फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज  रेल्वे स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलणार: महा मेट्रोतर्फे लवकरच पुनर्वसनला सुरुवात

  रेल्वे स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलणार: महा मेट्रोतर्फे लवकरच पुनर्वसनला सुरुवात

Advertisements

नागपूर १३ : शहराचा चेहरा मोहरा बदलविणाऱ्या महा मेट्रोच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या कार्याला लवकरच सुरुवात होणार असून विधमान रस्त्याच्या विस्तारीकरण करण्याकरिता लवकरच दुकानदारांचे पुनर्वसनाच्या प्रक्रीयेला सुरुवात करण्यात येणार आहे. सदर पुनर्वसनाची प्रक्रिया दिवाळी नंतर एका आठवड्यात पूर्ण केल्या जाईल. सदर दुकानदारांचे पुनर्वसन हे राज्य परिवहन महामंडळच्या जमिनीवर केल्या जाईल व या करीता सदर जमिनीचे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे.

नागपूर शहराकरिता महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या सुटेल तसेच सध्याच्या परिस्थितीत रस्त्यावर होणार गर्दी संपुष्टात येईल. सध्यास्थितीत जय स्तंभ चौक ते मानस चौक पर्यतचा सुमारे १ किमीचा अरुंद रस्ता हा पायी चालणारे,दुचाकी व चार चाकी तसेच सायकल,आटो रिक्षा ने व्यापलेला असतो व यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे आढळून येते.

या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये- 
जय स्तंभ चौक ते मानस चौक पर्यतचा हा संपूर्ण रस्ता ६ पदरी असणार असून या मार्गावरील रहदारी सुरुळीत पणे पार पडेल. या सहा पदरी मार्गा व्यतिरिक्त किंग्स्वे हॉस्पिटल ते रामझुला पर्यत उड्डानपुलाचे निर्माण कार्य प्रस्तवित आहे. ज्यामुळे आरबीआय चौक व एलआयसी चौक येथील प्रवाश्यांना सेन्ट्रल एव्हेन्यू मार्गावर प्रवास करने सुरुळीत होईल. या शिवाय मानस चौक ते कॉटन मार्केट चौक पर्यत भुयारी मार्गाचे निर्माण कार्य देखील प्रस्तावित आहे. सदर भुयारी मार्ग हा पश्चिम ते पूर्व नागपूरला जोडेल तसेच लोखंडी पुलावरील वाहतूक कोंडी देखील कमी करेल..या प्रकल्पाची मुख्य बाब म्हणजे नागपूर रेल्वे स्टेशन समोरील विद्यमान उड्डानपूलाखाली दहा वर्षापासून व्यवसाय करत असलेल्या दुकान दारांचे पुनर्वसन या प्रस्तावित इमारतीमध्ये केल्या जाईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या