फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआमदार सुनील केदार यांच्यावर सिल्लेवाडा प्रकरणात गुन्हा दाखल: भाजपचे तंबाखेही निलंबित

आमदार सुनील केदार यांच्यावर सिल्लेवाडा प्रकरणात गुन्हा दाखल: भाजपचे तंबाखेही निलंबित

Advertisements

खापरखेडा: सिल्लेवाडा स्टार बससेवा उद् घाटन सोहळ्याचा वाद आता अधिकच चिघळला असून शनिवारी निषेध सभेत ग्रांमपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्ष्ेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार प्रमिला बागडे यांनी केली असून याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,डॉ.राजीव पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आमदार सुनील केदार यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिल्लेवाडा येथील स्टार बसचा उद् घाटनाचा वाद चिघळल्यावर या उपक्रमाचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष् व काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. महिला सरपंच बागडे या कायद्यानुसार दिलेल्या अधिकारामुळे २०१७ साली थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या.गुरुवारी आमदार केदार हे बससेवेचे अधिकृत उद् घाटन करणार होते मात्र तंबाखे यांनी भाजपला श्रेय देण्यासाठी जिल्हाध्यक्ष् डॉ. पोतदार यांच्या हस्ते आधीच उद् घाटन उरकून घेतले. या कार्यक्रमात सरंपचांना बालाविले नसल्याचा तसेच कार्यक्रम पत्रिकेत सरपंच यांचे नाव देखील टाकण्यात आले नसल्याचा अारोप बागडे यांनी केला. यावरुन दोन्ही पक्ष्ात ‘स्टार बस हिरवी झेंडी श्रेयाचा’ वाद वाढतच गेला. याच कार्यक्रमात आमदार केदार यांच्या भाषणाचा व्हिडीयो व्हायरल झाला. ‘ज्या घरावर भाजपाचा झेंड दिसेल त्यांना घरात घूसून मारु’असे वादग्रस्त विधान करतानाचा तो व्हिीडीयो चांगलाच व्हायरल झाला. याविरोधात शनिवारी भाजपने ‘झेंडे लावा’ हे आंदोलन हाती घेतले. मात्र या सभेत तंबाखे यांच्या अश्‍लील भाषणाची क्लिपही व्हायरल झाली परिणामी ग्रामपंचायत सदस्य तंबाखे यांनी भाजपमधून निलंबित करण्यात आले.

सिल्लेवाड्याच्या महिला सरपंचाबद्दल आक्ष्ेपार्ह वक्तव्य ग्रामपंचायत सदस्य तंबाखे यांना चांगलेच भोवले. एखाद्या महिला सरपंचाबद्दल अश्‍याप्रकारचे मानहानी,बदनामीकारक, निंदानालस्ती व अपमान करणारे कोणतेही वक्तव्य भाजप कधीच सहर करीत नाही त्यामुळे तंबाखे यांना पक्ष्ातून निलंबित करण्यात येत आहे. यासंदर्भात पूर्ण सत्यता जाणून घेऊन पक्ष्ातर्फे पुढील कारवाई करण्यात येईल.या संदर्भात पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी,असे भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष् डॉ.राजीव पोतदार यांनी कळविले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या