

स्थानिक एकवीस उमेदवारांना डावलून परिणय फूकेंना उमेदवारी घोषित
डॉ. ममता खांडेकर
नागपूर: भारतीय जनता पक्ष्ाच्या धंतोली येथील प्रादेशिक कार्यालयात बुधवार दि.२ ऑक्टोबर रोजी साकोली येथील शेकडो कायकर्ते व पदाधिकार्यांनी जोरदार नारेबाजी व प्रदर्शन केले. डॉ.परिणय फूके यांची बुधवारी भारतीय जनता पक्ष्ाने साकोली मतदार संघातून उमेदवारी घोषित केल्याने, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष पसरला. विशेष म्हणजे स्थानिक २१ इच्छूकांनी मुलाखत दिली असताना तसेच विद्यमान आमदार राजेश उर्फ बाळाभाऊ काशिवार यांच्या नावाचा विचार न होता,सर्व्हेच्या नावाखाली अचानक साकोली मतदार संघाचा उमेदवार बदलण्यात आला.
पक्ष्ाच्या या निर्णया विरोधात साकोलीत स्थानिक पदाधिकार्यांमध्ये तीव्र रोष पसरला. हजारो कार्यकर्ते हे धंताेलीतील प्रादेशिक कार्यालयात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी प्रांत संघटक उपेंद्र कोठेकर यांची भेट घेतली. यावेळी साकोलीचे आमदार बाळाभाऊ काशिवार हे देखील उपस्थित होते. मात्र कोठेकर यांनी त्यांना ‘नो चेंज’ म्हूणन कळवले. पक्ष्ाने साकोली मतदार संघाचा उमेदवार ठरवला आहे,आता कोणताही बदल होणार नसल्याचे ते म्हणाले.

आमदार काशिवार हे रात्री साढे नऊ वाजता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून शेवटचा निर्णय घेणार आहेत. प्रसंगी पक्ष्ाच्या विराेधात जाऊन अपक्ष् म्हणून लढण्याचे मनोगत त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. साकोलीचा हा आजपर्यंचा इतिहास आहे,बाहेरचा लादलेला उमेदवार हा कधीही साकोलीमधून जिंकू शकला नाही,यावेळी देखील परिणय फूके यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव करु,अशी घोषणा कार्यकर्ते देत होते.

परिणय फूके हे विधान परिषदेचे आमदार असून अद्याप तीन वर्षांची त्यांची कारर्कीद बाकी असताना केवळ मुख्यमंत्री यांचे जवळचे मित्र म्हणून त्यांना विधान सभेचे तिकीट देण्यात आले असल्याचा संताप यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. विद्यमान आमदार बाळाभाऊ काशिवार यांचे काम अतिशय चांगले असताना त्यांची तिकीट कापण्यात आली,हा पक्ष् आता ‘पार्टी विथ डिफरेंस’ म्हणून राहीलेला नाही,असे कार्यकर्त्यांचे म्हणने होते. घाशीवर यांनी नाना पटोले यांचा बालेकिल्ला असणारा ‘लाखांदूर’ या मतदारसंघाला खिंडार पाडले. त्या गावाची सगळी कुणबी मते घाशीवार यांनी भाजपमागे उभी केली. गेल्या विधान सभेत काँग्रसेचे उमेदवार सेवक वाघाये यांचा २५ हजार मतांनी पराभव केला. एवढेच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत एकट्या साकोलीत संजय मेंढे यांना ३३ हजारांची लीड मिळवून दिली,तरी देखील पक्ष्ाने विद्यमान आमदारांना कायम न ठेवता,बाहेरचा उमेदवार लादला,या विषयीचा तीव्र संताप पदाधिकारी यांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केला.
साकोलीकरांची संपूर्ण ताकद ही बाळाभाऊ काशिवार यांच्या मागे उभी असल्याचे ते म्हणाले. या क्ष्ेत्राचा इतिहास आहे बाहेरचा उमेदवार हा कधीही निवडणूक जिंकला नाही. उमेदवारी द्यायचीच होती तर ज्या २१ इच्छूकांनी मुलाखती दिल्या त्यांच्या पैकी एकाला उमेदवारी पक्ष्ाने द्यायला हवी होती मात्र पक्ष्ाने स्थानिक कार्यकर्ते यांच्या भावनेचा विचार न करता ‘बाहेरचा उमेदवार लादला’. असा रोष त्यांनी व्यक्त केला.
सर्व्हे हा संघाचाच्-
उपेंद्र कोठेकर यांनी विद्यमान आमदार बाळाभाऊ काशिवार यांची तिकीट कापण्या मागे ‘सर्व्हे’चे कारण सांगितले सर्व्हेमध्ये अहवाल बरोबर नाही असे कारण सांगण्यात आले. आमदारांचा हा सर्व्हे पक्ष्ातर्फे करण्यात आला नसून राष्ट्रीय सेवक संघातर्फे करण्यात येत असल्याचा आरोप देखील या वेळी आंदोलनात उपस्थित पदाधिकारी यांनी केला. यावेळी हजारो कार्यकर्त्यानी ‘बाळाभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है’चा नारा देऊन आसमंत दणादूण सोडला.




आमचे चॅनल subscribe करा
