

पंतप्रधानांचा दौरा पावसामुळे नव्हे तर सुरक्ष्ेच्या कारणावरुन झाला रद्द-पवार यांचा दावा
नागपूर: महामेट्रोच्या रिच-२ अंतर्गत येणार्या सुभाष नगर ते सीताबर्डी मेट्रो रेल्वेचे उद् घाटन करण्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी उपराजधानीत येणार होते मात्र तत्पूर्वी शुक्रवारी रात्री पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधानांचा दौरा पावसामुळे रद्द करण्यात आल्याचे पत्र नागपूरात येऊन धडकले. पावसामुळे नव्हे तर ‘जय जवान जय किसान’ संघटनेने अथक प्रयत्न करुन सर्व कागदपत्रे गोळा करुन या अर्धवट प्रकल्पाच्या मेट्रो जॉय राईडमुळे पंतप्रधानांच्या जीवाला कसा धोका आहे याचे मेल केले,याचीच गंभीर दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने पत्राद्वारे पंतप्रधानांचा प्रस्तावित मेट्रो दौराच रद्द केल्याचे पत्र पाठवले असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केला.
रिच-२ च्या ज्या मार्गावर पंतप्रधान हे मेट्रोचा प्रवास करणार आहेत तो किती धोकादायक आहे,याचे अनेक चित्र तसेच विस्तृत माहिती,पुराव्यांसह या संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला कळवली असल्याचे ते म्हणाले. अत्यंत घाईगर्दीत विधान सभा निवडणूकीची आचार संहिता लागण्या पूर्वी मेट्रोच्या रिच-२ च्या अर्धवट प्रकल्पाचे उद् घाटन पंतप्रधानांच्या हस्ते उरकण्याचा मेट्रो तसेच महाराष्ट्र सरकारचा घाट होता आणि यासाठी त्यांनी चक्क पंतप्रधानांचा जीवच धोक्यात घातला होता,असा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधानांचा दौरा रद्द केला यासाठी खरे तर आम्ही पंतप्रधान कार्यालयाचे आभारच मानतो तरी देखील ज्या महामेट्रोने पंतप्रधानांचा जीव धोक्यात घातला होता त्या विरोधात आम्ही सोमवारी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कश्याप्रकारे फक्त तीन दिवसांच्या तपासणी नंतर रेल्वे सुरक्ष्ा आयुक्तांच्या चमूने महामेट्रोला रितसर परवानगी पत्र बहाल केले ते प्रमाण पत्र अखेर पर्यंत ना पत्रकारांना ना आम्हाला दाखवण्यात आले. आम्ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत त्या प्रमाण पत्राची मागणी केली मात्र दोन तासांच्या आता आमची मागणी फेटाळली जात असल्याचा मेल त्यांनी केला.
या देशात जिथे उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयाचे देखील दस्तावेज माहितीच्या अधिकाराअंतर्गत जनतेला पाहता येतात तिथे सीएमआरएस यांनी तातडीने तीन दिवसात महामेट्रोला कश्याच्या आधारावर परवानगी बहाल केली हा दस्तावेज सरकारी दस्तावेज म्हणून बघण्याचा अधिकार कसा नाकारता येऊ शकतो,असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित केला. मेट्रो दर वेळी सांगते सर्व परवानग्या त्यांच्या जवळ आहे,आम्ही सात मुद्दे उपस्थित केले होते,ते देखील आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पाठवले होते. ते या देशाचे पंतप्रधान आहेत, कोण्या पक्ष्ाचे पंतप्रधान नाही. सुभाष नगर मेट्रो स्टेशनमध्य तर अजून ही अर्थिंग नाही,सगळे स्टेशन गळतात आहेत. मेट्रो रेल्वे रुळावरील बांधकामांचे सामान अद्यापही पसरलेले आहेत,सुरक्ष्ेचे कोणतेही उपाय मेट्रोने योजिले नसताना मेट्रोने फक्त निवडणूका डोळ्या समोर ठेऊन पंतप्रधानांचा जीव वेठीस टांगला होता,असे पवार म्हणाले. महामेट्रो हा एखाद्या राजकीय पक्ष्ासारखे वागत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
न्यायालयाची दारे सुट्या असल्यामुळे बंद होती नाही तर जय जवान जय किसान संघटनेने या दौरावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन ‘स्टे’आणला असता. आमचा सर्वात मोठा आक्ष्ेप हा सीएमआरएसच्या चमू वर आहे. त्यांनी मागे रिच-१च्या मेट्रोला परवानगी द्यायला एका महिनाचा वेळ घेतला होता, यावेळी त्यांनी तीन दिवसात कसे प्रमाणपत्र दिले,मूळात हे प्रमाण पत्र दिल्लीवरुन दिले जाते, महा मेट्रोला नागपूरातच हे प्रमाणपत्र कसे मिळाले? मूळात प्रमाणपत्र मिळाले की नाही हेच एक कोडे आहे. याच कारणामुळे पंतप्रधान कार्यालयाने आमच्या सर्व मुद्दांची दखल घेऊन हा दौराच रद्द केला. विदर्भात अतिवृष्टिचा ईशारा देण्यात आला आहे हे जरी सत्य असले तरी पंतप्रधानांची सुरक्ष्ा हे त्यापेक्ष्ा मोठे कारण असल्याचे प्रशांत पवार म्हणाले. पंतप्रधानांची सुरक्ष्ाच जर एखादे सरकार ’मॅनेज’ करु शकते तर देशाचीच सुरक्ष्ा ही देखील ‘मॅनेज’ करता येऊ शकते त्यामुळे पंतप्रधानांना जर काही झाले असते तर त्याची सर्व जबाबदारी ही महामेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक ब्रिजेश दीक्ष्ीत यांच्यावर राहीली असती, महामेट्राने केलेला आततायीपणा, पंतप्रधानांचा जीव धोक्यात घालणे, माहितीच्या अधिकारात दस्तावेज नाकारणे, सीएमअारएसची चमू अर्धवट प्रकल्पांना ज्याप्रमाणे प्रमाणपत्र देत आहेत आणि नागरिकांची सुरक्षेशी खेळत आहे,या सर्व बाबींसाठी सोमवारपासून दीर्घकालीन न्यायालयीन लढा लढणार असल्याचेही त्यांनी खास ‘सत्ताधीश’न्यूज पोर्टल सोबत बोलताना सांगितले.सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
