फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशविद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर विधी मंडळ ग्रंथालयाचे बाबा वाघमारे

विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर विधी मंडळ ग्रंथालयाचे बाबा वाघमारे

Advertisements

‘विद्यार्थ्यांचे विधीमंडळ भेट’ उपक्रमाचे ३० व्या वर्षी पदापर्ण

डॉ.ममता खांडेकर

(Senior Journalist)

नागपूर,२३ डिसेंबर: हिवाळी अधिवशेनाचे नुकतेच शनिवारी सूप वाजले. सहा दिवसांच्या या अधिवेशनात राज्यातील सर्व आमदार,नेते,सचिव,कार्यकर्ते,प्रसार-प्रचार माध्यम प्रतिनिधींची वर्दळ तर होतीच मात्र विद्यार्थ्यांच्या वर्दळीनी याही वर्षी लक्ष् वेधून घेतले. विधी मंडळातील ग्रंथालयात संदर्भासाठी गेले असता ग्रंथालयाचे ग्रंथपाल व माहिती संशोधन अधिकारी बाबा वाघमारे या ही वेळी एवढ्या धावपळीच्या वेळेतून वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आढळले.

मॉरीस कॉलेजमधील राज्यशास्त्राचे विद्यार्थी हे आवर्जून विषयांना समजून घेत होते. कौतूक याचं जास्त वाटलं जेव्हा तेच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या कॉलेजच्या हॉस्टेलमधील इतर विद्यार्थ्यांनाही घेऊन आले. बघायला गेलं तर एक साधासा,नियमित उपक्रम मात्र शिकण्याची, ऐकण्याची,समजून घेण्याची वैदर्भीय विद्यार्थ्यांमधील ही जिज्ञासा नक्कीच कौतुकास्पद असून दूर्लक्ष् करण्यासारखी नव्हती.

देवानंद राठोड या विद्यार्थ्याला विचारले असता, मी काल मार्गदर्शनासाठी इतर विद्यार्थ्यांसोबत आलो होतो,मला अजून ऐकण्याची जिज्ञासा होती त्यामुळे हॉस्टेलमधील इतर आणखी विद्यार्थ्यांना पुन्हा घेऊन आलो. ग्रंथपाल बाबा वाघमारे हे ज्या तळमळीने आम्हाला सर्व विषयांची माहिती देतात ती ऐकून जिज्ञासा आणखी वाढते. विशेषत: सगळे विषय समजून देताना ते स्वत:च्या जीवनातील संघर्षही सांगतात,कश्‍याप्रकारे जे लहानशा गावातून शहरात आले, शिक्ष् ण घेतलं, हॉस्टेलवर रहात असताना कोणत्या समस्यांना ते देखील सामोरे गेले,जीवनातील यश-अपयश ऐकून प्रेरणा मिळते,असे तो सांगतो.

‘विद्यार्थ्यांचे विधीमंडळ भेट’या उपक्रमाने आता ३० व्या वर्षात पदापर्ण केले आहे. १९९० पासून या उपक्रमाला सुरवात झाली होती. राष्ट्रकूल संसदेच्यावतीने सन १९६८ पासून राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील राज्यशास्त्राचे विद्यार्थ्यांसाठी एक सात दिवसांचा अभ्यासक्रम विधीमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये मुख्यमंत्री, पीठासीन अधिकारी सदस्य व ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करतात. या विद्यार्थ्यांना विधी मंडळाच्या प्रत्येक कक्ष्ाचे काम कसे चालते याचा प्रत्यक्ष् अनुभव येण्यासाठी संबंधित कक्ष्ाच्या प्रमुखाकडे माहिती घेण्यासाठी पाठवले जाते. विधी मंडळ ग्रंथालयाचे ग्रंथपाल हे देखील या उपक्रमाअंतर्गत त्यांना सविस्तर माहिती देत असतात.

नागपूर येथे अधिवेशन होत असताना फक्त राज्यशास्त्राच्या मोजक्या विद्यार्थ्यांना फायदा होत होता मात्र विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाच्या इतरही विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा फायदा व्हावा यासाठी १९९० पासून नागपूर विधी मंडळात या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.अधिवेशनासंबंधी प्रत्येक विद्यार्थ्याला आकर्षण असंत म्हणून शाळा,महाविद्यालय, कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी देखील या उपक्रमामार्फत विधी मंडळातील कामकाज बघत असतात. माहिती घेत असतात.यासाठी शाळा व महाविद्यालयांच्यावतीने विधान सभा अध्यक्ष् व विधान परिषद सभापतींकडे रितसर अर्ज करण्यात येतो.याद्वारे त्यांना रितसर परवानगी देऊन सभागृहाचे कामकाज पाहण्याची संधी दिली जाते.

अविरतपणे हे काम २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात देखील सुरु राहीले. विधीमंडळाचे कामकाम पाहील्यानंतर विद्यार्थी हे ग्रंथालयाला भेट देतात. या भेटीमध्ये राज्याचे आमदार घडवणारे ग्रंथालय कसे आहे?सदस्य सभागृहात बोलण्यासाठी कोणत्या ग्रंथांचा संदर्भ घेतात?.हे कुतुहल असते. ग्रंथपाल व माहिती अधिकारी बाबा वाघमारे ही जवाबदारी अगदी चोख बजावतात. विधी मंडळाचा इतिहास,संस्थेच्या प्रथा,परंपरा,विधी मंडळातील महत्वाच्या चर्चा, उत्कृष्ट संसदपटू,सदस्यांची अभ्यास करण्याची पद्धती,ग्रंथालयातील विविध संदर्भ पीएच.डी संशोधकांना देणे, यासह नागपूरचा इतिहास,विधान भवनाचा इतिहास,राजदंडाची माहिती, अर्थ संकल्पाची माहिती अत्यंत सोप्या शब्दात ग्रंथपाल वाघमारे हे विद्यार्थ्यांना समजावत होते.

प्रत्येक अधिवेशनात आठ ते दहा शाळा या उपक्रमात सहभागी होतात हे विशेष! महाविद्यालयीन विद्यार्थी तर बाबा वाघमारे यांचा आदर्शच घेऊन ग्रंथलयातून बाहेर पडताना दिसून पडतो,यात शंका नाही.

………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या