गोंदिया,दि.0७- : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील(ओबीसी) इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाèया मुलींसाठी सन २०१९-२० पासून शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाने ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे.साधारणत: शालेय जीवनात पाऊल ठेवताच विद्याथ्र्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून दुजाभावाचा सामना करावा लागतो. त्याचा विद्याथ्र्यांच्या कोवळ्या मनावर निश्चितच नकारात्मक परिणाम होतो. आता मात्र सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून वर्गातील सर्व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळणार असल्याने निश्चितच विद्यार्थिनींमधला दुजाभाव कमी होणार आहे.
राज्यातील जि.प.व खाजगी माध्यमिक शाळांमधून इतर मागास प्रवर्गातील इयत्ता ५ ते १० वी मध्ये हजारो विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ २०१९-२० या सत्रापासून मिळणार आहे.
त्याअंतर्गत इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थिनींना दरमहा ६० रुपये तर इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थिनींना दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यात कसलीही उत्पन्नाची अट नसून एकूण दहा महिने शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्गातील मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतच्या मुलींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना १२ जानेवारी १९९६ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील इतर मागास प्रवर्गातील मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शैक्षणिक सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्यातील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे.
ही योजना राज्यातील प्राथमिक व माध्यमिक आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाèया इतर मागास प्रवर्गातील इयत्ता ५ ते १० वी मधील मुलींना लागू राहणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी कुठल्याही उत्पन्नाची अट नसून इयत्ता ५ वी ते ७ वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी दरमहा ६० रुपये दहा महिन्यांसाठी ६०० रुपये तर इयत्ता ८ वी ते १० वी मधील इ.मा.व.मुलींना दरमहा १०० रुपये दहा महिन्यांसाठी १००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे..