फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसीताबर्डी किल्ल्याचे खाजगीकरण! ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांचा आरोप

सीताबर्डी किल्ल्याचे खाजगीकरण! ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांचा आरोप

Advertisements

११८ बटालियनचे तातडीने केले स्थलांतरण
नागपूर: शहरातील सीताबर्डी येथील किल्ल्यामध्ये जे सैनिक गेल्या अनेक दशकांपासून रिक्रूट होते त्यांचे अचानक नाशिक येथे स्थलांतरण करण्यात आले,या मागे काय हेतू आहे? सीताबर्डी येथील मोक्याचे जागेचे सरकारला खाजगीकरण करायचे असल्याचा आरोप ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पत्र परिषदेत केला.

१९९१ साली शरद पवार हे संरक्ष् ण मंत्री असताना या किल्ल्याच्या खाजगीकरणाचा घाट त्यांनी घातला होता,असा आरोप ब्रिगेडीयर सावंत यांनी पत्र परिषदेत केला.सैनिकांसाठी हे ठिकाण म्हणजे एकमेव प्रेरणास्त्राेत(हरित किरण)असल्याचे ते म्हणाले.सीताबर्डी किल्ला हा भारतात प्रादेशिक सैन्याचे सर्वात महत्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणी नाशिक,पुणे, कोल्हापूर,भूसावळ व नागपूर असे केंद्र आहेत.हे स्थायी बटालियनसाठी स्थान असते.मात्र  खाजगीकरणासाठी ११८ बटालियनचे हक्काचे स्थान हिरावून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.महत्वाचे म्हणजे अतिशय अल्प सूचनेवरुन या स्थानावरुन ११८ बटालियनला नाशिक येथे स्थानांतरीत करण्यात आले आणि बेकायदेशीर ताबा मिळवण्यात आला असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

तूर्त या किल्ल्यावर ‘सब एरिया’चा ताबा असल्याचे ते म्हणाले.ही माहिती मात्र कोणालाही नव्हती.मला आपल्या सैनिकांकडून कळले म्हणून ही पत्र परिषद घेत अल्याचे त्यांनी सांगितले. सैन्यामध्ये जे काही बदल होतात, माजी सैनिक म्हणून मला माहिती कळते असा दावा त्यांनी केला.

नाशिक बटालियनमध्ये आधीच १ हजार सैनिक असून पुन्हा सीताबर्डीतील ९०० बटालियन सैनिकांचा समावेश नाशिकमध्ये करण्यामागे काय औचित्य आहे?असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.या विरोधात सैन्य दल प्रमुख तसेच देशाचे संरक्ष् ण मंत्री यांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.मी काँग्रेसचा खासदार असताना देखील सैन्याशी संबधित अनेक मुद्दे संसदेत उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.या निर्णयाचा फेरविचा न झाल्यास ‘जय जवान जय किसान’संघटनेमार्फत सरकारच्या या धोरणाचा निषेध करु व या विरुद्ध राष्टीय पातळीवर आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी दिला.

जवानांमध्ये ९० टक्के ही शेतक-यांची मुले असतात.देशाचे संरक्ष् ण करणारे व देशाला अन्न पुरवणारी जमात आज उधवस्त होत आहे.सैनिक १८ व्या वर्षी सैन्यात भर्ती होतो व, ३३ साव्या वर्षी निवृत्त होतो,यानंतर त्याला पेशंनवर आयुष्य कठांवे लागते.  अश्‍या जवानांची राज्यांच्या सेवेमध्ये किवा वनीकरण विभागात घेणे सरकारचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.सैनिकांना केंद्र किवा राज्यामध्ये निवृत्तीनंतर नोकरी का नसावी?दहशतवाद विरोधत निवृत्त सैनिकांचा चांगला उपयोग होऊ शकतो.राज्यात भूकंप,पूर,इ.नैसर्गिक संकटांचा सामना खूप चांगल्या पद्धतीने करु शकतात कारण त्यांची मानसिकता ही संकटांच्या विराेधात लढण्याचीच असते.अस्मानी असो किवा सुलतानी सैनिक कोणत्याही परिस्थितीत तत्पर सेवा देऊ शकतो.

टी.चंद्रशेखर हे मनपा आयुक्त असताना ‘सिविल कॉप’ म्हणून निवृत्त सैनिकांना सेवेत घेतले होते.सैनिकांचे निवृत्ती आयुष्याच्या मध्यम टप्प्पयात होत असल्याने फार मोठा प्रश्‍न त्यांच्या समोर निर्माण होतो.यासोबतच महिला सैनिक यांचाही लढा मोठा आहे. मूळात त्यांना फार उशिरा म्हणजे १९९३ पासून सैन्यात घेण्यात आले.यासाठी देखील त्यांना प्रदीर्घ लढा सर्वोच्च न्यायालापर्यंत द्यावा लागला. नुकतीच त्यांनी सर्वाच्च न्यायालयातू दूसरी लढाई देखील जिंकली.विविध सैन्य ऑपरेशनमध्ये महिला जवान या खूप चांगले सहकार्य देऊ शकतात असे ब्रिगेडीयर सावंत म्हणाले.

पत्र परिषदेला ‘ जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.

शेतक-यांनाही सन्मान निधी द्या-
भारताच्या संविधानाने प्रत्येकाला सनमानाने जगण्याचा अधिकारी दिला आहे यात शेतकरी देखील आले. सरकारने प्रत्येक शेतक-याला १० हजार रु.महीना सन्मान निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली.देशात सर्वात दयनीय दशा ही अन्नदात्यांचीच आहे.उत्पन्ना अभावी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत,हे कोणत्याही देशासाठी भूषणावह नाही.उलट सरकारमधील काही नेते शेतक-यांच्या विरोधात त्यांना अुनदान देऊ नये,सरकार ही धंघासाठी नाही, फूकट देणे पाप आहे,अशी मुक्ताफळे उधळते,एकीकडे सरकारी कर्मचा-र्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जातो मात्र देशाचा पोशिंदा हा उपाशी मरत असल्याची टिका त्यांनी केली.

माजी पोलीस महासंचालक राकेश मारिया यांच्या पुस्तकातील विधानांविषयी विचारले असता,अजमल कसाबसाठी राकेश मारिया जे सांगतात आहे त्याच्याशी सहमत नसल्याचे ते म्हणाले. करकरे यांना मारण्यासाठी तो हल्ला झाला असल्याचा दावा ब्रिगेडीयर यांनी केला. नुकतेच जे कौतूकराव ठाले पाटील यांनी जे विधान केले ते माझेच ऐकून केले असल्याचा दावा ही त्यांनी केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या