

केरळमध्ये करोनाचे आणखी ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील सातवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या गेल्या आहेत. ८, ९ आणि १०वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. याशिवाय ट्युशन क्लासेस, आंगणवाडी, मदरसा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं.
राज्यात करोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांनाही वेगळं ठेवण्यात आलंय. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येतंय. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करावी, असं आवाहन कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामुलु यांनी केलंय.




आमचे चॅनल subscribe करा
