फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहा मेट्रोने सादर केले वृक्ष पुनर्रोपणाचे प्रात्यक्षिक

महा मेट्रोने सादर केले वृक्ष पुनर्रोपणाचे प्रात्यक्षिक

Advertisements

‘रूट बॉल टेक्नॉलॉजी’च्या माध्यमाने वृक्षांचे पुनर्रोपण

नागपूर ३०: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने अग्रेसर महा मेट्रोतर्फे आज शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी कामठी मार्गावर(रिच-२) कडबी चौक परिसरात वृक्षांचे पुनर्रोपणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शहरात नागपूर मेट्रो प्रकल्प राबवितांना नाईलाजाने काही ठिकाणी झाडे हटविण्यात आली, या झाडांचे पुनर्रोपण करतांना विशेष काळजी घेण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया कश्याप्रकारे राबविली जाते? याची माहिती व महत्व जनसामान्यांमध्ये पटवून देण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकारी संचालक(रिच-२) महादेव स्वामी, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक(रिच-२)  एम आर पाटील, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक  पुरुषोत्तम कडू, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक आर एस मिश्रा, ग्रीन मॉर्निंग हॉर्टीकल्चर प्राइवेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक  रामचंद्र अप्पारी,  भालचंद्र कोपुलवार उपस्थित होते.

‘रूट बॉल टेक्नॉलॉजी’च्या माध्यमाने सध्या एकूण ११ झाडे कामठी मागाहून हटवून ते हिंगणा मार्गावरील लिटिल वूड येथे स्थानांतरित करण्यात येणार आहे. ही सर्व झाडे आंबा, बदाम, कडूनिंब, अशोका, मुंगना इ. प्रजातीची आहेत.या झाडांची उंची जवळपास २० फूट इतकी आहे. वृक्षाला स्थलांतरीत करण्याकरिता वृक्षाची मुळे लहान केल्या जातात. तसेच वृक्षाच्या फांद्या लहान करून या झाडांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी काळजीपूर्वक केमिकल’चा वापर करण्यात येते. वृक्षाच्या मुळाला बोरी बांधून त्याला वर्तृळाकार आकार दिल्या जातो. यानंतर क्रेनच्या सहाय्याने या झाडांना उचलून प्रत्यारोपित करण्यात येणाऱ्या ठिकाणी नेले जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी झाडे नेताना सुरक्षितेचे पूर्णपणे पालन केले जाते. वृक्षांचे पुनर्रोपण प्रक्रियेला ५ दिवसाचा कालावधी लागत असून महा मेट्रो हे संपूर्ण कार्य २ दिवसातच पूर्ण करते. यानंतर ६ महिन्यापर्यंत ही झाडे वरीष्ठ व तज्ञ् अधिकारांच्या देखरेखीत राहते.

महा मेट्रो गेल्या २ वर्षांपासून सातत्याने वृक्षांचे पुनर्रोपण प्रक्रिया राबवित आहे. आतापर्यंत तीनही ऋतूंमध्ये ही प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली असून या झाडांचे संगोपन करून त्याचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी महा मेट्रो प्रयत्नशील आहे. याशिवाय महा मेट्रोतर्फे ‘लिटिल वुड’ आणि ‘लिटल वुड एक्स्टेंशन’ येथे तब्बल १४५०० झाडे लावण्यात आली आहे. या सर्व झाडांचे नियमित संगोपन करून निगा राखली जाते. १ झाड हटविल्यास ५ नवी झाडे लावण्याचा नियम असतांना महा मेट्रोने १ झाडामागे तब्बल १७ झाडांचे वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतुलनीय कार्य केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या