

२१ सा व्या शतकात जाती-पातीच्या राजकारणावर तरुणाई नाराज
नागपूर: भारजीय जनता पक्ष्ातर्फे मंगळवारी १२५ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.यात मुख्यमंत्री यांचे होम टाऊन असणारे नागपूर शहरातील सहा ही विधान सभांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मध्य नागपूरातून अनेक वेळा पक्ष् विरोधी भूमिका घेणारे आमदार विकास कुंभारे यांना फक्त हलबांची मते नजरेसमोर ठेऊन पुन्हा उमेदवारी देण्यात आली,मध्य नागपूरातून शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांना यावेळी आमदार होण्याची संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा मतदारांमध्ये होती मात्र दटके यांचे कर्तृत्व ‘जात’नावाच्या प्रभावी फॅक्टर पुढे गौण ठरले आणि पक्ष्ाने पुन्हा कुंभारे यांनाच उमेदवारी देताच दटके समर्थक यांनी पक्षाच्या या निर्णया विरोधात बुधवारी महाल,बडकस चौकात तीव्र आंदोलन पुकारले.
भाजपाने जातीचे राजकारण करुन दटके यांच्यासारखा निष्ठावान व पक्ष्ाप्रति समर्पित कार्यकर्त्याला डावलले असल्याची तीव्र भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. पक्ष्ाने दोन दिवसात पुन्हा सारासार विवेकबुद्धीने विचार करुन दटके यांना मध्य नागपूरातून उमेदवारी द्यावी, निवडून येण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवावी,अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भाजपचे कार्यकर्ते म्हणून पक्ष्ासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे सांगतील ती कामे करु मात्र त्यांनी दटके यांच्यासारख्या निष्ठावान व कर्तृत्ववान कार्यकर्त्याचा योग्य सन्मान करावा,अशी पोटतिडकीची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
उमेदवार भाजप सारख्या पक्ष्ाने जाती-पातीवर ठरवू नये. प्रत्येक जातीचा उमेदवार हा पक्ष्ासाठी काम करतो. त्यामुळे भाजपने जातीचे राजकारण न करता, काम बघावे, निष्ठा बघावी, समर्पण बघावे,योग्यता व पात्रता बघावी, आमदार हा फक्त एखाद्या विशिष्ट जातीचा नसतो तर तो संपूर्ण मतदार संघाचा असतो. विकास हा एका प्रभागात होत नसतो तर संपूर्ण मतदार संघाचा विकास होत असतो. त्यामुळे आजच्या २१ व्या शतकात तरी भाजपसारख्या पक्ष्ाने ‘पार्टी विथ डिफरेन्स’हे बिरुद मिरवताना, १९ सा व्या शतकातील निवडणूकींचे निकष निष्ठावान उमेदवारांवर लादू नये,अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली.
आंदोलनात राजेश गांधी,कमलेश नायक,राहूल आसरे, आनंद शाह, सचिन बढिये, सुनील गाढवे,जीवन हलमारे, केशव भिवापूरकर,संजय जैन, नितीन बढिये, श्रीकांत गाढवे,शिवाजी सिरसाट,जयदीप नाकोडे,नीलेश बिंड,दिलीप घनरे, राजेंद्र पुरी, नरेंद्र मोहिते,जगन्नाथ सपेलकर, शशांक वानखेडे,अजय सालवनकर, सचिन तारे, रमाकांत बगले,सोनू चव्हान,रुपेश डोणगावकर,अण्णा अयाचित, वामन शिंदे, दुर्गेश पेटकर, सुधीर हेमणे,मनीष वानखेडे, राजेश कन्हेरे, सचिन नाईक,धीरज चव्हाण, सचिन सावरकर, तोमेश्वर पराते, शैलश शुक्ल, दीपांशु लिंगायत, राजेश नंदेश्वर तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
भाजप जातीचे राजकारण करीत नाही-गिरीश व्यास
माणूस जन्माला येतो तेव्हा जात ही त्याला चिकटतेच. मात्र भाजप जातीपातीचे राजकारण करीत नाही तर जाती बाहेर ‘सबका साथ,सबका विकास’हे नव्या भारताचे धोरण घेऊन चालणारा पक्ष् आहे. निवडणूकीत कोणाला तरी तिकीट मिळणार तर कोणाच्या तरी पदरी निराशा ही येणारच. भाजपचे कार्यकर्ते हे भावनाशील आहेत तसेच समंजस देखील आहेत. ते पुन्हा पक्ष्ाच्या कामाला लागतील याची मला खात्री आहे.




आमचे चॅनल subscribe करा
