फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजगोपाल अग्रवाल शरिराने काँग्रेससोबत मनाने भाजपसोबत होते: फडणवीस

गोपाल अग्रवाल शरिराने काँग्रेससोबत मनाने भाजपसोबत होते: फडणवीस

Advertisements

काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांचा भाजप पक्ष् प्रवेश:गोंदिया झाला भाजपचा!

नागपूर,३० सप्टेंबर २०१९: पाच वर्षांपूर्वी ज्या वेळी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष्ाचे सरकार आले त्यावेळी सुरवातीच्या काळात शिवसेनेला सोबत घेताना काही अडचणी येत होत्या, त्यावेळी गोंदियामधून निवडून आलेले काँग्रेसचे गोपालजी अग्रवाल हे स्वत: माझ्याकडे आले,पहील्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे पद हे विदर्भाच्या माणसाला मिळत आहे,तुम्हाला गरज पडली तर मला सांगा,मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून निवडणूक लढेल असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांना मी सांगितले,नवे सरकार आहे,थोडी अस्थिरता नक्कीच आहे मात्र तुम्ही आहात तिथेच रहा, पाच वर्षांनंतर तुम्ही भाजपकडूनच निवडणूक लढणार आहात, गेली पाच वर्ष गोपालजी अग्रवाल शरिराने काँग्रेससोबत असले तरी मनाने ते भाजपसोबत होते,असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

गोंदियाचे काँग्रेसचे हॅवीव्हेट आमदार गोपालजी अग्रवाल यांनी सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी नागपूरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे हजारो कार्यकत्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला.याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष्ा मडावी यांनी देखील पक्ष् प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले,की गोपालजी अग्रवाल हे ज्या पक्ष्ात असतात तो पक्ष् वाढवण्यासाठी इमाने इतबारे काम करतात. वैयक्तिक काम घेऊन ते कधीही मंत्रालयात आले नाहीत. सगळे जनतेचेच प्रश्‍न घेऊन मंत्रालयात आलेत.कामाच्या बाबतीत प्रचंड पाठपुरावा ते करतात.मंत्रालय आणि मंत्री यांनाही त्यांच्या कामाचा दरारा माहिती आहे. आम्ही जेव्हा विरोधी पक्ष्ात होतो तेव्हा २००९ ते २०१४ पर्यंत विधी मंडळात विदर्भाच्या प्रश्‍नावर एकीकडून आम्ही तर दूसरीकडून गोपलाजी अग्रवाल हे त्यांच्याच सरकारवर तूटून पडत होते.लाेकांचा आमदार कसा असावा हे त्यांच्याकडे बघून लोकप्रतिनिधींनी शिकण्यासारखं आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासाठी नेहमी एक म्हण म्हणतात ‘बावणकुळे जर एखादा अध्यादेश काढतात तेव्हा त्यात बाईचा माणूस आणि माणसाचा बाई करण्याची किमया असते,गोपालजी अग्रवाल हे देखील मंत्रालयात जाऊन काय अध्यादेश काढून आणतील याचा भरवशा नाही’.अश्‍या शब्दात मुख्यमंत्री यांनी अग्रवाल यांची प्रशंसा केली.जनतेत राहणारा,जनतेसाठी काम करणारा नेता आज भाजपमध्ये येत आहे याचा आम्हालाच अत्यधिक आनंद आहे,असे ते म्हणाले.
यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर काेहळे,गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फूके,महापौर नंदा जिचकार,माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्टाचार बाहेर काढणारे गोपालजीच-
पब्लिक अकाऊंटंट कमिटीच्या अध्यक्ष् पदासाठी आम्ही गोपालजी यांचीच निवड केली. महाराष्ट्राच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड आहे या समितीच्या सर्वाधिक बैठका या गोपालजींनी घेतल्या. सर्वात जास्त अहवाल या समितीने दिले यात काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेले भ्रष्टाचार आणि घोटाळे याच समितीने उघडकीस आणले.एवढेच नव्हे तर हे सर्व अहवाल त्यांनी जोरकसपणे विधी मंडळात ही मांडले.

जुना आणि नवा परिवार गोंदियात एकत्र काम करेल-
आज गोपालजी यांच्यासोबत ज्या हजारो कार्यकर्त्यांनी पक्ष् प्रवेश केला आहे त्या सर्वांना भाजप सन्मानाने सामावून घेईल.नव्याने जेव्हा नव्या पक्ष्ात जातो तेव्हा सुरवातीला संघर्ष हा होतोच मात्र मी गोपालजी यांना शब्द देतो,त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपच्या मोठ्या परिवारात सामावून घेतले जाईल,याची त्यांनी काळजी करु नये.कार्यकर्त्यांनी देखील जुन्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन नव्या विचारांसोबत कामाला लागावे. गोंदियाची जागा आम्ही कधीही जिंकू शकलो नाही मात्र आता आम्हाला पूर्ण विश्‍वास आहे ती जागा भाजपची झाली.

न भूतो…असा विजय महाराष्ट्रात मिळवणार-
युतीची घोषणा मुंबईत झाली आहे. न भूतो…असा विजय निश्‍चितच युतीला मोदींच्या नेर्तृत्वात महाराष्ट्रात मिळणार आहे. महायूतीचंच सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. विदर्भात जी कामे राहून गेली आहेत तो बॅकलॉक भरुन काढण्यासाठी डबल इंजिन लावू, विदर्भात जी विकासाची कामे राहून गेली आहेत ती पुढील एका वर्षात पूर्ण करु,अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली.

राजनीतीसे हटकर विकास के लिये चलना चाहीये भाजपा के साथ-गोपालजी अग्रवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेर्तृत्वात महाराष्ट्र खूप उंचीवर गेला आहे. अश्‍या नेर्तृत्वासोबत काम करण्याचे समाधान फार वेगळे आहे. पक्ष्ीय राजकारणापासून दूर जाऊन विकासासाठी भाजपसोबत चालणे आजच्या काळाची गरज आहे. मुख्यमंत्री यांनी गोंदियाच्या प्रत्येक विकास कामाला पक्ष्ीय अभिनिवेश बाजूला सारुन मंजूरी दिली.राज्याचा प्रमुख हा ज्या आमदारासोबत असतो त्याच्या साथ संपूर्ण सरकारही देते. मी विकासासाठी भाजपमध्ये आलो आहे.भविष्यात पूर्ण विश्‍वासाने मी पक्ष्ाचे काम करेल मात्र माझ्यावर विश्‍वास ठेऊन ज्या हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला त्यांची देखील जबाबदारी आता भाजपवर आहे. फडणवीस हे जे म्हणतात,तेच करतात.आम्ही सगळे संपूर्ण ताकदीने यानंतर देवेंद्र यांच्या मागे उभे आहोत. या पुढे भाजपसाठी तन-मन-धनाची संपूर्ण ताकद आम्ही लावू.मुख्यमंत्री यांनी गोंदियासाठी अनेक विकास कामे मंजूर केलीत,मेडीकल कॉलेजही ते देणार आहेत. नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान या देशाला लाभले ज्यांनी संपूर्ण जगात देशाचे नाव मोठे केले. महाराष्ट्रालाही देवेंद्र सारखे नेर्तृत्व पुन्हा मिळेल याची खात्री आहे.

राष्ट्रवादीचे पूर्व अध्यक्ष् आशिष नाईक यांनी देखील मनपा सत्ता पक्ष् नेते संदीप जोशी यांच्या नेर्तृत्वात यावेळी भाजप प्रवेश केला. गाेंदियाचे अशोक लांजे, दिलीप असोटी आदी अनेक नेते यावेळी भाजपवासी झालेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या