

ग्रेट वॉल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळवून दिला तीन महिन्यांच्या पगार
नागपूर: महामेट्रोसाठी काम करणाऱ्या सुरक्षारक्षक आणि क्युआरटी चमूचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून ग्रेट वॉल कंपनीने थकित ठेवले होते,या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सुप्रसिद्ध संघटना ‘ जय जवान जय किसान’ चे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली. संघटनेने त्वरित मेट्रो हाऊस गाठून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन सादर केले,संघटनेचे पदाधिकारी मेट्रो हाऊसला पोहोचण्यापूर्वीच ग्रेट वॉल कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा थकीत पगार देऊन त्यांची होळी साजरी केली.
महामेट्रोच्यावतीने ग्रेट वॉल कंपनीला कर्मचारी पूरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. यात १५० च्या वर सुरक्षा रक्षक काम करीत आहेत. मात्र,कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित दिले जात नसल्याची तक्रार पवार यांच्याकडे प्राप्त झाली. यामुळे पवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने दीक्षित यांची भेट घेतली. या वेळी ग्रेट वॉल कंपनीचे कर्मचारीही उपस्थित होते. जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ दरम्यान कामगारांनी केलेल्या ओव्हरटाईम चे पैसे ही कंपनीने दाबून ठेवले असल्याची तक्रार करण्यात आली.
महामेट्रोकडून कंत्राटदारांना नियमित भूगतान केले जाते. कंत्राटदार कामगारांचे वेतन करीत नसेल तर त्यांना दंड ठोठोवला जाईल अशी माहिती महामेट्रोचे उपव्यवस्थापक ( कॉर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे यांनी दिली.
कामगारांचे वेतन लगेच झाले असल्याची माहिती महामेट्रोने पवार यांना दिली. याचबरोबर तक्रारींचे निवारण करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याचेही हळवे यांनी सांगितले.
कर्मचारी यांनीही त्यांच्या मोबाइलवर पगार जमा झाल्याची माहिती संघटनेला दिली. यातील एक कामगार तर अत्यन्त आजारी होता,अनेकांच्या घरातील रेशन संपले होते,अनेकांनी मुलांच्या शाळेची फी भरली नव्हती, अनेकांच्या घरात दुधवाल्यायाने दूध देणे बंद केल्याची माहिती कामगारांनी दिली.
शिष्टमंडळात संघटनेचे सचिव अरुण वनकर, उपाध्यक्ष मिलिंद महादेवकर, पितांबर घोलपे,पंकज दिवान,आशिष डफ,अमोल जुनघरकर आदींचा समावेश होता.
ग्रेट वॉल कंपनीने एकाही कर्मचारीची नोकरी घेतल्यास पुन्हा आंदोलन-
कामगार हा आपल्या हक्काचा पैसा मागतो,भीक मागत नाही,तरीही कंत्राटदार त्यांचे शोषण करतात. जास्तीच्या पगार स्लीपवर स्वाक्षरी घेऊन कमी पगार देतात,कामगारांचा पगार तीन-तीन महिने थकऊन त्यावर व्याज खातात,या पुढे असे चालणार नाही,कामगारांना त्यांच्या हक्काच्या पगारासोबतच ओव्हरटाइमचेही पैसे मिळायला हवे, ओव्हरटाईमचे पैसे कंपनीच्या व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून २० दिवसात जमा करणार असल्याचे महामेट्रो कडून सांगण्यात आले. एकाही कामगाराची आंदोलन केल्यामुळे नोकरी गेली तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला. कामगारांचे वेतन जमा झाल्याचे एसएमएस आल्याने कामगारांनी पवार यांचे आभार मानले. यावेळी अमोल लारोकर,स्वप्नील खापेकर,नीलेश मस्के,आशिष लारोकर, जितेंद्र वाघ आदी कामगार उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
