फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजश्री श्री रविशंकर यांच्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी जगात नाही: नितीन गडकरी

श्री श्री रविशंकर यांच्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी जगात नाही: नितीन गडकरी

Advertisements

खासदार सांस्कृतिक महोत्सवात नागपूरकरांना केले सहयोगाचे आवाहन

नागपूर: खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून या महोत्सवाची सुरवात अनेकांच्या सहयोगाने खूप चांगल्या पद्धतीने झाली.यावेळी देखील सेलिब्रिटी कलावंतांसोबतच स्थानिक कलावंतांना त्यांच्या सादरीकरणासाठी भरपूर वाव मिळाला आहे.अनेकांच्या नाराजीमुळे एकाच ठिकाणी हा महोत्सव न घेता यावेळी तो शहराच्या सहा प्रभागात निरनिराळ्या दिवशी घेण्यात येणार आहे. उद् घाटनाला अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर येणार असून माझ्या नजरेत ते जगातील सर्वात मोठे सेलिब्रिटी असल्याचे विधान केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गेल्या वर्षी खासदार सांस्कृतिक महोत्सावाचे उद् घाटन हे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या हस्ते झाले होते हे विशेष.

ते शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.याप्रसंगी मंचावर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खा.विकास महात्मे, आ. कृष्णा खाेपडे, आ.मोहन मते,आ. विकास कुंभारे,माजी खा.दत्ता मेघे, वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष् गिरीश गांधी,महापौर संदीप जोशी, भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके,माजी महापौर नंदा जिचकार, मा.आ.सुधाकर देशमुख,जयप्रकाश गुप्ता, संजय भेंडे,मधूप पांडेय आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की खासदार सांस्कृतिक महोत्सावाच्या निमित्ताने कलाप्रेमींसाठी फक्त वर्षातून एकदाच नव्हे तर वर्षभर लहान-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम हे सुरु राहीले पाहिजे. मी खासदार झालो तेव्हाही हेच सांगितले होते विकास म्हणजे फक्त रस्ते,वीज,पाणी नसून शैक्ष् णिक,सांस्कृतिक,क्रीडामध्ये होणारी प्रगती ही देखील समाजाची विकासात्मक गरजच आहे.संदीप जोशी यांच्या नेतृत्वात क्रीडा महोत्सव भरवण्यात आले. यात शहरातील २९ मैदानात १० हजार क्रीडापटूंनी सहभागा नोंदवला. लवकरच शहरात १५० मैदाने तयार होत आहेत.

यावेळी देखील खासदार सांस्कृतिक सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्याची सूचना त्यांनी केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना हेमा मालिनी,सुरेश वाडकर,सुफी संगीतचे बादशहा खासदार हंसराज हंस असे अनेक आकर्षण यावेळी देखील महोत्सवात बघायला मिळणार आहे.१७ दिवसांचा हा अविस्मरणीय सोहळा तुमच्या सर्वांच्याच सहयोगाने होणार असल्याचे ते म्हणाले.यात प्रचार-प्रसार माध्यमांसोबतच ईश्‍वर देशमुख शारिरीक शिक्ष् ण महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी आभार मानले.नागपूरचे सांस्कृतिक वैभव वाढवणे,नव्या पिढीची ओळख साहित्य,संस्कृती,कलेशी व्हावी,ही विरासत पुढे जावी, सर्वांचे आयुष्य समृद्ध व्हावे हा या महोत्सवाचा उद्देश्‍य असल्याचे ते म्हणाले. यावेळी मैदानात लावण्यात येणारे स्क्रीन हे देखील मोठे असणार असल्याचे त्यांनी सांगितले.या स्क्रीनवर मंचावर घडणारे अगदी लहान-लहान हालचाली देखील प्रेक्ष् कांना अतिशय स्पष्ट दिसणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग महोत्वात बघायला मिळणार असून.पहील्यांदाज २० हजार स्के.फू.चा भव्य मंच उभारला जात अाहे. २ हजार कलावंत महोत्सवात सादरीकरण करणार आहे. यात १ हजार हे नागपूरचेच कलावंत असणार आहे. हा उत्सव तुमच्या-आपल्या सर्वांचाच असून सर्वांनीच सहयोग करावा व महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले.प्रास्ताविक प्रा.अनिल सोले यांनी केले.

यू-ट्यूब चॅनल लाँच केले याचा विशेष आनंद-
याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी या वर्षीच्या खासदार सांस्कृतिक महोत्सावातील सर्व कार्यक्रम हे यूू-ट्यूबवर लाईव्ह दिसणार असल्याचा विशेष आनंद झाला असे ते म्हणाले. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते यू-ट्यूब चॅनलचे उद् घाटन बटन दाबून करण्यात आले.ज्या कलाप्रेमींना प्रत्यक्ष् कार्यक्रम स्थळी येऊन कार्यक्रमांचा आनंद घेणे शक्य नाही त्यांना घरी बसूनच महोत्सवाचा अानंद आता घेणार आहे याशिवाय एका फोनवर मिसकॉल देऊन घरपोच कार्यक्रमाचे पासेस रसिकांना मिळणार आहे यामुळे कार्यक्रम स्थळी त्यांच्या सुरक्ष्ति बसण्याची सोय होणार आहे.ही देखील योजना अत्यंत कौतूकास्पद असल्याचे ते म्हणाले.

वादकांच्या तालवाद्यांवर बहरणार गायकांचे सूर-शैलेश दाणी(सुप्रसिद्ध संगीतकार)
महोत्सवात पहील्याच दिवशी ‘सूर-ताल-संसद’हा आगळा-वेगळा कार्यक्रम सादर होणार असून यात ८०० नागपूरकर कलावंत हे आपली कला सादर करणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मुख्य वादकांचा असून पहील्यांदाज वादकांच्या तालवाद्यांवर गायकांचे सूर बहरणार आहेत. ४५० वादक कलावंतांमध्ये हे रिद् म,ढोल-ताश्‍यांचे पथक,डफ,ऑक्टोपॅड,तबला,नाड,ड्रम्स,मेलोडी सेक्शनमध्ये सतार,गिटार,व्हायोलिन,बासरीवादन राहणार असून २०० गायक हे या ताल वादकांना साथसंगत करतील तर २०० कलावंत हे नृत्य सादर करणार आहेत अशी माहिती नागपूरचे सुप्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यांनी दिली. ही सर्वस्वी वेगळी संकल्पना असून यात महाराष्ट्रातील लोकसंगीत, लोकसंस्कृतीची झलक प्रेक्ष् कांना बघायला व ऐकायला मिळणार आहे.संत परंपरा,गोंधळ,लावणी, कोळी गीत,लोकगीत,शिवराज्याभिषेक इ.महाराष्ट्राचे एकूणच जीवनदर्शन यात घडणार असून हा अविस्मरणीय कार्यक्रम नागपूरकरांनी मिस करु नये असे आवाहन दाणी यांनी केले.

थोडक््यात-
-जागतिक कीर्तीचे आध्यामिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद् घाटन
– प्रथमच १७ दिवसांचे आयोजन
-शहरातील सहा प्रभागात सादरीकरण
-स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील २ हजार कलावंतांचा सहभाग
– २० हजार फूटांचा भव्य मंच
– मिस कॉल द्या,पासेस मिळवा-८६९६४४८८८३(फक्त दुपारी ३ वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध राहील)
यू-ट्यूबवर घ्या घरी बसल्या आनंद,लॉग ऑन करा ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’
स्थळ- ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण
दिवस-शुक्रवार २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान

असे आहेत कार्यक्रम-
शुक्रवार,२९ नाेव्हेंबर- उद् घाटन सोहळा, ‘सूर-ताल-संसद’चे अनोखे प्रस्तुतीकरण(ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं.६ वा.
शनिवार,३० नोव्हेंबर-ललित दीक्ष्ति,शान व साधना सरगम ‘लाईव्ह कॉन्सर्ट’(ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं.६ वा.
रविवार,१ डिसेंबर- सुरेश वाडकर व चमू यांचे ‘सूरमयी शाम’(ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं.६ वा.
सोमवार,२ डिसेंबर- पदमश्री हंसराज हंस लाईव्ह कॉन्सर्ट(परेड मैदान,ग्रामीण पोलीस मुख्यालय, लाल गोदाम शेजारी,उत्तर नागपूर)सायं.६.वा.
३ ते ५ डिसेंबर-‘रणरागिणी’राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील महानाट््य(ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं ६ वा.शुक्रवार,६ डिसेंबर- ‘डॉ.भीमराव रामजी आंबेडकर’ शैलेश बागडे यांची प्रस्तुती(ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं.६ वा.
शनिवार,७ डिसेबर-‘हास्य कवी संमेलन’ सहभाग- तारक मेहता फेम शैलेश लोढा, कवी मधूप पांडे, कवी जगदीश साेळंकी,कवी प्रवीण शुक्ला व कवी दिनेश दिग्गज (ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण) सायं.६ वा.
रविवार,८ डिसेंबर-‘मै लता’ म्युझिकल कॉन्सर्ट,सहभाग-सुप्रसिद्ध पार्श्वगायिका महालक्ष्मी अय्यर व नागपूरच्या सुवर्णा माटेगावकर(ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं.६ वा.
सोमवार,९ डिसेंबर-‘मै लता’ म्यूझिकल कॉन्सर्ट (भेंडे ले-आऊट)सायं.६ वा.
मंगळवार,१० डिसेंबर-‘मै लता’ म्यूझिकल कॉन्सर्ट (काछी विसा मैदान,लकडगंज)सायं.६ वा.
बुधवार,११ डिसेंबर- ‘आनंदवन भुवनी’(रामनगर मैदान)सायं.६ वा.
गुरुवार,१२ डिसेंबर-‘महारथी कर्ण’ महानाट््य (ईश्‍वर देशमुख महाविद्यालय पटांगण)सायं.६ वा.
शुक्रवार, १३ डिसेंबर- ‘युगपुरुष-स्वामी विवेकानंद’(ईश्‍वर देशमुख महाविद्यालय पटांगण)सायं.६ वा.
शनिवार,१४ डिसेंबर-‘पियानो कॉन्सर्ट’सहभाग-गौरी कपाल,‘डान्स ऑन व्हील’सहभाग- डॉ.सय्यद पाशा(ईश्‍वर देशमुख महाविद्यालय पटांगण)सायं.६ वा.
रविवार,१५ डिसेंबर-समारोप व सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगणा हेमा मालिनी यांचे ‘माँ गंगा’नृत्यनाटिका (ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण)सायं.६ वा.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या