फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशगानसम्राज्ञी लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Advertisements

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वासोच्छवास करण्यास त्रास होऊ लागल्याने आज दुपारी दीडच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

च कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, लतादीदींना आयसीयुत दाखल करण्यात आले आहे.

रविवारीच लता मंगेशकर यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी सिनेमा ‘पानीपत’ मधील गोपिका बाईंची भूमिका निभावणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांचा फर्स्ट लुक शेअर केला होता. पद्मिनी लतादीदींची भाची आहे. दीदींनी सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला.

लता मंगेशकर यांनी हिंदी सिनेमात हजारो गाणी गायली आहेत तर प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी विविध गाणी गायली आहेत. त्यांनी सुमारे ३६ प्रादेशिक आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांना भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह त्यांचा आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या