फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणअटलबिहारी वाजपेयी स्मारकासाठी कोणताही भूखंड हडप केलेला नाही - विनोद तावडे

अटलबिहारी वाजपेयी स्मारकासाठी कोणताही भूखंड हडप केलेला नाही – विनोद तावडे

Advertisements

प्रस्तावांची छाननी करण्यासाठी उपसमिती गठित

मुंबई दि. 13: माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या धर्तीवर मुंबईत उभारण्यात येईल असे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केले होते. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी कोणताही भूखंड हडप करण्यात आलेला नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

वाजपेयी यांचे स्मारक तयार करण्याबाबत दीनदयाळ उपाध्याय समितीने अर्ज केला होता. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी जे अर्ज करतील, त्या सर्व अर्जांची छाननी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत केली जाणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या अहवालानंतरच कोणत्या ठिकाणी स्मारक करावयाचे याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक करण्यासाठी राज्य शासनासमोर सध्या तरी स्मारकासाठी 4 जागा डोळ्यासमोर आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर जवळील जागा, बालभवन येथील एक जागा आणि उपनगरातील दोन जागा डोळ्यासमोर आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी भूखंड हडप केल्याची बातमी वस्तुस्तिथीदर्शक नाही.माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवू नयेत असे आवाहन  तावडे यांनी केले.

०००००

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या