फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआम्ही कामे केली म्हणून मत मागायला आलो: नितीन गडकरी

आम्ही कामे केली म्हणून मत मागायला आलो: नितीन गडकरी

Advertisements

नागपुर: गेल्या ५० वर्षात विकास नाही, त्याच्या कितीतरी पट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ५ वर्षात कामे केली. आम्ही कामे केली म्हणून मत मागायला आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झालेला चौफेर विकास सर्वांसमोर आहे. पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणात कामे झाली. लिबर्टीजवळील उड्डाण पूल, काटोल मार्गाचे चौपदीकरण, रिंग रोड याखेरीज शहराच्या सर्व भागात ७२ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. सिम्बॉयसिससह लॉ स्कूल, आयआयआयटी, एम्ससारख्या संस्था आणल्या. शैक्षणिक संस्थांमुळे नागपूर-विदर्भातील तरुणांना शिक्षणासाठी मुंबई, पुण्यात जाण्याची गरज नाही. भाजपचे पश्चिम नागपूरचे सुधाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरी यांची शुक्रवारी रात्री बोरगाव चौकात जाहीर सभा झाली. प्रचारातील त्यांची शहरातील ही पहिलीच सभा होती. विदर्भासह राज्यभर त्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत.

सुधाकर देशमुख यांची ही अखेरची निवडणूक असल्याने यावेळी त्यांना निवडून द्या, असे थेट भावनिक आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करून शहरातील विकास कामांची जंत्री परत एकदा जनतेच्या दरबारात मांडली. एरवी विरोधी पक्षावर हल्ला चढवणाऱ्या गडकरी यांनी ३४ मिनिटांच्या भाषणात कुणाचेही नाव घेतले नाही वा टीका केली. ‘नो पॉलिटिक्स, ओन्ली विकास’ यावर त्यांचा पूर्ण भर होता. सुधाकर देशमुख यांच्या आयुष्याची ही शेवटची निवडणूक आहे. पुढच्यावेळी त्यांना तिकीट देणार नाही. त्यामुळे यावेळी निवडून द्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.

.आतापर्यंत २६ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असला तरी, रोजगाराची सर्वाधिक चिंता आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मिहान प्रकल्पात टीसीएस, टाल, एचसीएलसारख्या कंपन्या आणल्या. एचसीएलमध्ये २ हजार तरुणांना संधी मिळाली. येत्या ३ वर्षात १५ हजार तरुणांना संधी मिळेल. आम्ही कधीही भेदभाव केला नाही. जात, पंथ, भाषेचा विचार न करता शहराच्या विकासावर भर दिला, असे नितीन गडकरी म्हणाले. मतदारसंघात ३५० कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा सुधाकर देशमुख यांनी केला. यावेळी जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक भूषण शिंगणे, प्रगती पाटील, रमेश चोपडे, दिंगबर ठाकरे, मोरुभाऊ बरडे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या