांचे कमेंट्स होते…. नाही…निर्भयाला अद्याप संपूर्ण न्याय मिळालाच नाही.म्हणून निर्भयाच्या चार मारेक-यांना जरी आज २० मार्च २०२० रोजी पहाटे फाशी झाली असली तरी हा दिवस ‘निर्भया न्याय दिवस’पाळण्यास अनेकांनी विरोधही दर्शवला आहे.
मरणापूर्वी आपल्या आईकडून त्या निष्पाप तरुणीने एकच वचन घेतले होते..काहीही झाले तरी..माझे वाईट करणा-यांना,माझ्या आत्मसन्मानाला ठेच पहोचविणा-यांना,माझ्या अस्तिवाला रक्तबंबाळ करणा-यांना फाशी झालीच पाहिजे! माध्मांना प्रतिक्रिया देताना निर्भयाच्या आईचे शब्द होते..आज मी मुलीच्या फोटोतील डोळ्यात पहील्यांदा डोळे भरुन बघितले,माझ्या छातीशी फोटो लावला आणि सांगितले..शेवटी त्या नराधमांना फाशी झाली..!
काय बोध घेतला?निर्भयाच्या घटनेवरुन राजकारणी नेत्यांनी?केंद्र सरकारने?न्यायव्यवस्थेने?उत्तर प्रदेशमधला एक राजकारणी नेता तर म्हणाला ‘निर्भया किती सुंदर होती हे तिच्या आईकडे बघून लक्ष्ात येते!’हे संस्कार दिले जातात उत्तर प्रदेशमध्ये पुरुषांना म्हणूनच देशाच्या राजधानीत निर्भया कांड घडतं…ते सर्व नराधम उत्तर प्रदेशीच होते ज्या प्रदेशात स्त्रीला फक्त मादी समजल्या जातं..माणूस नाही!
सात वर्ष लागले इतका जघन्य अपराधत करणा-यांना फाशी देण्यासाठी?कोणाचं अपयश आहे हे?किती पळवाटा आहेत कायद्यात नराधमांसाठी?बलातका-यांच्या मानवाधिकारांचे रक्ष ण करणारे कायदे हे अद्यापही १३५ वर्षे जुने इंग्रजाच्या काळातील आहेत,का नाही मोदी सरकारने धारा ३७० संपुष्टात आणले तसे देशातील प्रत्येक बलात्का-यासाठी फाशीच्या शिक्ष्ेचा कायदा अंमलात आणला? फक्त बाल गुन्हेगाराचे वय १८ वरुन १६ करणे या डिजिटल मिडियाचा स्फोट झालेल्या काळात पुरेसा आहे का? इंटरनेटमुळे दहावीच्या शाळकरी मुलाच्या हातात देखील मोबाईलमुळे पोर्न आले आहेत…मग बलात्कारी हा १६ वर्षाखालील असला तर शिक्ष्ा फक्त तीन वर्षच!ती ही बालसुधारगृहात राहणय्ाची! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे बयाण होते पोस्को कायद्याच्या अपराध्यांना दयेचा अर्ज करण्याचा अधिकारच नसावा...मग हाच न्याय देशातील बेटींवर नाही लागू होत का?आपली विकृत वासना शमवण्यासाठी तिच्या समंतीशिवाय तिच्या देहाचे प्रसंगी तिच्या अस्तित्वाचेच लचके तोडणारे नराधम यांना पण बंदी का नसावी दयेची याचिका करण्यास?
निर्भयाच्या घटनेतर कायद्यामधील संपूर्ण पळवाटा नराधमांच्या वकीलांनी वेळोवळी शोधल्या आणि एक वेळा नाही तर तीनवेळा त्या नराधमांची फाशी टळली. पहीली तारीख होती २२ जानेवारी सकाळी ७ वा.दूसरी तारीख होती १ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता,तिसरी तारीख होती ३ मार्च सकाळी ६ वाजता,चौथी तारीख मिळाली २० मार्च २०२० सकाळी पाच वाजता,तेव्हाही या नराधमांच्या वकीलाने त्यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.न्यायालयाच्या अतिशय अमूल्य वेळ वाया घालवल्यानंतर ही मुकेश सिंह या मारेक-याने तर घटनेच्या दिवशी मी शहरातच नव्हतो असा कांगावा केला.
फाशीच्या आधी पवन या गुन्हेगारची पत्नी निर्भयाच्या आईला तिच्या नव-याची जीवाची भीक मागत होती,ते दृष्य खूपच लाजिरवाणे आणि तेवढेच विदारक होते.एक स्त्री असून, डॉक्टर होऊ पाहणा-या,भरभरुन आयुष्य जगू पाहणा-या,एका निष्पाप तरुणीवर अमानूषपणे बलात्कार करुन तिचा जीव घेणा-या पुरुषाच्या आयुष्याची कामना ती एका ‘आई‘जवळच करीत होती..जगातल्या कुठल्याही ‘आई’जवळ ‘माफ’करण्याचं असं ‘काळीज’नसतं हे त्या पत्नीलाही समजले नाही. एका नराधमाची आई न्यायालयासमोरच निर्भयाच्या आईला शिव्या श्राप देत होती…स्वत: आई म्हणून चूकली असताना...एक बलात्कारी ‘पुरुष’ तिनेच स्वस्थ समाजामध्ये कुसंस्कारीत केला होता तिच निर्भयाच्या आईला श्राप देत होती!
फाशीचा दोर गळ्याभोवती आवळल्या जातानाही एक गुन्हेगार फरशीवर बसून गेला..ढसाढसा रडत होता..त्याला मरायचे नव्हते…मात्र मरावे लागले आणि त्यांच्या मरणावर अवघ्या देशाने टाळ्या वाजवल्या.कोणालाही या नराधमांशी सहानूभूती नव्हती. त्यांची फाशी रद्द करुन जन्मठेपमध्ये परिवर्तीत करण्यासाठी काळीज नसलेल्या काही मानवाधिकारी यांचे प्रयत्न सुरु होते मात्र..निर्भयाला जन्मठेप नको होती तिला हवा होता त्यांचा मृत्यूच..तसे वचनच आपल्या जन्मदात्रीकडून घेऊन ती या जगातून गेली होती. एका नराधमाने तर कारागृहातच आत्महत्या केली होती..चार नराधमांना सात वर्षांतनंतर शिक्ष्ा मिळाली,एवढंच…!




आमचे चॅनल subscribe करा
