

पत्रकारांनी पत्रकाराचीच भूमिका बजवावी
आई-बहीणींच्या शिव्यांपर्यंत घसरला स्तर:पत्रकार संघ योग्य भूमिका बजावणार का?
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
नागपूर: ‘जय जवान जय किसान संघटनेतर्फे’गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्र परिषदेत नामांंकित वृत्तपत्र ‘र्टाईम्स आफ इंडिया’चे पत्रकार आशिष रॉय यांनी पत्रकाराची भूमिका सोडून न्यायाधीशाची भूमिका बजवायाला सुरवात केली. महामेट्रोच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्ष्ीत यांची या पदावरील नियुक्ती अवैध असून पगार,भत्ते,इतर सुविधा हे देखील नियमबाह्य असलय्ाचे मुद्दे संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार हे मांडत होते. दीक्ष्ीत यांनी वर्षाला ६४.०३ लाख रुपये आरोग्यावर खर्च केल्याची आकडेवारी महामेट्रोच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध झाली,यावर माहिती सांगत असताना रॉय यांनी हा खर्च फक्त आरोग्यावरच झाला कश्यावरुन?त्यांच्या दौ-यांवरही खर्च झाला असू शकतो,असे स्पष्टीकरण देण्यास सुरु केले.ही माहिती खोटी निघाली तर तुम्ही माफी मागाल का?अशी ‘न्यायाधीशाची ’भूमिका बजावण्यास सुरवात केली.
मी कशाला माफी मागू? असे प्रतिउत्तर पवार यांनी दिले.यावर मग आरोप कशाला करता?असा ‘चमत्कारीत’प्रश्न रॉय यांनी उपस्थित केला,यावर तू काय मेट्रोचा दलाल आहे का?असा प्रतिप्रश्न पवार यांनी विचारताच रॉय यांनी ‘टाईम्स’ची सर्व गरिमा मातीत मिसळून ‘बहीणी’वरुन घाणेरडी शिवी दिली!
क्रियेला शेवटी प्रतिक्रिया होणारच,एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचा पत्रकार ‘बहीणी’वरुन एवढ्या खालच्या दर्जाची शिवी पत्र परिषद घेणारयांसाठी देतो,यावरुन पत्रकारांची भूमिका नेमकी काय?हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला.मूळात कोणतीही पत्रकार परिषद ही ‘माहिती’देण्यासाठीच असते. पत्र परिषद घेणारे हे अारोप करतात,पुरावे देतात,माहिती सांगतात, त्यांची बातमी प्रसिद्ध करने किवा न करने याचे स्वातंत्र्य वृत्तपत्रांना आहे. पत्र परिषद घेणारे वृत्तपत्रांच्या संचालकांना ’आमची बातमी का छापली नाही?’असा प्रश्न विचारायला जात नाही,तो अधिकार ही त्यांना नसतो या पार्श्वभूमीवर पत्रकारांनीही मग ‘पत्रकाराचीच’भूमिका का वठवू नये?
खरी पत्रकारीता ही लोकांची बाजू मांडणे,इतकीच आहे. न्याय निवाडा करणे,पुरावे मागणे,हे पत्रकाराचे काम नाही फक्त माहितीची सत्यता मिळवण्याची पत्रकारांना मुभा आहे.पण त्याला देखील एक मर्यादा आहे.प्रशांत पवार हे खोटे आहे की खरे,याची खातरजमा रॉय हे ‘मेट्रो’विभागाला देखील विचारु शकले असते मात्र त्यांनी असे केले नाही. मेट्रोचे म्हणने ही ते मांडू शकले असते मात्र पत्र परिषदेला आधीच एक ‘विशिष्ट’भूमिका घेऊन बसने याचा अर्थ बाहेरच्या जगात ‘वेगळा ’निघतो.पवार यांनी या संपूर्ण राड्यात ‘पत्रकार आणि त्यांची दलाली’या वर्मावर बोट ठेवले.
‘आपुलीच प्रतिमा…आपुलीच वैरी’अशीच ही दूर्देवी घटना होती. एका पत्रकाराच्या चूकीच्या वर्तवणूकीतून संपूर्ण पत्रकार जगतावर ‘दलाली’चा ठपका ठेवला गेला, पत्र परिषदा घेणारे असो किवा बातम्यांचे ‘बाजारीकरण’करणारे असो,सगळेच मिडीयाला वापरुन घेत आहेत. जनसंवाद विभागाच्या वर्धापन सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ‘द हिंदू’चे पी.साईनाथ यांनी नुकतेच पत्रकार क्ष्ेत्रातील विदारक सत्याकडे लक्ष् वेधताना ‘गेल्या वीस वर्षांपासून माध्यमे ही व्यवसायिक झाली आहेत तरी देखील पत्रकारांनी मुल्याधिष्ठित पत्रकारीता करणे अपेक्ष्ति आहे,हीच खरी पत्रकारिता आहे’असे कळकळीचे शब्द अधोरेखित केले होते.
पत्रकार सोडा वृत्तपत्रीय जगतात संपादक पदे भूषवणारे माजी संपादक हे देखील आपली गरिमा विसरुन(पदाची ) भ्रष्ट राजकीय नेते, समाजातील मोठी धेंडे यांची तळी उचलताना दिसत आहेत.यामुळे देखील पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकाेण बदलला,यात दूमत नाही.
शहरातील एक ‘सांस्कृतिक महर्षि’तर अनेक संपादकांसाच्या पुर्नस्थापनेसाठी सज्ज असतात. वाड्यावर गेले की ‘निर्मल’ही भ्रष्ट गंगा होऊन गेलेली उदाहरणे आपल्या नागपूरातच आहे.‘या ‘निर्मल’च्या दारात आपली गरिमा विसरुन माजी संपादक हे ‘बाळबुद्धिने’वागताना पत्रकारीतेचं जग बघतच आहे.एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या संपादक पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर ही त्यांचं पुर्नवसन दुस-या दैनिकात त्याच पदावर होते,ही ‘वाड्यावरचीच’महिमा असल्याचे बोलले जाते.
जिथे माजी संपादक हेच आपल्या प्रतिमेची बूज राखत नसतील तिथे रॉय सारखे पत्रकार यांच्याकडून अपेक्ष्ा तरी काय करणार? आजच्या पत्र परिषदेत रॉय यांची भूमिका ही पत्रकाराची नव्हती,पत्र परिषद घेणारे हे आई-बहीणीच्या शिव्या फक्त ते पत्रकार असल्याने मुकाट्याने ऐकून घेतील,अशी अपेक्ष्ा करणे योग्य नाही.क्रियेला प्रतिक्रिया ही उमटणारच.मूळात आजच्या या संपूर्ण प्रकरणात पत्रकार संघाची’भूमिका ही स्पष्ट झाली पाहीजे. पत्रकारांनी आपली भूमिका योग्यरित्या बजावली तर .अर्वाच्य शिव्या खाण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही,हे ही तितकेच खरे.




आमचे चॅनल subscribe करा
