फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरात्रीची परवानगी नसताना मेट्रो सुरु!

रात्रीची परवानगी नसताना मेट्रो सुरु!

Advertisements

पैशांसाठी मेट्रो प्रवाश्‍यांच्या जीवाशी करतेय खेळ: प्रशांत पवार यांचा आरोप

नागपूर: रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) महामेट्रोला प्रमाणपत्र जारी करताना अनेक अटी ठेवल्या होत्या त्यात प्रमुख अट होती सायंकाळनंतर मेट्रो धावणार नाही मात्र महामेट्रोने या अटीचे सर्रास उल्लंघन करुन रात्रीच्या अंधारात देखील मेट्रो ही धावती ठेवली आहे. फक्त दिवसाच्या उजेडात मेट्रो चालण्याची परवानगी असताना सायंकाळी ८ वाजताच्या अंधारात देखील सीताबर्डी ते खापरी मेट्रो धावतेय, मेट्रोला प्रवाश्‍यांच्या जीवाची कोणतीही काळजी नसल्याचा आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्र-परिषदेत केला.

सीएमआरएसने घातलेल्या अनेक अटींपैकी आणखी एक अट म्हणजे स्वयंचलित यंत्रणेद्वारे मेट्रोचे संचालन होणे गरजेचे आहे ज्यामुळे आपातकाळात दूर्घटना होणार नाही. दोन मेट्राे एक साथ एकाच रुळावर आल्यास काही फूट अंतरावर दुसरी मेट्राे ही आपोआप थांबेल,मात्र अशी कोणतीही स्वयंचलित यंत्रणा मेट्रोने अद्याप बसवली नसल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला. मेट्रो ही ’सेवा’ नसून ’प्रवाश्‍यांच्या मृत्यूचे दारच’ असल्याचे ते म्हणाले. फक्त पैशांसाठी मेट्रो नागपूरकर प्रवाश्‍यांच्या जिविताशी खेळ करतेय. अवैध पद्धतीने,नियमांची पायमल्ली करुन मेट्रो सर्रास चालतेय, देशातील सर्व वाहतूक यंत्रणेला प्रवाश्‍यांच्या सुरक्षिततेचे नियम हे पाळावे लागतात,मग महामेट्रो याला अपवाद कशी?असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

भ्रष्टाचाराचा पैसा प्रवाश्‍यांच्या जिवितेशी खेळून महामेट्रो काढत असल्याचे ते म्हणाले.सीएमआरएसने दिव्यांगांसाठी प्रत्येक मेट्रो स्टेशनवर रॅम्पची सुविधा देण्याची अट देखील ठेवली असताना या देखील नियमाचे मेट्रोने पालन केले नाही. मेट्रोच्या सध्या स्थितीत सुरु असलेल्या ११ ही स्टेशनवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्थाच नसल्याचे ते म्हणाले. दिव्यांगांसाठी मेट्रोची सुविधा नाही हे मग मेट्रोने उघडपणे जाहीर करावे नाही तर त्यांच्यासाठी तातडीने प्रत्येक स्टेशनवर रॅम्पची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली.

ज्या मार्गावर डबल डेकर मेट्रो चालणार आहे त्या मार्गाची डिझाईन आयआयटी कडून प्रमाणित करुन घेणे अशी देखील सीएमआरने अट टाकली असता अद्याप डबल डेकरची डिझाईन आयआयटी कडून तपासून किंवा प्रमाणित न करुन घेता त्या मार्गांवर डबल डेकर वर मेट्रो चालवित आहे हा महामेट्रोचा उद्दामपणा असून यामुळे प्रवाश्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्ष्ति यांची राहील,असे ते म्हणाले.

याशिवाय याच वर्षी जून महिन्याच्या २२ तारखेला एका मेट्रोमध्ये किती प्रवाश्‍यांचे वजन पेलण्याची क्ष् मता आहे,मेट्रोचा ट्रॅक किती क्ष् मता वहन करु शकतो याचा देखील सविस्तर अहवाल देण्याची अट सीएमआरएसने ठेवली असता मेट्रोने अद्याप वजनांची अशी कोणतीही तपासणी केल्या नसल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत केला. कोणतीही लोड डिफ्लेक्शन चाचणी न करता प्रवाशी वहन करणे हा अक्ष् म्य गुन्हा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंचलित यंत्रणेच्या अभावी महामेट्रोने नियम ८७ अंतर्गत १६ एप्रिल २०१८,५ मार्च २०१९,२२ जून २०१९ तसेच १९ सप्टेंबर २०१९ रोजी मेट्रो चालविण्याची परवानगी सीएमआरएसला मागितली.

सीएमआरएसने प्रमाणपत्र देताना वरील सर्व अटींचे पालन करण्याची अट प्रमाणपत्रात ठेवली असताना महामेट्रो ही रात्रीच्या अंधारात, कोणत्याही स्वयंचलित यंत्रणेच्या सुरक्षेच्या अभावी, वजनाचे मापन न करता,दिव्यांगांना कोणतीही सुविधा न देता तसेच डबल डेकर ट्रॅकची डिझाईन आयआयटीकडून प्रमाणित न करता सुरु आहे.

या सर्व अटी सीएमआरएसने प्रवाश्‍यांच्या सुरक्ष्ेसाठी नेमून दिले असताना महामेट्रो या सर्व अटी झूगारुन मेट्रो ही केवळ पैसा कमवण्यासाठी चालवित असल्याचा आरोप यावेळी प्रशांत प्रवार यांनी केला. पत्र परिषदेला अरुन वनकर,मिलिंद महादेवकर, रविंद्र ईटकेलवार, उत्तम सुळके, हरिशकुमार नायडू व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

मेट्रोचे रात्रीचे तिकीट!
एका प्रवाश्‍यांनी सायंकाळी ६.३० वा.चे तिकीट घेऊन खापरी पर्यंत प्रवास केला तर रात्री ७.३० वा.खापरीपासून निघालेली मेट्रो ही रात्री ८ वाजून ८ मिनिटांवर सीताबर्डी येथे पोहोचली.सीएमआरएसने प्रमाणपत्र देताना त्यात मेट्रो ही फक्त दिवसाच्या उजेडातच धावेल अशी अट टाकली आहे हे विशेष!

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या