फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘वादळ’ येणार असल्याचे भाकीत ठरले खरे:आमदारकी,मंत्रीपदातून बावणकुळे बाद

‘वादळ’ येणार असल्याचे भाकीत ठरले खरे:आमदारकी,मंत्रीपदातून बावणकुळे बाद

Advertisements

टेकचंद सावरकर ठरले कामठीतून भारतीय जनता पक्ष्ाचे अधिकृत उमेदवार

नागपूर: विदभर्च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष् लागलेल्या कामठी मतदार संघातून शेवटी निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना उमेदवारीच मिळाली नाही,दिवसभराच्या अत्यंत नाट््यमय घडोमाडींनंतर शेवटच्या क्ष् णी जिल्हा परिषद अध्यक्ष्ा निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर हे कामठीतून भाजपचे अधिकृत उमेदवार ठरलेत.

गुरुवारीच बावकुळे यांच्या समर्थंकांतर्फे संपूर्ण कामठी शहरात ‘वादळ येणार वादळ’ असे फलक लावण्यात आले होते,तसेच सोशल मिडीयावर बावणकुळे हे शुक्रवारी सकाळी १० वा.उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या मात्र शेवटच्या क्ष् णापर्यंत कामठीतून भाजपचा अधिकृत उमेदवार कोण?हा सस्पेंस कायम राहीला व तीन वाजायला काही क्ष् ण उरले असताना टेकचंद सावरकर यांनी आपली उमदेवारी पक्ष्ातर्फे दाखल केली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य अनिल निदान यांनी देखील उमेदवारी दाखल केली. टेकचंद सावरकर यांच्या अर्जामध्ये तांत्रिक अडचण आल्यास अनिल निदान यांचा अर्ज स्वीकारला जाणार होता. पक्ष् श्रेष्ठींतर्फे या दोघांनाही एबी फॉर्म देऊन तातडीने रवाना करण्यात आले होते.

आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री यांच्यासह नागपूरातील इतर पाचही भाजप उमेदवारांनी दुपारी १२ वा. तहसील कार्यालयात जाऊन मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरले. यावेळी चंद्रशेखर बावणकुळे हे देखील त्यांच्यासोबत रॅलीत होते. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पक्ष् श्रेष्ठींची कामठीच्या प्रश्‍नावर बैठक सुरुच होती. मध्यंतरी भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांचेही नाव चर्चेत आले. त्यांना कामठीतून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी कामठीतून लढण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. कामठीतून प्रवीण दटके तर काटोलमधून बावणकुळे निवडणूक लढणार असल्याची चर्चा गुरुवारी रात्री सर्व दूर व्हायरल झाली मात्र यात तथ्य नव्हते. यंदाच्या निवडणूकीत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना तिकीटच दिल्या जाणार नाही असा विचारही नागपूर किवा विदर्भ नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेने देखील केला नसावा असे म्हटले जात आहे.

मात्र भाजपतर्फे प्रसिद्ध झालेल्या पहील्याच यादीत एवढ्या कद्दावर मंत्र्यांचे नाव नसणे तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दूसरी यादी प्रसिद्ध झाली तेव्हा बावणकुळे यांना यंदा तिकीट मिळणार की नाही ही अनिश्‍चितता दाट झाली. तिसरी यादीतही बावणकुळे यांचे नाव नव्हते,तेव्हा त्यांच्या समर्थकांचाही संयम सुटला. शुक्रवारी बावणकुळे हेच कामठीतून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा मॅसेज त्यांनी सर्वदूर व्हायरल केला. भाजपने शुक्रवारी उशिरा प्रसिद्ध केलेल्या चौथ्या यादीत कामठीतून टेकचंद सावरकर हे अधिकृत उमेदवार असल्यावर शिक्कामोर्तब झाले,व वादळ तर नक्कीच आले मात्र ते उर्जामंत्री यांच्या मंत्रीपदावरच नव्हे तर आमदारकीवरच आल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली.

‘सर्व्हे’चा फटका बसल्याची शक्यता-
भाजपच्या पहील्याच यादीत एवढ्या कद्दावर मंत्र्यांचेच नाव नसणे याचे सुरवातीला फक्त आश्‍चर्य व्यक्त केल्या जात होते. मात्र भाजपची दुसरी व तिसरी यादी ही प्रसिद्ध झाली त्यातही बावणकुळे यांचे नाव नसणे याचा अर्थ स्पष्ट झाला होता. निवडणूकीपूर्वी ग्रास रुटवर भाजपच्या प्रत्येक उमेदवारांच्या कामगिरीचा सर्व्हे करुन तो अहवाल पंतप्रधान मोदींपर्यंत गेला असल्याची माहिती सूत्राने दिली. उर्जामंत्री व पालकमंत्री असणारे बावणकुळे यांचा देखील सर्व्हेचा अहवाल मोदींपर्यंत गेला असून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याविषयी त्यांच्या नावासमोर दिल्लीतूनच ‘फूली’ मारण्यात आली. मोंदीच्या निर्णयासमोर केंद्रिय मंत्री व मुख्यमंत्री यांचा देखील नाईलाज झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीच बावणकुळे हे कामठीतून उमेदवार राहणार नाहीत हे चित्र स्पष्ट झाले होते मात्र पक्ष्ातर्फे त्यांना उमेदवारीच दिली जाणार नाही,यावर कोणाचाही विश्‍वास बसला नव्हता. शेवटी उमेदवारी अर्ज भरण्याची अधिकृत वेळ संपली आणि बावकुळे यांचे फक्त मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीच गेली आहे यावर शिक्कामोर्तब झाले.सर्व्हे मध्ये जिल्हाध्यक्ष् व संघटन मंत्री यांची भूमिका महत्वाची ठरली असल्याचे देखील म्हटल्या जात आहे. भाजपने महाराष्ट्रात ‘सिटींग-गेटींग’हा फॉर्मूला सर्वदूर अमलात आणला असताना आपल्याच सरकारमधील एका मंत्र्यांचेच तिकीट का कापले? याविषयी आता वेगवेगळ्या अफवाहांना चांगलेच पेव फूटले आहे.

ज्योति बावणकुळे यांनी भरला उमेदवारी अर्ज!
अतिशय नाट््यमय घडामोडीत कामठीतून बावकुळे यांच्या पत्नी ज्योती बावकुळे यांनी कामठीतून भाजपाच्या फाॅर्मवर उमेदवारी अर्ज भरला मात्र त्यासोबत पक्ष्ाचा एबी फॉर्म नसल्यामुळे तो आता अपक्ष् म्हणून स्वीकारल्या जाणार. सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून आता सर्वांचे लक्ष् हे ज्योती बावणकुळे यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावर टिकून आहे. दुपारी बावणकुळे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत पुढील वाटचालीसाठी चर्चा केली. पुढे ते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष् लागले आहेत. ज्योती बावणकुळे यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्याचा फटका भाजपचे अधिकृत उमेदवार टेकचंद सावरकर यांना बसू शकतो.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या