फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअवकाळी पावसामूळे धान पीक संकटात, तातडीने पंचनामे करा अन्यथा तीव्र आंदोलन: वडेट्टीवार

अवकाळी पावसामूळे धान पीक संकटात, तातडीने पंचनामे करा अन्यथा तीव्र आंदोलन: वडेट्टीवार

Advertisements

चंद्रपूर:  अवकाळी पावसामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयासह पूर्व विदर्भातील धान पीक तसेच पुर्व व पश्चिम विदर्भातील कापूस, सोयाबिन, ज्वारी यासह अनेक पीक संकटात सापडले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असतांना विदर्भात अद्यापही पंचनामे सुरू करण्यात आले नाही. परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्याचे सोडून हे सरकार फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी दंग असल्याचा गंभीर आरोप आमदार विजय वडेटटीवार यांनी केला असून परतीच्या पावसामूळे पीकाचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडेटटीवार यांनी दिला.

यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग घोंघावत होते. पंरतु, नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिेकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीच्या पूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. त्याचे पुंजने तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी जावू द्यावा लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने या कडपा भिजल्या आहेत. भारी धान अजुनही शेतात उभा आहे. परंतू, दिंनाक २९ ऑक्टोंबर आणि त्यांनतर येत असलेल्या परतीच्या पावसामूळे संपुर्ण धान पीक आडवा पडून नष्ट झालेला आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अधिक पीक येणार असल्याने धीर आला होता. परंतु, अवकाळी व परतीच्या पावसामूळे शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे. धान, सोयाबिन, कापूस, ज्वारी यासह अनेक पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. असे असतांना सुध्दा सरकारच्या वतीने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देणे अत्यंत आवश्यक असतांना सुध्दा हे सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी दंग असल्याचा आरोप त्यांनी केला.

अवकाळी पावसामूळे विदर्भासह राज्यातील खरीप हंगामातील सर्व पीके नष्ट होत असल्यामूळे यासर्व पीकांचे तातडीने पंचनामे करणे आवश्यक असतांना सुध्दा अद्यापही पंचनामे सुरू करण्यात आले नाही. प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी दिवाळीनिमित्त सुटटीवर असून पंचनामे कोण करणार असा प्रश्न  वडेटटीवार यांनी केला आहे. त्यामूळे, शासनासह प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे गांर्भीयाने लक्ष घालून परतीच्या व अवकाळी पावसामूळे नुकसान झालेल्या पीकांचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे पाठविलेल्या लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

या अवकाळी व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस मातीमोल झाल्याने हादरलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्हयातील माळकिन्ही येथील अल्पभुधारक शेतकरी गजानन रामजी शिरडकर, वणी तालूक्यातील सूर्यभान भगवान भलमे, पांढरकवडा तालूक्यातील अंकोली येथील सतीश गुणंवत खटाळे, आसेगाव येथील तसलीम खान नाबियार खान हे चार शेतकरी ३० ऑक्टोंबरला गळफास व विषपाशन करून आत्महत्या केली . शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारला आणखी किती बळी हवेत, असा प्रश्न करून शेतकरी ही एकच जात आणि धर्म असतांना सरकार धान खरेदी करतांना जात का विचारत आहे, असा सवाल  केला . ३३ टक्केपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सरकारने दिले असून हा आदेश म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सरकारने हा आदेश तातडीने रदद करून पीकांचे सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी केली .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या