फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगेल्या पाच वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी शासनाचे सर्वाधिक अनुदान:चंद्रशेखर बावणकुळे

गेल्या पाच वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी शासनाचे सर्वाधिक अनुदान:चंद्रशेखर बावणकुळे

Advertisements

७७६८७.९४ कोटींच्या योजना मंजूर
नागपूर: पाच वर्षांपूर्वी २०१४-१५ साठी नागपूर जिल्ह्यासाठी फक्त २२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते,यंदा विविध योजनांसाठी ७७६ कोटींपर्यंत ही रक्कम वाढविण्यात आली असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नागपूरचा पालकमंत्री म्हणून मी विशेष आभार मानतो. जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महापालिका,महापौर यांनी नागपूरचे महत्व उपराजधानी म्हणून शासनाला पटवून दिले,परिणामी पाच वर्ष सरकारकडे पाठपुरावा करुन या जिल्ह्याच्या नियोजनाकरिता शासनाने विशेष रक्कम दिली असल्याची माहिती राज्याचे उर्जा मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी देशपांडे सभागृहात आयोजित पत्र परिषदेत दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद् गल, महापौर नंदा जिचकार, आ.सुधाकर देशमुख,आ. डॉ.मिलिंद माने आदी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची सभा बुधवारी देशपांडे सभागृहात पार पडली. बैठकीनंतर पत्र परिषदेत संबोधित करताना बावणकुळे यांनी विविध प्रकल्पांसाठी शासनातर्फे नियोजित झालेल्या राशिविषयी माहिती प्रदान केली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेले कामांचे निविदा अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व कामांचे कार्यादेश देऊन कामे सुरु करण्यात येईल.नागपूर जिल्ह्याची मागील पाच वर्षांपासूनची खर्चाची टक्केवारी अत्यंत चांगली असून याही वर्षी हाच क्रम ठेऊन १०० टक्के निधी खर्च केला जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.९० टक्के योजनांचे आदेश निघाले असून उर्वरित १० टक्के देखील लवकर मंजूर करण्यात येईल.जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्ष् ण पूर्ण केले असून तातडीने प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याचे ते म्हणाले.आरोग्य विभागाचा देखील प्रस्ताव देखील पाठविण्यात आला असून यात अनेक रुग्णालयाच्या श्रेणी वर्धतेचा प्रस्ताव आहे. २४८ कोटी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांनी मंजूर केले आहे.
महापालिकेने हुडकेश्‍वर-नरसाळासाठी जो प्रकल्प हाती घेतला त्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला.मौदा,वीमा,मालेगांव या ग्रामीण भाग जो डब्ल्यूसीएल अंतर्गत येतो, माईन्समुळे ज्यांच्या घराला तडे गेले,त्यांच्या पुर्नवसनासाठी १२२ कोटी महाजेनकाे तर ८४ कोटी डब्ल्यूसीएल देणार असून एमएमआरडी मार्फत पुर्नवसनाचे काम होईल. जो निधी गेल्या पाच वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी सरकारकडून आला तो कुठे व कसा खर्च झाला याची ‘बूकलेट’ प्रसिद्ध करुन जनतेसाठी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती यावेळी बावणकुळे यांनी दिली.

३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची घरे होणार शासनमान्य-
३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या घरांना आता शासनमान्यता मिळाली असून एमएमआरडीमार्फत या भागांचा विकास केला जाईल. ‘सर्वांसाठी घरे’या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने दिलेले टार्गेट पूर्ण केले आहे. ‘सर्वांसाठी अन्न’ योजनेअंतर्गत शिधा पत्रिका ऑन लाईन करण्यात आली.‘आयुष्यमान’योजनेच्या पुस्तिका ग्राम पंचायतीच्या मार्फत वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत २९ योजनांचा लाभ लाभधारकांना मिळत असल्याचे ते म्हणाले. संजय गांधी निराधार योेजनेची रक्कम ही ६०० वरुन १२०० रु.करण्यात आली. अंध,अपंग,दिव्यांग व दूर्धर आजारी यांना रेशन कार्डवर ५ किलो ऐवजी आता ३५ किलो धान्य मिळणार.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत १६०० किमी साठी विशेष निधी मुख्यमंत्री यांच्याकडून मिळाले. गेल्या वीस वर्षांचा नागपूर जिल्ह्याचा बॅकलॉक संपूर्णपणे भरुन जरी काढता आला नसला तरी खूप पुढे जाऊन बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केल्याचे बावणकुळे हे म्हणाले. पुढच्या काळात याचा प्रचंड फायदा होईल.

तोतलाडोह पूर्ण भरला-
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणार तोतला डोह हा आता ८५ टक्के भरला असून एकेकाळी या धरणातील मृत साठा देखील वापरण्याची वेळ शहराला आली होती. आता या धरणातील चौदा गेट खुले करावे लागणार असून १३० क्यूसेक पाणी नवेगांव खैरीला सोडले जाईल. नवेगांव खैरी पूर्ण भरल्यास दहा-वीस कॅनलला पाणी निघेल, गरज पडल्यास कन्हान नदीला पाणी सोडावे लागेल. परिणामी नदी काठच्या गावाला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गरज पडल्यास सावधतेचा ईशारा दिला जाईल. खरीपाच्या तसेच रब्बी पिकांच्या शेतकरींना तोतलाडोहचे पाणी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विजय घोडमारे हे गेल्या विधानसभा निवडणूकीपासूनच भाजपमध्ये नाही!
राजकीय प्रश्‍नाचे उत्तर देताना यावेळी समीर मेघे यांच्या निवडून आल्यानंतर विजय घोडमारे हे गेल्या चार वर्षांपासूनच भारतीय जनता पक्ष्ात नसल्याची माहिती दिली. ते आताच निवडणूकीच्या तोंडावर पक्ष् सोडून चालले ही वलग्ना खोटी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेसोबत जागा वाटपाबाबत बोलताना केंद्रिय निवड समिती ही सिंटींग आमदारांच्या जागेविषयी निर्णय घेईल, रामटेकची जागा ही भाजपाचीच असल्याचेही ते म्हणाले.

असा झाला निधी वाटप-
सर्वसाधारण योजना-५२५०० टक्केवारी-२६.७९
अनुसूचित जाती उपाययोजना-२०००१.०० टक्केवारी-४.०५
आदिवासी घटक कार्यक्रम-५१८६.९४ टक्केवारी-९.५९
एकूण वार्षिक योजना-७७६८७.९४ टक्केवारी-१५.४८

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या